दिवाळीनंतर अर्थात लक्ष्मी पूजनाच्या दुसऱ्या दिवशी, कार्तिक महिन्यातील प्रतिपदा तिथीला गोवर्धन पूजा आणि अन्नकूट हा सण साजरा केला जातो. या दिवशी गोवर्धन पर्वत आणि भगवान श्रीकृष्णाची पूजा केली जाते, तसेच ‘अन्नकूट’ म्हणजेच अनेक पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. याचदिवशी बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडवा साजरा करण्यात येतो. गोवर्धन पूजा ही भगवान श्रीकृष्णाला समर्पित करण्यात आला आहे. यादिवशी अंगणात गोवर्धन पर्वत, श्रीकृष्ण आणि गायींची पूजा केली जाते. यंदा ही गोवर्धन पूजा आणि अन्नकूट बुधवार, २२ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. अन्नकूट म्हणजे ‘धान्याचा ढीग’. या दिवशी योगेश्वर भगवान श्रीकृष्णाने इंद्राचा सन्मान करताना आपल्या डाव्या हाताच्या करंगळीच्या नखेवर गोवर्धन पर्वत उचलून इंद्राच्या क्रोधापासून ब्रज लोकांचे रक्षण केले होते. (Diwali)
पौराणिक मान्यतेनुसार द्वापर युगामधील लोकं अन्नकुटाच्या दिवशी इंद्राची पूजा करून त्यांना छप्पन भोग अर्पण केले जात होते, परंतु श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून ब्रज लोकांनी ती प्रथा बंद करून या दिवशी गोवर्धन पर्वताची पूजा करून छप्पन नैवेद्य दाखवण्यास सुरुवात केली. श्रीकृष्ण म्हणाले की, आपण आपले जीवन चालवणाऱ्या पर्वत, शेत आणि गायींचा आदर आणि पूजा केली पाहिजे, नंतर भगवान श्रीकृष्णाला गोवर्धन रूपात छप्पन नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा होती. (Marathi Top News)
गोवर्धन पूजाविधी
“गोवर्द्धनधराधार गोकुलत्राणकारक । विष्णुबाहुकृतोच्छ्राय गवां कोटिप्रदो भव ॥ या लक्ष्मीर्लोकपालानां धेनुरूपेण संस्थिता । घृतं वहति यज्ञार्थे मम पापं व्यपोहतु ॥ अग्रतः सन्तु मे गावो गावो मे सन्तु पृष्ठतः । गावो मे हृदये सन्तु गवां मध्ये वसाम्यहम् ॥”
गोवर्धन पूजनाच्या दिवशी बळी पूजा, मार्गपाळी इत्यादी सणही साजरे केले जातात. या पूजा विधीमध्ये आधी श्रीकृष्णाला दुधाने आंघोळ घालावी. यानंतर श्रीकृष्णाची पूजा करुन अन्नकूट अर्पण करावा. तसेच या दिवशी गाय, बैल आणि इतर जनावरांना अंघोळ घालून धूप, चंदन व फुलांचा हार घातला जातो. गोमातेला मिठाई भरवल्यानंतर तिची पूजा केली जाते आणि नंतर श्रीकृष्णाची पूजा केली जाते. शेणापासून गोवर्धन पर्वताची प्रतिकृती बनवली जाते. श्रीकृष्णासमोर एक गाय, तांदूळ, फुले, पाणी, दही आणि तेलाचे दीप प्रज्वलित केले जातात आणि श्रीकृष्णाची पूजा केली जाते. संध्याकाळी पंचोपचार पद्धतीने त्या देवतेची पूजा करून ५६ प्रकारचे पदार्थ अर्थात ५६ भोग तयार करून अर्पण करावे. या छप्पन भोगामध्ये ६ रस खाल्ले जातात. अन्नामध्ये कडू, तिखट, तुरट, आम्ल, खारट आणि गोड हे ६ प्रकारचे रस असतात. या सहा रसांपासून ५६ भोग तयार केले जातात. (Todays Marathi Headline)
