दरवर्षी दिवाळीनंतर १५ दिवसांनी कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळी साजरी केली जाते. भगवान शंकरांनी त्रिपुरासुर राक्षसावर विजय मिळवल्याच्या आनंदात ही देव दिवाळी साजरी केली जाते. देव पृथ्वीवर अवतरतात आणि दिवे लावून हा दिवाळीचा उत्सव साजरा करतात, अशी धारणा आहे. त्यामुळेच नदी तिरावर असलेल्या मंदिरांमध्ये देव दिवाळी मोठ्या प्रमाणात साजरी होते. वाराणसी नगरीमध्ये देव दिवाळीचा उत्सव अधिक मोठ्या प्रमाणात साजरा होतो. (Varanasi)

पवित्र गंगा नदीच्या काठावर असलेल्या बाबा विश्वनाथांच्या मंदिरात हा देव दिवाळीला रात्रभर दिवे लावण्यात येतात. या उत्सवाला साक्षात बाबा विश्वनाथ हजर असतात, असे मानले जाते. त्यामुळेच काशीनगरीमध्ये या देव दिवाळीच्या उत्सवासाठी फक्त देशातीलच नाही, तर विदेशातील भक्तही उपस्थित असतात. दिवाळीचा सण नुकताच साजरा झाला आहे. आता सर्वांना वेध लागले आहेत, ते देव दिवाळीचे. ही देव दिवाळी भगवान शंकराच्या पराक्रमाला वंदन करण्यासाठी साजरी होते. भगवान शंकर यांनी त्रिपुरासुर राक्षसाचा वध करून देवतांना त्याच्या अत्याचारापासून मुक्त केले. या विजयाचा आनंद देवांनी पवित्र गंगा नदीच्या काठावर दिवे लावून साजरा केला. हा दिवस कार्तिक पौर्णिमेचा होता. त्यामुळे तेव्हापासून देव दिवाळीचा उत्सव साजरा होत आहे. कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकर यांनी त्रिपुरासुराचा वध केला आणि देवांचे रक्षण केले. म्हणूनच, याला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात. (Social News)
याच परंपरेनुसार देव दिवळीला गंगा नदीची पूजाही केली जाते. याचबरोबर अन्य नद्यांच्या काठावरही या देव दिवाळीच्या निमित्तानं दिव्यांचा उत्सव साजरा होतो. वाराणसी नगरीसाठी हा देव दिवाळाचा सण सर्वात मोठा मानला जातो. कारण या दिवशी साक्षात महादेव दिव्यांची सजावट करतात, असे सांगितले जाते. त्यामुळे येथे देव दिवाळीच्या निमित्तानं गंगा घाटावर मोठा उत्सव असतो. यामध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असतो. यावर्षी, देव दिवाळी ५ नोव्हेंबर २०२५ रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी भगवान महादेवासह देवी पार्वती, देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूचीही पूजा केली जाते. वाराणसीमधील प्रत्येक घराबाहेर या दिवशी रांगोळी घातली जाते, आणि अनेक दिवे लावून प्रकाश केला जातो. यामागे अशी धारणा आहे की, भगवान शंकर आणि भगवान विष्णू हे या दिवशी नगराचा फेरफटका मारतात. (Varanasi)

अशावेळी ज्यांच्या घरासमोर प्रकाश आहे, दिवे आणि रांगोळी आहे, त्यांना ते संपन्नतेचा आशीर्वाद देतात, अशी धारणा आहे. त्यामुळे देव दिवाळीच्या दिवशी अख्खी काशी नगरी सजवली जाते. देव दिवाळीच्या दिवशी काशीमधील सर्वच घाट सजवले जातात. यात प्रसिद्ध दशाश्वमेध घाट, अस्सी घाट आणि चेत सिंह घाट यावर लाखो मातीचे दिवे लावले जातात. हे दृष्य बघण्यासाठी अनेक भाविक यावेळी घाटावरुन चालणा-या बोटींगचाही अनुभव घेतात. आत्ताही या उत्सवासाठी मोठ्या प्रमाणात तयारी सुरु आहे. देव दिवाळीनिमित्त, काशीच्या घाटांवर २५ लाखांहून अधिक दिवे लावण्यात येणार आहेत. शिवाय ३डी लेसर शो, हिरवी आतिषबाजी आणि भव्य गंगा आरती केली जाणार आहे. यावेळी ऐतिहासिक घाट आणि आसपासच्या इमारती देखील विद्युत रोषणाईने सजवल्या जाणार आहेत. याशिवाय या देव दिवाळीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे, ५०० ड्रोनच्या माध्यमातून २० मिनिटांत काशी आणि अयोध्येचे एकाच वेळी दृश्य दाखवले जाणार आहे. (Social News)
=======
हे देखील वाचा :
Chaturthi : कार्तिक महिन्यात येणाऱ्या विनायकी चतुर्थीचे महत्त्व
=======
हे ड्रोन काशीचे प्राचीन वैभव, शिवाची स्तुती आणि गेल्या दहा वर्षांतील विकासाची कहाणी सादर करतील. हिंदू पंचांगानुसार, कार्तिक पौर्णिमा तिथी ४ नोव्हेंबर रोजी रात्री १०:३६ वाजता सुरू होईल आणि ५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६:४८ वाजता संपेल. उदयतिथीच्या आधारे, ५ नोव्हेंबर हा कार्तिक पौर्णिमा तिथी मानला जाईल. या दिवशी कार्तिक पौर्णिमा व्रत केले जाईल आणि देव दिवाळी देखील साजरी होईल. या वर्षी देव दिवाळीत संध्याकाळी पूजा, आरती आणि दिवे लावण्याची वेळ ५:१५ ते ७:५० पर्यंत असल्याची माहिती जाणकारांनी दिली आहे. वाराणसीनंतर देव दिवाळीच्या उत्सव लखनऊमधील रामसनेही घाट येथील माँ दुर्गा आणि काली माता मंदिरांमध्येही मोठ्या प्रमाणात देव दिवाळीचा उत्सव साजरा होतो. येथेही विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. (Varanasi)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
