भारत देशाच्या इतिहासामध्ये अनेक शूर आणि कर्तृत्ववान राजे – महाराजे होऊन गेले. कधीकाळी अभिमानाने राज्य करणाऱ्या मुघल साम्राज्याचे वंशज सध्याच्या घडीला काय करतात, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. (Descendants of Mughal Empires)
पूर्वीच्या काळी राजे महाराजे म्हटलं की, त्यांना राहायला वाडे आणि किल्ले असत. त्यांच्या राहण्याची, खाण्यापिण्याची काळजी घेतली जायची. पण काळानुरूप काही राजा महाराजांचे वंशज गरीब झाले. हे राजे कोणते, याची माहिती या लेखात आपण घेणार आहोत. (Descendants of Mughal Empires)
टिपू सुलतान
‘टायगर ऑफ म्हैसूर’ नावाने ओळखला जाणारा आणि इंग्रजांच्या विरोधात जीवाची बाजी लावणारा राजा टिपू सुलतान हा इतिहासातील सर्वात शूर राजांपैकी एक राजा म्हणून ओळखला जातो. त्याने त्याच्या कारकिर्दीत मोठ मोठे पराक्रम गाजवले होते. हा राजा १७९९ मध्ये मृत्यू पावला तेव्हा त्यांच्याकडची संपत्ती होती ९०,००० सैनिक आणि ३ कोटी रुपये.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर राजेशाही संपुष्ठात आली. अनके संस्थाने खालसा करण्यात आली आणि त्यांची सर्व संपत्ती सरकारदप्तरी जमा करण्यात आली. महाराणा प्रतापला १२ मुले होती. त्यातील ७ मुलांचा मृत्यू झाला.
उर्वरित ५ मुलांपैकी सध्या फक्त मुनरुद्दीन आणि गुलाम मोहम्मद यांच्याबद्दलच माहिती उपलब्ध आहे. त्यांचे वंशज रिक्षा चालवत असून कोलकत्ता येथील टिपू सुलतान शाही मस्जिदच्या मागे राहतात. त्यांची दैनंदिन कमाई आहे केवळ ३०० रुपये! या तुटपूंच्या कमाईवरच ते दिवस काढतात. सध्या त्यांची परिस्थिती हलाखीची आहे. राजघराण्याचा वारस असूनही ते सध्या वाईट परिस्थितीत दिवस काढत आहे.
टिपू सुलतानसारखेच अजून काही राजा होऊन गेले ज्यांनी इतिहासात कधी काळी स्वतःच्या पराक्रमाने राज्य केले होते पण सध्या त्यांचे वंशज वाईट परिस्थितीमध्ये दिवस काढत आहेत. त्यामध्ये राजा अकबर, राज महापात्रा, निजाम उस्मान अली खा आणि बहादुरशहा जफर यांचा समावेश होतो. (Descendants of Mughal Empires)
राजा अकबर
अकबर राजाचे १२ वे वंशज बहादुरशहा जफर २२ मुलांमधील एक असणारे याकूब हबिबुद्दीन तुसी हे मुघलांचे वारस आहेत. त्यांना सरकारकडून झेड प्लस सुरक्षा आणि ८००० रुपये निवृत्ती वेतन दिले जाते. पण त्यांना सरकारच्या कोणत्याही सुविधा लागत नसून पूर्वजांच्या संपत्तीवर दावा सांगत आहेत. याकूब यांना आग्र्याचा ताजमहाल आणि सरकारी संपत्तीतील संस्थानचा वाटा हवा आहे. त्यासाठी ते न्यायालयात केस लढवत आहेत.
राजा ब्रज राज महापात्रा
भारतातील सर्वात पुढारलेल्या संस्थानिकांपैकी एक म्हणून ओडिशा राज्यातील पिगराई राजवंश यांना ओळखले जात होते. सुख सोयींनी नांदणाऱ्या पिगराई राजवंशात सगळं सुखासमाधानात चालू होतं. एकूण ६० किलोमीटरच्या परिसरात त्याचे राज्य पसरलेलं होतं. त्याकाळी त्यांच्या दिमतीला ३० नोकर चाकर आणि डझनभर गाड्या असायच्या.
====
हे देखील वाचा: योग्य विचारसरणी नसलेल्या ‘या’ सुलतानाने स्वतःच्या हातूनच आपल्या राजघराण्याचा अंत केला
====
पण जेव्हा स्वातंत्र्य मिळाले तेव्हा सरकारने राजा महापात्राचा महाल ६०० पाउंड रुपयांना विकत घेतला. त्यांना सरकारकडून १३० पाउंड रुपये निवृत्ती वेतन देण्यात येत होते. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी छामुपती सिंग यांचे निवृत्ती वेतन बंद केले. त्यांनतर छामुपती यांनी पुढील आयुष्य हलाखीतच काढले. त्यांना राहायला घर नसल्यामुळे गावकऱ्यांनीच झोपडी बांधून दिली होती. २०१५ साली ९५ व्या वर्षी छामुपती यांचे निधन झाले. (Descendants of Mughal Empires)
निजाम उस्मान अली खा
भारतात झालेल्या सर्व राजांपैकी निजाम अली खा हा राजा सर्वात श्रीमंत राजा होता. हा राजा एवढा श्रीमंत होता की सोने, चांदी आणि हिरे याची रीघच लागलेली होती. त्याच्याकडे अरबो रुपयांची संपत्ती होती. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने सर्व संस्थानांची संपत्ती जप्त केली. निजाम राजाचे वंशज मुकरज जहाँ हे सध्या टर्की देशात राहत असून बाकीचे वंशज जगण्यासाठी संघर्ष करत आहेत.
====
हे देखील वाचा: हे आहे ज्ञात इतिहासातलं सगळ्यात कमी काळ चाललेलं युद्ध!
====
बहादुरशहा जफर
भारत देशातील दिल्लीच्या तख्तावर राज करणाऱ्या राजांपैकी बहादुरशहा जफर या राजाची सहावी पिढी जिवंत असून जियाउद्दीन टक्की हे त्यांचे वंशज आहेत. ते त्यांच्या दोन मुलांसोबत राहत असून त्यांना शासनाकडून कोणतीच मदत मिळत नाही. शासनाने मदत द्यावी आणि बहादुरशहा जफर यांच्या नावाने स्कॉलरशिप देण्यात यावी अशी जियाउद्दीन यांची आग्रही मागणी होती. परंतु, ती अद्याप मान्य करण्यात आली नाहीये.
– विवेक पानमंद