जेव्हा एखादा सिनेमा तयार केला जातो तेव्हा त्यामधील कलाकाराला त्याला जी भुमिका दिली जाते त्यात बुडावे लागते. उदाहरणार्थ, आमिर खानच घ्या, याच्या बद्दल आपण खुप काही गोष्ट ऐकल्या आहेत. पण जेव्हा आमिर खान एखाद्या भुमिकेत काम करतो तेव्हा त्या पात्राला न्याय देण्याचा पुरेपुर प्रयत्न देतो.अशातच काही वेळेस असे होते की, सिनेमामधील भुमिका ही खासगी आयुष्यावर ही कधीतरी प्रभाव पाडतो. ज्यामधून बाहेर पडणे मुश्किल होते. असेच काहीसे अभय देओल याच्यासोबत झाले होते.(DEV D)
बॉलिवूड मधील सिनेमांच्या जगातील प्रसिद्ध परिवारातील असलेल्या अभय देओलने फार कमी सिनेमांमध्ये काम केले. परंतु आपल्या वेगळ्याच अभिनयाच्या कौशल्याने त्याने सर्वांच्या मनावर ठसा उमटवला आहे. सनी देओल, बॉबी देओल यांचा चुलत भाऊ आणि धर्मेंद्र यांचा भाचा अभयने २००५ मध्ये इम्तियाज अली रोमँन्टिक कॉमेडी सिनेमा ‘सोचा ना था’ यामध्ये डेब्यु केला होता. त्यानंतर ओए लकी लकी ओए, हनीमून ट्रॅवेल्स प्राइवेट लिमिटेड, आहिस्ता, आहिस्ता सारख्या काही सिनेमांमध्ये काम केले. तर २००९ मध्ये अनुराग कश्यपचा सिनेमा ‘देव डी’ मध्ये देवच्या भुमिकेनंतर त्याला जबरदस्त प्रसिद्धी मिळाली.
देव नावाच्या भुमिकेतील अभय हा नशेत नेहमीच धुत असल्याचे दाखवले गेले. या सिनेमात काम करताना अभय देओल त्या भुमिकेत ऐवढा बुडून गेला की, त्याला खुप दारु पिण्याची सवय लागली होती. आपली वेब सीरिज ट्रायल बाय फायरच्या प्रमोशनवेळी त्याने सांगताना त्याच्याबद्दलच्या या गोष्टींचा खुलासा केला होता.
अभय देओल याने असे म्हटले होते की, देव डी मध्ये काम केल्यानंतर जवळजवळ एक वर्षभरत ती त्या भुमिकेतून बाहेर पडलो नव्हतो. त्या काळात तो न्युयॉर्कमध्ये होता. प्रत्येक दिवशी वेड्यासारखी दारु प्यायचा. फाटलेल्या कपड्यांमध्येच रस्त्यावर होता. एक वर्ष अशी स्थिती राहिल्यानंतर त्याने नंतर स्वत:वर कंट्रोल केले आणि या भुमिकेतून बाहेर पडत भारतात आला.(DEV D)
हे देखील वाचा- प्रियंका चोपडाने सांगितले बॉलिवूडला अलविदा करण्यामागील कारण
Mashable India ला दिलेल्या मुलाखतीत अभय देओलने असे सुद्धा सांगितले होते की, एका सिनेमा क्षेत्रातील घराण्यातील आहे. मी एका मुलाच्या रुपात प्रसिद्धी कशी मिळते हे अत्यंत जवळून पाहिले. मला आवडले नाही कारण यामुळे तुमचे खासगी आयुष्य हरवले जाते. त्याच्याबद्दल खुप काही गोष्टी लिहिल्या जातात.