Home » Narak Chaturdashi : नरक चतुर्दशीला कारीट का फोडले जाते?

Narak Chaturdashi : नरक चतुर्दशीला कारीट का फोडले जाते?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Narak Chaturdashi
Share

हिंदू धर्मातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी. दिवाळी हा सण फक्त भारतातच नाही तर आता जगभरात देखील साजरा केला जातो. नरक चतुर्दशी हा सण दिवाळीच्या एक दिवस आधी साजरा केला जातो. या तिथीला छोटी दिवाळी, काली चौदस आणि रूप चौदस असेही म्हणतात. या दिवशी मृत्यूची देवता यमराजाचीही पूजा केली जाते आणि दक्षिण दिशेला यमाच्या नावाचा दिवाही लावला जातो. (Narak Chaturdashi)

नरक चतुर्दशी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला येते. या वर्षी चतुर्दशी तिथी १९ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजून ५२ मिनिटांनी सुरू होईल आणि २० ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजून ४४ मिनिटांनी संपेल. म्हणून छोटी दिवाळी १९ ऑक्टोबर रविवारी साजरी केली जाईल. या दिवशी पूजेसाठी शुभ मुहूर्त १९ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजून ४१ मिनिटांपासून ते १२ वाजून ३१ मिनिटांपर्यंत असेल. या काळात तुम्ही पूजा करू शकता. (Diwali 2025)

नरक चतुर्दशीच्या दिवशी दिवाळीची पहिली अंघोळ असेल. यादिवशी पहाटे उठून उटणं तेल लावून अभ्यंगस्नान केले जाते. सूर्योदय होण्याआधी या दिवशी अंघोळ करण्याला महत्व आहे. जर सूर्योदयानंतर अंघोळ केली तर ती व्यक्ती नरकात जाते असे म्हटले जाते. अंघोळीनंतर नवीन कपडे घालून फराळाचे सेवन केले जाते. नरक चतुर्दशीच्या दिवशी यमराज, श्रीकृष्ण, काली माता, भगवान शंकर, हनुमान आणि विष्णूजींच्या वामन स्वरूपाची विशेष पूजा करण्याला विशेष महत्व आहे. या सर्व देवी-देवतांच्या मूर्ती घराच्या ईशान्य कोपर्‍यात स्थापित कराव्या आणि त्यांची यथायोग्य पूजा करावी. देवांच्या समोर धूप-दिवे लावा, कुंकू तिलक लावा आणि मंत्रांचा उच्चार करुन पूजा संपन्न करा. (Top Marathi News)

नरक चतुर्दशी ही धनत्रयोदशी नंतर साजरी केली जाते. आश्विन कृष्ण पक्षातील चतुर्दशीला श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून सृष्टीला संकटापासून मुक्त केले.नरकासुर हा पृथ्वी चा पुत्र होता तरी देखील पृथ्वीने त्याच्या वधानंतर शोक न करता आनंदोत्सव साजरा करण्यास सांगितले. श्रीकृष्णाने नरकासुर वध केल्यानंतर अंगावर सांडलेले रक्त हे तेल लावून धुतले होते आणि वाईट गोष्टींना देहापासून दूर केले होते. त्याप्रमाणे नरक चतुर्दशीला अभ्यंगस्नान पहाटे केले जाते. यादिवशी तुम्ही अभ्यंगस्नान करून दीपदान देखील करावे. नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून अभ्यंगस्नान करण्यास महत्व आहे. तुम्ही या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळीच्या बादलीत तीळ टाकून अंगाला तेल लावून स्नान करावे. या दिवसाचे अजून एक खास प्रथा म्हणजे पायाने कारीट फोडणे. (Todays Marathi Headline)

Narak Chaturdashi

महाराष्ट्रातील अनेक भागात नरकचतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नान झाले की, कारीट फोडण्याची एक खास प्रथा आहे. अभ्यंगस्नानानंतर कारीट फोडण्याची परंपरा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत आजही न चुकता पाळली जाते. कारीट हे फळ नरकासुर या राक्षसाचे प्रतीक मानले जाते. या दिवशी पहाटे लवकर उठून अभ्यंगस्नान केल्यानंतर घराबाहेरील तुळशीजवळ डाव्या पायाच्या अंगठ्याने कारीट चिरडले जाते. (Latest Marathi News)

