Home » Diwali Decor 2025 : दिवाळीसाठी घरच्या घरी ५ बेस्ट DIY डेकोरेशन आयडिया

Diwali Decor 2025 : दिवाळीसाठी घरच्या घरी ५ बेस्ट DIY डेकोरेशन आयडिया

by Team Gajawaja
0 comment
Diwali Decor 2025
Share

Diwali Decor 2025 : दिवाळी हा प्रकाश, आनंद आणि नव्या सुरुवातींचा सण आहे. या सणात घर सजवण्याला विशेष महत्त्व असते, कारण असे मानले जाते की स्वच्छ आणि सुंदर घरात लक्ष्मीदेवीचे आगमन होते. बाजारात सजावटीच्या वस्तू सहज मिळतात, पण घरच्या घरी स्वतः बनवलेल्या डेकोरेशनमध्ये वेगळीच उब आणि क्रिएटिव्हिटी असते. अशा DIY डेकोरेशन केल्याने पैसा वाचतो, पर्यावरणासही फायदा होतो आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्याची मजाही मिळते. चला तर पाहूया, दिवाळीसाठी ५ सोप्या आणि सुंदर DIY सजावटीच्या कल्पना.

१. रंगीबेरंगी कागदी कंदील  (Paper Lanterns)

diwali decor 2025

Diwali Decor 2025

दिवाळीत कंदीलाशिवाय सजावट अपूर्ण वाटते. बाजारात मिळणाऱ्या आर्टिफिशियल कंदिल ऐवजी कागदी  कंदील , कागद  आणि दोरा वापरून स्वतः बनवलेली कंदील खूपच आकर्षक दिसतात. त्यासाठी रंगीत कागदावर सुंदर डिझाइन्स कापून घ्या, त्यावर थोडा ग्लिटर लावा आणि शेवटी दोऱ्याने बांधून छताला किंवा खिडकीला अडकवा.  या  कमामध्ये मुलांनाही सहभागी करून घ्या.

२. काचेच्या बरण्यांपासून टी-लाइट होल्डर (Jar Candle Holders)

Diwali Decor 2025

Diwali Decor 2025

जुनी काचेची बरणी किंवा बाटल्या फेकून न देता त्यापासून आकर्षक टी-लाइट होल्डर तयार करता येतात. यासाठी बरण्यांवर अॅक्रेलिक रंगांनी डिझाइन करा किंवा स्टिकर्सने सजवा. काहीजण बरणीभोवती जूट दोरा किंवा रंगीत रिबन बांधतात, ज्यामुळे ती अजून सुंदर दिसते. त्यात छोटासा टी-लाइट कॅन्डल ठेवा आणि टेबल, विंडो सिली किंवा बाल्कनीत ठेवा. संध्याकाळच्या प्रकाशात हे होल्डर घरात मोहक आणि सणासुदीचे वातावरण निर्माण करतात. (Diwali Decor 2025)

३. डेकोरेटिव्ह तोरण आणि दरवाज्याची  सजावट

Diwali Decor 2025

Diwali Decor 2025


दिवाळीत दरवाज्याची सजावट शुभ मानली जाते. फुलांचे नैसर्गिक तोरण पारंपरिक असते, पण त्याऐवजी पेपर फ्लॉवर्स, फेल्ट शीट्स, मोती आणि शिंपले वापरून बनवलेले DIY तोरणही तितकेच सुंदर दिसतात. जुन्या कापडांपासून किंवा लेसपासून तयार केलेले तोरण पर्यावरणपूरक आणि टिकाऊही असतात. यावर ‘शुभ दीपावली’ किंवा ‘स्वागत’ असे संदेश लिहून त्याला वैयक्तिक टच देऊ शकता.

=============

 हे देखील वाचा:

 Ahoi Ashtami : अखंड सौभाग्य आणि मुलांच्या दीर्घायुष्यासाठी केले जाणारे अहोई अष्टमी व्रत        

Shiv Mandir : ‘या’ मंदिराच्या दगडांमधून येतो रहस्यमयी डमरूचा आवाज                                                                                                                                 

Money : आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन करा आणि पैशाची कमतरता दूर करा

=============

४. वॉल आर्ट आणि रांगोळी फ्रेम्स

Diwali Decor 2025

Diwali Decor 2025


दिवाळीच्या वेळी भिंती सजवणे घराला नवीन लुक देते. रंगीत कार्डबोर्ड, बिड्स, सुकामेवा किंवा शिंपले वापरून DIY वॉल हॅंगिंग तयार करा. तसेच रांगोळी काढण्याऐवजी रांगोळीच्या डिझाइन्स लाकडी पाटीवर रंगवून फ्रेम स्वरूपात तयार करा आणि भिंतीवर लावा. हे पुन्हा पुन्हा वापरता येतात आणि घरात पारंपरिक वातावरण निर्माण करतात. ही कल्पना वेळेअभावी रांगोळी काढू न शकणाऱ्यांसाठी उत्तम आहे.(Diwali Decor 2025) 

५. बाटल्यांपासून फेरी लाइट्स डेकोरेशन

Diwali Decor 2025

Diwali Decor 2025


रिकाम्या काचांच्या बाटल्या किंवा वाईन बॉटल्स घरात पडून असतील, तर त्यांचा वापर दिवाळीच्या  सजावटीसाठी करा. त्यात फेरी लाइट्स घालून कोपऱ्यात ठेवा. हे दिसायला अतिशय सुंदर आणि आधुनिक वाटतात. बाटल्यांवर रंगीत पेंट किंवा डेकोरेटिव्ह स्टिकर्स लावून त्यांना अजून आकर्षक बनवू शकता. हे डेकोरेशन विशेषतः घराच्या हॉल किंवा बाल्कनीसाठी उत्तम ठरते.

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.