Home » Pregnancy Care : प्रेग्नंसीमध्ये तूप खाल्ल्यास मिळतात ‘हे’ मोठे लाभ

Pregnancy Care : प्रेग्नंसीमध्ये तूप खाल्ल्यास मिळतात ‘हे’ मोठे लाभ

by Jyotsna Kulkarni
0 comment
Pregnancy Care
Share

प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि महत्वाचा काळ म्हणजे तिची प्रेग्नन्सी. स्त्रीला पूर्णत्व प्राप्त करून देणाऱ्या या सुवर्णकाळाची अनुभूती प्रत्येक स्त्री तिच्या आयुष्यात घेते. आपण एका जीवाला जन्म देणार आहोत ही भावनाच शब्दांचाही पलीकडची असते. स्त्रीच्या आयुष्यातील हे ९ महिने म्हणजे गोल्डन पिरियड असतो. या काळात स्त्रीने तिच्या हालचालींपासून ते खाण्यापर्यंत सर्वच गोष्टींची काटेकोरपणे काळजी घेणे आवश्यक असते. असे म्हणतात की गरोदरपणाच्या ९ महिन्यात आपण जेवढी बाळाची काळजी घेऊ तेवढेच ते बाळ उत्तम आणि सुदृढ असते. (Pregnancy Care)

गर्भारपणात केलेल्या प्रत्येक गोष्टींचा थेट परिणाम पोटाला बाळावर होत असतो. त्यामुळेच आपण आपल्या प्रत्येक गोष्टींबद्दल, कार्याबद्दल जागरूक असणे आवश्यक आहे. खासकरून गरोदरपणात महिलांनी आपल्या आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे. गरोदरपणात महिलांनी चांगले, स्वच्छ आणि सकस अन्न खावे. या दिवसांमध्ये आपली आणि आपल्या बाळाची तब्बेत सांभाळणे हे प्रत्येक महिलेसाठी खास असते. हेल्दी खाण्यावर भर द्यावा लागतो. (Marathi News)

फळं, भाज्या, ज्यूस आदी हेल्दी गोष्टी खाताना महिलांनी अजून एका पदार्थाचा आपल्या आहारात समावेश केला पाहिजे. हा पदार्थ आहे ‘तूप’. तूप प्रत्येकाच्याच घरात असते. अनेकांचे तर जेवण तुपाशिवाय अपूर्ण आहे. घरी बनवलेले शुद्ध, सात्विक तूप म्हणजे अनेक रोगांवर उत्तम उपाय आहे. हेच तूप खाणेही गरोदरपणामध्ये फायदेशीर ठरते. यामध्ये अनेक पोषक तत्व असून गरोदरपणात याचा फायदा होतो. त्यामुळे योग्य प्रमाणात तूप खाणे गरोदरपणात गरजेचे आहे. गरोदर महिलांनी योग्य प्रमाणात तूप खाण्यास काहीच हरकत नाही. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नेहमीच त्रासदायक असतो. प्रेग्नन्सीमध्ये तूप खाल्ल्यामुळे आपल्या आरोग्यावर अनेक सकारात्मक परिणाम होतात. (Todays Marathi Headline)

Pregnancy Care

* गरोदर स्त्रिया तूप खाऊ शकतात की नाही याबद्दल काही लोकांना शंका असते. त्यात भरपूर चरबी असल्यामुळे ते खाण्याची अनिच्छा असते. हे देखील लक्षात घेतले पाहिजे की तुम्ही ठराविक प्रमाणात तूप घातल्यास तुम्हाला अधिक फायदे मिळू शकतात. मात्र तुम्हाला तुपाची ऍलर्जी असेल किंवा त्याने काही त्रास होत असेल तर जबरदस्ती खाण्याची गरज नाही.

