Home » गौतम अदानी यांनी जिंकली धारावी झोपडपट्टीची बोली

गौतम अदानी यांनी जिंकली धारावी झोपडपट्टीची बोली

by Team Gajawaja
0 comment
Dharavi Redevelopment Project
Share

Dharavi Redevelopment Project- देशच नव्हे तर जगतील सर्वाधिक श्रीमंत आणि व्यावसायिक गौतम अदानी यांनी एक मोठी डील केली आहे. त्यानुसार एशियातील सर्वाधिक मोठी झोपडपट्टी म्हणजेच मुंबईतील धारावी झोपडपट्टीची पुर्ननिर्माण करण्याचे काम गौतम अदानी यांची कंपनी करणारआहे. या रेसमध्ये तताम कंपन्यांना मागे टाकत अदानी यांची Adani Reality ने धारावी झोपडपट्टीसाठीची बोली जिंकली आहे. आता गौतम अदानी या प्रोजेक्टवर पूर्णपणे काम करणार आहेत.

गौतम अदानी यांनी जिंकली बोली
पीटीआयच्या रिपोर्ट्सनुसार, महाराष्ट्र सरकारने २९ नोव्हेंबरला धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टसाठी बोली लावण्याची संधी उपलब्ध करुन दिली होती. त्यासाठी काही दिग्गज लोकांनी उपस्थिती लावली होती. प्रोजेक्टचे सीईओ एसवीआर श्रीनिवास यांच्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, यासाठी तीन बोली लागल्या होत्या. त्यामध्ये नमन ग्रुप यांची बोली बिडिंगमध्ये पुढे जाऊ शकली नाही. त्यानंतर अदानी आणि डीएफएल यांनी बोली लावली.

Dharavi Redevelopment Project
Dharavi Redevelopment Project

अदानी ग्रुपने लावली इतकी बोली
सीईओनुसार गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी ग्रुपकडन या प्रोजेक्टसाठी डीएलएफच्या बिडपेक्षा दुप्पट बोली लावण्यात आली होती. रिपोर्टमध्ये असे सांगितले गेले आहे की, अदानी यांची बोली ५०६९ कोटी रुपयांची होती. तर धारावी रिडेव्हलपमेंटसाठी डीएलएफची बोली २०२५ कोटी होती.

हे देखील वाचा- कोरोनाच्या लसीमुळे मृत्यू झाल्यास सरकार जबाबदार नाही, केंद्राचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल

आता होणार मोठा फायदा
खरंतर सरकारने यासाठी पूर्णपणे प्लानिंग केली आहे. सरकारने असे ठरवले होते की, ज्या कंपनीसह करार करुन झोपडपट्टी परिसराला सुधारेल. Dharavi Redevelopment Project मुळे येथील लोकांना फार मोठा फायदा होणार आहे. सरकार मुंबईला उत्तम बनवण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलत आहे.

या प्रोजेक्ट अंतर्गत ढासाळलेल्या झोपडीत राहणाऱ्यांना फ्री मध्ये घर मिळणार आहे, त्यामुळे त्यांचे आयुष्य सुधारेल. कमेंसमेंट सर्टिफिकेट जारी झाल्यानंतर पहिल्या टप्प्यातील काम ७ वर्षात पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. तर या प्रोजेक्ट अंतर्गत ६.५ लाख लोकांचे पुर्नवसन करण्याचे लक्ष्य आहे. या प्रोजेक्टमध्ये राज्य सरकारकडे २० टक्के इक्विटी तर लीड पार्टनरकडे ४० कोटी रुपयांसह ८० टक्के इक्विटी असणार आहे. प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर ५६००० लोकांना पुर्नस्थापित केले जाणार आहे. प्रोजेक्टचे काम झाल्यानंतर येथे राहणाऱ्यांना ४०५ स्क्वेअर फूटाचे घर मिळणार आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.