काही ठिकाणी अभ्‍यंगस्‍नानाच्‍या आधी कारीट फोडण्याची प्रथा पाळली जाते. कारीट या कडू फळाच्या रूपात नरकासुराचा प्रतीकात्मक वध करीत सारी कटुता, दुष्टता नाहीशी करावी, अशी प्रार्थना केली जाते. कारीट फोडण्याची परंपरा मुख्यत्वे कोकण प्रांतात पाळली जाते. या फळाला वेगवेगळी नावे आहेत काही ठिकाणी कारीट आणि चिराटे ही दोन नावे प्रचलित आहेत. (Top Stories)

यासोबचत महाराष्ट्रात काही ठिकाणी नरक चतुर्दशीच्या दिवशी नरकासुराची शेणाची आकृती करून तिच्यावर घरातील सर्व केरकचरा टाकला जातो. आजच्या काळात शेण सहज उपलब्ध होत नसल्याने रांगोळीचा देखील नरकासुर काढला जातो. कचऱ्याच्या ढिगावर अनेक ठिकाणी रुपया ठेवण्याची रीत आहे. त्यानंतर संध्याकाळी या नरकासुरावर घरातील मोठ्या पुरुष व्यक्तीने पाय देऊन घरात यायचे असते. (Latest Marathi News)

कारीट फोडण्यामागे एक आख्ययिका सांगितली जाते. हिंदू पौराणिक कथांनुसार पूर्वी प्राग्ज्योतिषपुरात नरकासुर नावाचा एक असुर राजा राज्य करीत होता. या राजाला भूमातेकडून वैष्णवास्त्र प्राप्त झाले होते आणि त्यामुळे तो फार बलाढ्य झाला होता. त्यानंतर शक्तीच्या जोरावर तो देव, माणूस, स्त्रिया सर्वांना त्रास द्यायचा. अशी एक आख्यायिका सांगितली जाते की, नरकासुराने अनेक राजांच्या सोळा हजार राजकन्यांना धरून आणत त्यांना बंदीखान्यात ठेवले. त्यात काही राजांनाही त्यांनी बंदी बनवले आणि अगणित संपत्तीची लूट केली. नरकासुराच्या या वागणुकीने सर्वत्र हाहाकार उडाला होता. (Top Marathi Headline)

मग इंद्राने कृष्णाची प्रार्थना केली. त्यावर कृष्णाने नरकासुराचा अंत करण्याचे मान्य केले. त्यानंतर कृष्णाने गरुडावर स्वार होऊन नरकासुराच्या प्राग्जोतिषपुरावर आक्रमण करीत नरकासुराचा वध केला आणि सर्व राजकन्यांना बंदिवासातून मुक्त केले. नरकासुराच्या बंदिवासातून मुक्त झालेल्या राजकन्यांना त्यांचे स्वजन स्वीकारणार नाहीत हे जाणून कृष्णाने त्या १६ हजार राजकन्यांशी विवाह केला. (Marathi Trending News)

========

Naraka Chaturdashi : ‘छोटी दिवाळी’ अशी ओळख असणाऱ्या नरकचतुर्दशीचे महत्व

Diwali 2025: दिवाळीचे ५ दिवस प्रत्येक दिवस सांगतो शुभत्व, प्रेम आणि नव्या सुरुवातीचा अर्थ!

मात्र, नरकासुराने मरताना कृष्णाकडे, “आजच्या तिथीला जो मंगल स्नान करील, त्याला नरकात पीडा होऊ नये,” असा वर मागितला आणि कृष्णानेही नरकासुराला तसा वर दिला. त्यामुळे आश्विन वद्य चतुर्दशी ही ‘नरक चतुर्दशी’ म्हणून मानली जाऊ लागली आणि त्या दिवशी लोक सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंगस्नान करीत आनंदोत्सव करू लागले. काही ठिकाणी नरक चतुर्दशीच्या दिवशी नरकासुरवधाच्या स्मरणार्थ अभ्यंगस्नान करून पायाच्या डाव्या अंगठ्याने कारीट चिरडले जाते. कारीट हे कडू फळ नरकासुरास मारण्याचे प्रतीक मानले जाते. या कारीट्याचा रस जिभेला लावण्याचीही प्रथा आहे. (Social News)

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.