Home » असा एक सनकी हुकूमशाह… विरोध करणाऱ्याला द्यायचा सजा-ए-मौत

असा एक सनकी हुकूमशाह… विरोध करणाऱ्याला द्यायचा सजा-ए-मौत

by Team Gajawaja
0 comment
Dictator Joseph Stalin
Share

एडॉल्फ हिटलर, चंजेग खान, सद्दाम हुसैन सारख्या हुकूमशाहांमध्ये आणखी एक नाव जोडले जाते ते म्हणजे जोसेफ स्टालिन (Dictator Joseph Stalin). त्याला सनकी आणि अधिक क्रूर मानले गेले आहे. सोवियत संघातील या सनकीचा प्रवास एका क्रांतिकारक नेत्यापासून झाली होती. मात्र त्याला आपल्या ताकदीवर ऐवढा गर्व झाला होता की, तो त्याच्या प्रत्येक विरोधकाला सजा-ए-मौतचा देण्याचा आदेश द्यायचा. पण जेव्हा त्याचा मृत्यू झाला तेव्हा आनंद साजरा केला गेला. १८ डिसेंबर १८७९ मध्ये अत्यंत गरीब परिवारात जोसेफ स्टालिन याचा जन्म झाला होता. वडिल चप्पल शिवायचे आणि आई इतरांच्या घरी जाऊ कपडे धुण्याचे काम करायची.

अशा पद्धतीने हुकूमशाहीकडे वळली पावले
अत्यंत गरीबी आणि मुश्किल परिस्थितीत वाढलेल्या स्टालिनने पादरी व्हावे असे त्याच्या आईला वाटायचे. १९९५ मध्ये पादरीच्या शिक्षणासाठी आईने जॉर्जियाची राजधानी तिब्लिसला त्याला पाठवले. मार्क्सची पुस्तके वाचणाऱ्या स्टालिनचे मनं तेथे लागले नाही आणि तो एका समाजवादी संघटेत सहभागी झाला. नियम न माणणे आणि प्रत्येक गोष्टीत आपलीच मनमानी
करण्यामुळे त्याला १८९९ मध्ये धार्मिक शाळेतून काढण्यात आले.

स्टालिनने तिब्लिसमध्ये हवामान खात्यात काम करण्यास सुरुवात केली आणि रशियन साम्राज्याच्या विरोधात बंडखोर वृत्ती निर्माण केली. सातत्याने विरोधी आंदोलनात सहभागी झाला. बंडखोरीच्या वृत्तीमुळे स्टालिन जॉर्जिया हा पोलिसांच्या नजरेत येऊ लागला. अटकेपासून बचाव करण्यासाठी काहीवेळेस अंडरग्राउंड झाला. काही काळाने बोल्शेविक पार्टीत सहभागी होत तेथे सदस्य झाला.

Dictator Joseph Stalin
Dictator Joseph Stalin

लेनिनच्या मृत्यूनंतर स्टालिन झाला वारसदार
स्टालिनने पहिल्यांदाच १९०५ मध्ये गुरिल्ला युद्धात भाग घेतला. १९०६ मध्ये लग्न झाल्यानंतर एका वर्षातच पत्नीचा मृत्यू झाला. १९०७ मझ्ये संपूर्ण प्रकारे रशियन क्रांतीत सहभागी होण्यासाठी तो मैदानात उतरला, १० वर्षाच्या संघर्षानंतर १९१७ मध्ये कम्युनिस्ट क्रांतिला यश मिळाले आणि लेनिनच्या शासनाची सुरुवात झाली. रशियन क्रांतीत स्टालिनने महत्वाची भुमिका बजावली. त्यामुळे त्याला कम्युनिस्ट पार्टीचे महासचिव बनवण्यात आले. वेळेनसार पार्टीतील पद ही वाढले गेले. १९२४ मध्ये जेव्हा लेनिनचा मृत्यू झाला तेव्हा स्टालिन याला त्याचा वारसदार म्हणून घोषित करण्यात आले. तो असा काळ होता जेव्हा स्टालिनचा दहशतवाद सुरु झाला होता. (Dictator Joseph Stalin)

स्टालिनचा विरोध करणाऱ्या लोकांना हे सहन झाले नाही. ज्या व्यक्तींनी त्याचा विरोध केला त्या सर्वांना स्टालिन याने ठार केले. विरोधाच्या कारणास्तव स्टालिनने आपल्या पार्टीत सेंट्रल कमेटीच्या ९३ सदस्य, सैन्याचे १०३ जनरल आणि ८१ एडमिरल यांना सुद्धा ठार केले.

हे देखील वाचा- १९७१: जेव्हा भरताने बदलला होता जगाचा नकाशा, पाकिस्ताचे दोन भाग… बांग्लादेशाचा उदय

मुलीशी ही क्रूर वागला
१९५२ रोजी आपल्या वाढदिवसानिमित्त स्टालिन याने एका पार्टीचे आयोजन केले होते. पार्टीत ग्रामोफोनवर वाजवल्या जाणाऱ्या संगीतांची निवड ही स्टालिननेच केली होती. त्या पार्टीत दोन लोक अशी होती ज्यांना ते संगीत अजिबात आवडत नव्हते. त्यापैकी एक होते निकिता खुश्चेव ज्यांना डान्सची आवडच नव्हती. त्यांना छेडण्यासाठी स्टालिनने मुद्दाम डांन्स करण्यास सांगितले. दुसरे नाव होते स्टालिनची मुलगी स्वेतलाना अलिलुएवा. त्यावेळी २६ वर्षीय स्वेतलाना हिचा दोन वेळा घटस्फोट झाला होता. काही वेळेस ती आपल्या वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवून चालत होती. तिला अजिबात आवडत नव्हते की, तिला कोणी हुकूम देईल.

पार्टीदरम्यान स्टालिनची मुलगी स्वेतलाना हिला डान्स करण्यास सांगितले पण तिने त्यासाठी नकार दिला. स्टालिनना हे अजिबात आवडले नाही आणि मुलीला केसांना धरुन त्याने पुढे आणले. अपमानाच्या कारणास्तव पाहुण्यांच्या समोर तिचा चेहरा लाल बुंद झाला आणि डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.