हिंदी सिनेसृष्टीतील जेष्ठ आणि प्रतिभासंपन्न अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. आज २४ नोव्हेंबर रोजी त्यांनी सकाळी ९.३० वाजता अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र यांच्या निधनामुळे बॉलिवूडमधील एका मोठ्या युगाचा अंत झाला आहे. धर्मेंद्र यांनी जवळपास सहा दशकांपेक्षा अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन केले. अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांमध्ये त्यांनी काम केले. सर्वच प्रकारच्या भूमिका धर्मेंद्र यांनी लीलया पेलल्या, मात्र ऍक्शन हिरो म्हणून त्यांना कमालीची लोकप्रियता मिळाली. ८ डिसेंबर रोजी ते आपला ९० वा वाढदिवस साजरा करणार होते. मात्र त्याआधीच त्यांचे निधन झाले. धर्मेंद्र यांनी जवळपास ३०० चित्रपटांमध्ये काम केले. त्यांचे जीवन चित्रपटांसोबतच अनेक वैयक्तिक कारणांमुळे देखील गाजले. धर्मेंद्र यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये बक्कळ पैसा कमावला. त्यांच्याकडे जवळपास ४५० कोटींची मोठी प्रॉपर्टी आहे. (Dharmendra)
वैयक्तिक आयुष्यात धर्मेंद्र यांनी दोन लग्न केले. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव प्रकाश कौर होते. वयाच्या १९ व्या वर्षी त्यांचे प्रकाश कौर यांच्यासोबत लग्न झाले होते. धर्मेंद्र यांना त्यांच्या पहिल्या पत्नीपासून त्यांना चार मुले सनी देओल, बॉबी देओल, अजिता देओल आणि विजेता देओल आहेत. तर चित्रपटांमध्ये यशस्वी झाल्यानंतर ते ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी हेमा मालिनी यांच्याशी लग्न केले. त्यांना दुसरी पत्नी, हेमा मालिनी, पासून दोन मुली – ईशा देओल आणि अहाना देओल आहेत. धर्मेंद्र यांना दोन्ही पत्नींपासून सहा मुले आहेत. याशिवाय धर्मेंद्र यांना १३ नातवंडेही आहेत. (Marathi News)
धर्मेंद्र यांनी अभिनय क्षेत्रासोबतच इतर अनेक क्षेत्रांमधून बक्कळ पैसा कमावला. धर्मेंद्र यांनी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये कोट्यवधींची गुंतवणूक केली असून, त्यांचे अनेक हॉटेल्स भारतातील मोठमोठ्या शहरांमध्ये आहेत. त्यांचे ‘गरम धरम’ नावाचे हॉटेल प्रचंड लोकप्रिय आहे. यासोबतच ‘ही मॅन’ नावाचं रेस्टॉरंट आहे. ज्यातून त्यांची आतापर्यंत खूप मोठी कमाई झाली. त्यांनी कर्नाल हायवेवर ‘ही-मॅन’ नावाचं एक रेस्टॉरंट उघडले आहे. याशिवाय धर्मेंद्र यांचं फार्महाऊस लोणावळ्यामध्ये आहे. ज्यामध्ये स्विमिंग पूलपासून अगदी अॅक्वा थेरपीपर्यंत सर्वकाही आहे. याव्यतिरिक्त धर्मेंद्र यांच्याकडे तब्बल १७ कोटींची प्रॉपर्टी महाराष्ट्रभरात आहे. (Todays Marathi Headline)

धर्मेंद्र यांनी महाराष्ट्रात शेती आणि बिगरशेती जमिनीतही गुंतवणूक केली आहे, ज्याची किंमत अनुक्रमे 88 लाख रुपये आणि ५२ लाखांपेक्षा जास्त आहे. २०१५ च्या इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, त्यांनी लोणावळा येथील त्यांच्या फार्महाऊसजवळ १२ एकरच्या जागेवर ३० कॉटेज असलेलं रिसॉर्ट बांधण्यासाठी एका रेस्टॉरंट कंपनीसोबत भागीदारी केली आहे. यासोबतच ‘विजयता फिल्म्स’ नावाने त्यांचे प्रोडक्शन हाऊस असून, त्याअंतर्गत त्यांनी अनेक हिट चित्रपटांची निर्मिती केली आहे. (Top Marathi Headline)
वर्ष २०२४ मध्ये हेमा मालिनी यांनी दाखल केलेल्या इलेक्शन एफिडेविटनुसार धर्मेंद्र यांच्याकडे ४३ लाख रुपयांपेक्षा जास्त कॅश आहे. ४.५० कोटींचे शेअर्स आणि १ कोटी पेक्षा जास्त किंमतीचे दागिने आहेत. हेमा मालिनी यांच्या इलेक्शन एफिडेविटनुसार धर्मेंद्र यांच्याकडे २०२४ मध्ये ४३,१९,०१६ रुपए रोकड होती. बँक, एनबीएफसी आणि फायनेंशियल इंस्टीट्यूशंसमध्ये ३,५२,९९,३७१ रुपये डिपॉजिट अमाऊंट होती. त्यांनी बॉन्ड, डिबेंचर्स आणि कंपन्यांच्या शेअर्समध्ये सुद्धा गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक अमाउंट ४,५५,१४,८१७ रुपये आहे. या ऐफिडेविटला आता एक वर्षापेक्षा जास्त काळ झालाय. या गुंतवणूकीमध्ये वाढ झालेली असण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)
इलेक्शन एफिडेविटनुसार धर्मेंद्र यांच्याकडे १ कोटी रुपयापेक्षा अधिकची ज्वेलरी आहे. या एफिडेविटनुसार धर्मेंद्र यांच्याकडे चल संपती १७.१५ कोटी रुपयापेक्षा अधिकची होती. हेमा मालिनी यांच्यापेक्षा जास्त संपत्ती धर्मेंद्र यांच्याकडे आहे. हेमा मालिनी यांची चल संपती १२ कोटी रुपयापेक्षा अधिकची आढळून आली होती. प्रॉपर्टीची किंमत दरवर्षी वाढते. धर्मेंद यांच्या नावावर जुहूमध्ये १२६ कोटी रुपयांचा बंगला आहे. हा रेट २०२४ नुसार आहे. आज या बंगल्याची किंमत जास्त असू शकते. (Top trending News)
========
Dharmendra : “ही-मॅन”ची एक्सिट; एका युगाचा अंत
========
दरम्यान धर्मेंद्र यांच्या नावावर एक नॉन एग्री जमीन सुद्धा आहे. त्याची किंमत ९.३६ कोटी रुपयापेक्षा अधिक असू शकते. धर्मेंद्र यांच्याजवळ एकूण अचल संपत्ती १३६ कोटी रुपयापेक्षा अधिक आहे. धर्मेंद्र यांच्याकडे मर्सिडीज-बेंझ एस-क्लास आणि लँड रोव्हर रेंज रोव्हरसह अनेक आलिशान कार देखील आहेत. पहिली पत्नी प्रकाश कौर, त्यांची मुले – सनी, बॉबी, अजिता आणि विजेता व दुसरी पत्नी हेमा मालिनी यांच्या दोन मुली व ईशा देओल आणि आहाना देओल – सर्व सहा मुले धर्मेंद्रच्या मालमत्तेचे समान वारस मानले जातील. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
