Home » Dhantryodashi : धनत्रयोदशीला धणे खरेदी करण्याला आहे मोठे महत्व

Dhantryodashi : धनत्रयोदशीला धणे खरेदी करण्याला आहे मोठे महत्व

by Jyotsna Kulkarni
0 comment
Dhantryodashi
Share

आज सर्वत्र धनत्रयोदशीचा महत्त्वाचा सण साजरा होत आहे. आजच्या दिवशी धन्वंतरी देवाची आणि कुबेर भगवान यांची पूजा केली जाते. सोबतच देवी लक्ष्मीची पूजा करणे देखील आज शुभ मानले जाते. या दिवशी सोने, चांदी किंवा भांडी खरेदी करण्याची प्रथा आहे, कारण असे मानले जाते की या दिवशी खरेदी केलेली कोणतीही वस्तू वर्षभर शुभ फल देते. असे म्हटले जाते की, आजच्या दिवशी एखादी गोष्ट खरेदी केली की ती १३ पट वाढते. मात्र, सर्वांना सोने-चांदी घेणे शक्य नसते. अशा वेळी एक साधा पण अत्यंत शुभ उपाय केला तर तितकाच फायदा मिळू शकतो. तो म्हणजे धणे खरेदी करणे. धनत्रयोदशीला धने खरेदी करणे शुभ समजले जाते. (Dhantryodashi 2025)

असे मानले जाते की या शुभ दिवशी धणे खरेदी केल्याने सोने आणि चांदी खरेदी करण्याइतकाच लाभ मिळतो. पौराणिक कथेनुसार, समुद्र मंथनाच्या वेळी भगवान धन्वंतरी अमृताच्या भांड्यासह प्रकट झाले होते, म्हणून या दिवसाला धनत्रयोदशी म्हणतात. असे मानले जाते की जो व्यक्ती या दिवशी भांडी, धातू किंवा सोने आणि चांदी खरेदी करतो त्याच्या घरात वर्षभर अक्षय संपत्ती आणि समृद्धी असते. या दिवशी दीपदानाला विशेष महत्त्व आहे. यमराजाला समर्पित दिवा लावल्याने अकाली मृत्यूची भीती नाहीशी होते. (Top Marathi News)

धनत्रयोदशी हा शब्द धन या शब्दापासून तयार झालेला आहे. हा शब्द समृद्धी आणि संपत्तीचे प्रतीक आहे. आपल्या पुरातन मान्यतेनुसार या दिवशी खरेदी केलेली कोणतीही वस्तू वर्षभर घरात आनंद आणि समृद्धी आणते. धणे हे नाव ‘धन’ या शब्दानेच सुरू होते, त्यामुळे धणे शुभ मानले जातात. असे म्हटले जाते की, धणे खरेदी केल्याने घरामध्ये संपत्ती आणि समृद्धी येते. म्हणूनच लोक या दिवशी थोडेसे धणे खरेदी करतात. दिवाळीच्या रात्री प्रदोष काळादरम्यान श्री गणेश – लक्ष्मीमातेच्या पूजेदरम्यान धणे अर्पण केल्यास धनाची देवी प्रसन्न होते, असे म्हणतात. धणे खरेदी केल्यास संपत्तीमध्ये वाढ होते, अशी मान्यता आहे. (Marathi Trending News)

Dhantryodashi

धनत्रयोदशीच्या संध्याकाळी खरेदी केलेले धणे देव्हाऱ्यात ठेवावे आणि पूजेत वापरावे. काही घरांमध्ये ती दिवाळीच्या मुख्य पूजेत अर्थात लक्ष्मी पूजेत वापरले जातात. पूजेनंतर या धण्यांची बियाणे घराच्या अंगणात किंवा कुंडीत पेरली जातात. असे म्हटले जाते की हे धान्यांचे बियाणे अंकुरली तर घरात समृद्धी वाढते, आर्थिक भरभराट होते आणि वर्षभर देवी लक्ष्मीची कृपा राहते. काहीजण पूजेनंतर धणे साठवून ठेवतात आणि पुढील वर्षीच्या व्यवसाय, शेती किंवा नवीन उपक्रम सुरू करताना शुभ प्रतीक म्हणून त्यांचा वापर करतात. (Top Trending News)

======

Diwali : जाणून घ्या धनत्रयोदशीला मीठ खरेदी करण्याचे महत्व

======

धनत्रयोदशीच्या दिवशी धणे खरेदी करण्यासोबतच इतरही अनेक वस्तू तुम्ही खरेदी करू शकतात. ज्यामध्ये मीठ, कुबेर यंत्र, सोने चांदीचे दागिने, झाडू, कवडी, गोमती चक्र, शंख, हळकुंड, बत्ताशे, सुपारी, पितळीची किंवा तांब्याची भांडे आदी वस्तू खरेदी करू शकता. धणे हा छोटासा मसाला असला तरी तो शुभतेचे, वाढीचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे. त्यामुळे या वर्षी जर सोने किंवा चांदी घेणे शक्य नसेल, तर धणे खरेदी करून पूजेत अर्पण करा कारण श्रद्धेने केलेल्या या कृतीतही देवी लक्ष्मीचा आशीर्वाद नक्की लाभतो. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.