* तुप विटामिन्स आणि मिनरल्स यांचा चांगला स्रोत आहे. विटामिन ए, विटामिन डी, विटामिन ई आणि विटामिन के याचे प्रमाण तुपात अधिक असते. सोबतच तुपामध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिडदेखील असतात. शरीराला होणारा त्रास लवकर बरा करणारी पोषक तत्व तुपामध्ये आढळतात. बऱ्याचदा गरोदरपणात लिव्हरशी संबंधित त्रासदेखील होऊ लागतो. ही समस्या दूर करण्यासाठी तुपाचा उपयोग उत्तम प्रकारे होतो. गरोदर असताना योग्य प्रमाणात तूप खाणे नेहमीच फायद्याचे ठरू शकणार आहे. (Latest Marathi News)

* तुपामध्ये अनेक पौष्टीक गुणधर्म असतात जे प्रसूती वेदना कमी करण्यास फायदेशीर ठरतात. तूप योनीला वंगण घालण्यास मदत करते, ज्यामुळे प्रसूती सोपी होते. तुपाचे सेवन केल्यामुळे पचन सुधारते आणि गर्भधारणेदरम्यान बद्धकोष्ठता होण्याचे प्रमाण देखील कमी करते. गरोदरपणात तूप खाल्ल्याने बाळाच्या मेंदूचा विकास होतो. हे आईच्या शरीराला शक्ती, उबदारपणा आणि पोषण प्रदान करते. (Top Stories)

* गरोदरपणात अधिक महिलांना पचनक्रियेशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. बद्धकोष्ठता आणि गॅस होणे हे अत्यंत सामान्य आहे. अशावेळी घरच्या तुपाचे सेवन करणे फायदेशीर ठरते. तूप खाल्ल्याने आतड्या, कोलन आणि पचनक्रियेमध्ये सुधारणा होते. नियमित स्वरूपात तुम्ही रोज एक चमचा तुपाचे सेवन केले तर तुमची पचनक्रिया अधिक चांगली होण्यास मदत मिळते.

* अनेक महिलांना गरोदरपणात भूक कमी लागते. अशा वेळेस तुपाचा वापर आपल्या डाएटमध्ये करून घ्यावा. शुद्ध तूप पचनक्रिया अधिक चांगली होण्यासाठी मदत करते. यामुळे मेटाबॉलिजम वाढते आणि भूकही वाढते. ज्यामुळे तुमची आणि बाळाची प्रकृती चांगली राहण्यास मदत मिळते.

* गरोदर महिलांच्या पायांना बरेचदा सूज दिसते. तुपाच्या सेवनाने ही सूज कमी होण्यास मदत मिळते. तुपामध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड असते जे सूज कमी करण्यासाठी मदत करते. शिवाय तुपाने सूज आलेल्या ठिकाणी मालिश केल्याने देखील फायदे मिळू शकतात. (Social Updates)

* प्रेग्नन्सीदरम्यान महिलांना सांधेदुखी आणि हाडांच्या त्रासाला सामोरे जावे लागते. या त्रासापासून सुटका मिळविण्यासाठी देखील आहारात तुपाचा समावेश करणे लाभदायक ठरते. विटामिन डी आणि विटामिन के असल्यामुळे हाडांची मजूबती चांगली होण्यास मदत मिळते. तसंच त्रासही कमी होण्यास मदत मिळते.

=========

हे देखील वाचा : Health Tips: शरीरात कॅल्शियमची कमतरता आहे? तर सेवन करा ‘हे’ पदार्थ 

Health : पावसाळ्यात हिरव्या भाज्या का खात नाही?

==========

* आयुर्वेदानुसार एक कप गरम दूधात, केसर, मध, हळद आणि एक चमचा शूद्ध साजूक तूप एकत्र करून घेतल्याममुळे गरोदर महिलांची रोगप्रतिकारशक्ती वाढते. शिवाय यामुळे तुमच्या गर्भातील बाळाच्या मेंदूची वाढ आणि विकास चांगला होतो.

* गरोदरपणी महिलांनी सामान्यपणे दिवसभरात कमीत कमी दोन ते तीन चमचे तूप खाण्यास काहीच हरकत नाही. मात्र त्यापेक्षा जास्त प्रमाणात तूप खाण्यामुळे तुमच्या शरीरातील फॅटचे प्रमाण वाढू शकते. या काळात तूपाचे प्रमाण किती असावे हे तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने कमी अधिक करू शकता. दुधामध्ये तूप मिक्स करून प्यावे, संपूर्ण ९ महिने त्वचा चांगली राहण्यासाठीही तूप खाण्याचा फायदे होतो.

(टीप : कोणतेही उपाय करताना डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.