Home » Dipika Kakar : दीपिका कक्करवर झाली १४ तासांची यशस्वी सर्जरी

Dipika Kakar : दीपिका कक्करवर झाली १४ तासांची यशस्वी सर्जरी

by Jyotsna Kulkarni
0 comment
Dipika Kakar
Share

सध्या टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्कर तिच्या आजारपणामुळे कमालीची चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वीच दीपिकाला लिव्हरचा स्टेज २ कॅन्सर झाल्याचे निदान झाले. त्यानंतर ती सतत लाइमलाईट्मधे येत आहे. तिच्या नवऱ्याने अभिनेता शोएब इब्राहीमने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले होते की, लवकरच तिची सर्जरी होणार आहे. सर्जरीनंतर तो पुन्हा दीपिकाच्या तब्येतीची माहिती देणार आहे. (Dipika Kakar)

नुकतीच दीपिकावर सर्जरी झाली आहे. शोएबने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. मागील अनेक दिवसांपासून फॅन्स दीपिकाची सर्जरी कधी होणार असा प्रश्न विचारत होते. ही सर्जरी झाली असून तब्बल १४ तास सर्जरी चालली असल्याचे शोएबने सांगितले आहे. शोएबने इंस्टवर स्टोरी पोस्ट करून दीपिकाच्या सर्जरीची संपूर्ण माहिती दिली आहे. (Marathi News)

शोएब इब्राहिमने इंस्टाग्रामवर एक स्टोरी लिहिले की, “सर्वांना नमस्कार, मी काल रात्री तुम्हाला दीपिकाबद्दल अपडेट देऊ शकलो नाही त्यासाठी मला माफ करा. ही खूपच लांब सर्जरी होती. दीपिका १४ तास ओटीमध्ये होती. मात्र आता सर्व काही ठीक आहे. दीपी सध्या आयसीयूमध्ये असून, तिला आताही काही वेदना होत आहेत पण तिची प्रकृती स्थिर आहे. मी तुम्ही दिलेल्या प्रेम, प्रार्थना आणि पाठिंब्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. तुमच्या प्रार्थना आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. जेव्हा दीपिका आयसीयूमधून बाहेर येईल तेव्हा मी तुम्हाला अपडेट करेन. पुन्हा एकदा धन्यवाद. दीपिकासाठी प्रार्थना करा.” (Top Marathi News)

Dipika Kakar

दरम्यान, मागील महिन्यात दीपिकाने एक इमोशनल पोस्ट शेअर करत तिला स्टेज 2 चा लिव्हर कॅन्सर असल्याचे सांगितले होते. पोटाच्या वरच्या भागात तीव्र वेदना होत असल्याची तक्रार केल्यानंतर जेव्हा तिनं डॉक्टरांकडून तपासणी केली, तेव्हा असं आढळून आलं की, तिच्या लिव्हरमध्ये टेनिस बॉलच्या आकाराचा ट्यूमर आहे. काही तपासण्या केल्यानंतर दीपिकाला लिव्हर कॅन्सर असल्याचे निदान झाले. (Todays Marathi Headline)

दीपिकाच्या यकृतात टेनिस बॉलच्या आकाराचा ट्यूमर होता. हा ट्यूमर दुसऱ्या टप्प्यातील कॅन्सर असल्याचं सांगितलं होतं. डॉक्टरांनी तिला शस्त्रक्रियेचा सल्ला दिला होता. मात्र दीपिकाला यातच फ्लू झाला होता त्यामुळे डॉक्टरांनी ती बरे होण्याची वाट बघण्यास सांगितले होते. म्हणून तिची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. शोएबने त्याच्या व्लॉगमध्ये दीपिकाच्या लिव्हरच्या ट्यूमरबद्दल सर्वप्रथम माहिती दिली. दीपिकाच्या कॅन्सरची माहिती मिळाल्यावर दीपिका देखील व्लॉगवर आली आणि चाहत्यांना तिच्या तब्येतीबद्दल सांगितले होते. (Top Stories)

==========
==========

दरम्यान दीपिकाबद्दल सांगायचे झाले तर ती टीव्ही विश्वातील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आहे. करियरच्या सुरुवातीला तिने काहीवर्षे एयरहोस्टेज म्हणून काम केले. त्यानंतर ती मनोरंजनविश्वात आली. तिने तिच्या करियरची सुरुवात साईड भूमिका करत केली. २०१५ साली आलेल्या ससुराल सिमर का या मालिकेतून तिने अफाट लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली. त्यानंतर ती कहाँ हम कहाँ तुम या मालिकेत दिसली. दीपिकाने २०१८ साली बिग बॉसमध्ये देखील सहभाग घेतला होता. बिग बॉसच्या त्या पर्वाची ती विजेती देखील झाली. शिवाय तिने ‘नच बलिये’, ‘झलक दिखला जा’ या रियॅलिटी शो मध्ये देखील ती झळकली आहे. नुकतीच ती सेलिब्रिटी मास्टर शेफ या शोमध्ये दिसली होती, मात्र हा शो तिने आरोग्याच्या तक्रारीमुळे मधेच सोडला. (Social Updates)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.