Africa देशात रोज कुठल्या ना कुठल्या नव्या रोगाची नोंद होत आहे. आता त्या एका वेगळ्या नावाच्या रोगाची भर पडली आहे. हा रोग Dinga Dinga म्हणून ओळखला जात आहे. याला कारण म्हणजे, हा रोग झाल्यावर रोग्याला त्याच्या कमरेखालच्या भागावर नियंत्रण ठेवता येत नाही. विशेषतः पाय जमिनीला टेकता येत नाहीत, ते सतत हलत असतात. त्यामुळेच या रोगाला डिंगा डिंगा असे नाव पडले आहे. Uganda मध्ये हा रहस्यमयी रोग पसरला आहे. यामुळे तज्ञांना फ्रान्समध्ये 1518 साली पसललेल्या डान्सिंक प्लेगची आठवण होत आहे.
अफ्रिकन देश युगांडामध्ये एक नवीन आणि विचित्र रोग पसरत आहे. त्याला ‘डिंगा डिंगा’ असे नाव देण्यात आले आहे. हा आजार बहुतेक स्त्रिया आणि मुली यांना होत आहे. (International News)
या आजाराची लक्षणे, साधारण ताप, अंगाचा तीव्र थरकाप आणि अशक्तपणा अशी आहेत. मात्र काही गंभीर प्रकरणांमध्ये या आजारात शरीराला अर्धांगवायू देखील झाल्याने तज्ञ चिंता व्यक्त करीत आहेत. युगांडातील बुंदीबुग्यो या एकाच जिल्ह्यात ‘डिंगा डिंगा‘ या आजाराने 300 नागरिक मिळाल्यानं या आजाराची व्याप्ती वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सध्या हा रोज ज्यांना होत आहे, त्यांच्यावर साधारण तापावर जे उपचार केले जातात तसेच उपचार करण्यात येत आहेत. पण या आजाराने ग्रस्त रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या डॉक्टरांची चिंता वाढवत आहे. कारण या आजाराबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. असाच आजार आफ्रिकन देश काँगोमध्येही पसरला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून यासंदर्भात अधिक संशोधन कऱण्याची मागणी करण्यात येत आहे.
डिंगा डिंगा या रोगाबाबत युगांडाच्या आरोग्य विभागाचे अधिकारी कोणत्या स्वरुपाचे उपचार करावेत याबाबत मार्गदर्शन घेत आहेत. या आजाराचे रुग्ण साधारणपणे आठवडाभरात बरे होत आहेत. साधारण ताप आला की, लगेच संबंधित रुग्णाच्या शरीरात जोरदार थरथर जाणवू लागते. ही थरथर एवढी वाढते की हा रुग्ण स्वतःहून चालूच शकत नाही. त्याला उभं राहयचं असेल तरीही अन्य माणसाची मदत घ्यावी लागते. ताप आणि अशी थरथर वाटू लागल्यावर लगेच डॉक्टरांकडे या, अशा सूचना आता या भागात देण्यात येत आहेत. कारण यातील काही रुग्णांमध्ये अर्धांगवायूसारखी लक्षणेही दिसून आली आहेत. या तापावर काही वेळानं उपचार केल्यास अशी लक्षणे दिसत आहेत. त्यामुळे ताप आल्यास लगेच उपचार घ्या, असे सांगितले जात आहे. या रोगामध्ये रुग्णाचे शरीरावरील नियंत्रण एवढे सुटते की रुग्ण सतत शरीर हलवत असतो. यातच रुग्णाला थकवा येत असून काही रुग्ण या थकव्यानं गंभीर झाल्याची नोंद झाली आहे. या रोगाची तिव्रता पाहून 1518 मध्ये स्ट्रासबर्ग, France मध्ये पसरलेल्या डान्सिंग प्लेगची आठवण काही तज्ञांना झाली आहे. वैद्यकीय क्षेत्रात हा डान्सिंग प्लेगही गंभीर आजार ठरला होता. तशीच लक्षणे या डिंगा डिंगामध्येही आढळल्यानं जागतीक आरोग्य संघटनाही सतर्क झाली आहे. (International News)
==============
हे देखील वाचा : अरकान आर्मी आली कुठून ?
ड्रोन की युएफओ अमेरिकेत खळबळ !
===============
आरोग्य अधिकारी यासंदर्भात स्वच्छता ठेवण्याचा सल्ला देत आहेत. तसेच संक्रमित व्यक्तींशी संपर्क टाळा असेही आवाहन आहे. या विषाणूचे नमुने युगांडाच्या आरोग्य मंत्रालयाकडे पाठवण्यात आले आहेत. डिंगा डिंगा विषाणूने त्रस्त असलेल्या एका रुग्णाने सांगितले की, या विषाणूची लागण झाल्यानंतर त्याच्या शरीराला सतत हादरे बसल्यासारखे वाटत होते. इच्छा नसतानाही शरीर हालत होते, त्यामुळे कमालीचा थकवा जाणवू लागला. अफ्रिकेच्या युगांडा आणि काँगो, दोन्ही देशांमध्ये गूढ आजारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्याबाबत लवकर निदान व्हावे यासाठी जागतिक आरोग्य संघटनेतर्फे तज्ञांचे पथक पाठवण्यात आले आहे. Uganda मध्ये पसरलेल्या या आजाराला अद्याप शास्त्रीय नाव दिलेले नाही. युगांडामधील नागरिकांनीच या रोगाला ‘डिंगा-डिंगा’ नाव दिले आहे. याचा अर्थ स्थानिक भाषेत ‘नृत्यासारखे जोरदार थरथरणे’ असा होतो. या डिंगा डिंगावर योग्य उपचार काय आहेत, याचा तपास करण्यात येत आहे. शिवाय अफ्रिकन देशात प्रवास करणा-यांनाही योग्य ती काळजी घ्यावी असे सांगण्यात आले आहे.
सई बने