यानंतर कृष्णाला प्रदक्षिणा घातली जाते. भगवान श्री कृष्ण सदैव गाईंच्या गोळख्यात राहत असे. तसेच, कृष्णाची पवित्र गाय म्हणुन तिची महती हिंदू धर्मात पूज्यनिय आहे. म्हणुन या दिवशी गाईंची देखील पूजा केली जाते. यानंतर कुटुंबासह श्रीकृष्णाच्या रूपात गोवर्धनाची सात प्रदक्षिणा करा. या दिवशी भगवान गोवर्धनाची खऱ्या मनाने पूजा केल्याने आणि गूळ आणि तांदूळ गायींना खाऊ घातल्यास भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद कायम राहतो, अशी श्रद्धा आहे. या दिवशी गायीची पूजा केल्याने सर्व पापे दूर होतात आणि मोक्ष प्राप्त होतो. (Marathi Trending Headline)
गोवर्धन परिक्रमा
गोवर्धन पर्वत मथुरेपासून २२ किमी अंतरावर आहे. गिरीराज गोवर्धन हे भगवान श्रीकृष्णाचे खरे रूप मानले जाते. हे प्रदक्षिणा करतात जे अनंत पुण्य फलदायी असतात आणि मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. गोवर्धन परिक्रमा २१ किमीची आहे. राधाकुंड, गौडिया मठ, मानसी-गंगा, दान-घाटी, पुंचारी का लोथा इत्यादी अनेक सिद्ध ठिकाणे वाटेत सापडतात. त्याच्या दर्शनाने भक्त धन्य होतात. (Top Marathi Headline)
पौराणिक कथा
पौराणिक कथेनुसार, द्वापार युगात भगवान विष्णूंनी श्रीकृष्णाच्या रूपात अवतार घेतला होता. गोकुळातील नंदबाबा आणि यशोदा यांच्या ठिकाणी बालगोपाळ आपल्या लीला करत होते. त्या काळी गोकुळातील लोक चांगल्या पावसासाठी देवराज इंद्राची पूजा करत असत. श्रीकृष्णाने गोकुळवासीयांना असे करण्यास मनाई केली आणि लोकांना सांगितले, ‘आपण इंद्राची पूजा करू नये, तर गोवर्धन पर्वताची पूजा करावी. गावातील लोकांच्या उपजीविकेचा आधार गोवर्धन पर्वत आहे. या डोंगरावरील गवत आणि वनस्पती खाल्ल्यानंतर आपल्या गायी दूध देतात. दूध आपले जीवन चालवते. अशा प्रकारे गोवर्धन पर्वत आपल्यासाठी पूजनीय आहे. (Latest Marathi News)
=========
Balipratipada : जाणून घ्या बलिप्रतिपदा अर्थात पाडव्याचे महत्त्व
=========
श्रीकृष्णाच्या बोलण्यावरून गावातील लोकांनी देवराज इंद्राची पूजा करणे बंद केले आणि गोवर्धन पर्वताची पूजा सुरू केली. यामुळे इंद्राला राग आला आणि त्याने गोकुळ प्रदेशात मुसळधार पाऊस सुरू केला. पाऊस एवढा पडला की गावातील लोकांची घरे, शेते पाण्याखाली गेली. त्यावेळी श्रीकृष्णाने आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलला. गावातील लोक त्या डोंगराखाली गोळा झाले. देवराज इंद्राने सलग सात दिवस पाऊस पाडला आणि श्रीकृष्णाने सात दिवस गोवर्धन पर्वत उचलून गावातील लोकांचे रक्षण केले. सात दिवसांनी देवराज इंद्राला आपली चूक कळली तेव्हा त्याने श्रीकृष्णाची क्षमा मागितली. पाऊस थांबल्यावर गावातील लोकांनी श्रीकृष्णाला एकूण ५६ प्रकारचे पदार्थ खाऊ घातले. (Top Trending News)
एका दिवसात आठ तर सात दिवसात ५६ प्रहर असतात. इतके दिवस श्रीकृष्ण भुकेले आणि तहानलेले राहिले आणि त्यांनी गावातील लोकांचे रक्षण केले. या उपकाराच्या बदल्यात गावातील लोकांनी प्रत्येक वेळेनुसार श्रीकृष्णाला एकूण ५६ पदार्थ खाऊ घातले. तेव्हापासून श्रीकृष्णाला ५६ प्रकारचे भोग अर्पण करण्याची परंपरा प्रचलित आहे. (Social News)
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics