Home » डेल्टाच्या तुलनेत लहान मुलांना किती आहे ओमायक्रोन संसर्गाचा धोका? अभ्यासात समोर आली ‘ही’ मोठी माहिती

डेल्टाच्या तुलनेत लहान मुलांना किती आहे ओमायक्रोन संसर्गाचा धोका? अभ्यासात समोर आली ‘ही’ मोठी माहिती

by Team Gajawaja
0 comment
Delta vs omicron
Share

कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून, विशिष्ट वयोगटातील लोकांसाठी हा संसर्ग एक मोठे आव्हान म्हणून पाहिले जात आहे. विशेषत: लहान मुले आणि वृद्धांमध्ये संसर्ग होण्याच्या जोखमीबाबत, अभ्यासात वेगवेगळे दावे करण्यात आले आहेत. मात्र बहुतेक संशोधक मान्य करतात की, वृद्धांपेक्षा लहान मुलांना संसर्ग आणि गंभीर आजाराचा धोका कमी असतो. 

दुसरीकडे, जर लहान मुलांना कोविड-१९ लस दिली गेली, तर त्यांना अतिरिक्त संरक्षण मिळू शकते. मात्र, सध्या जगात ज्या प्रकारे ओमायक्रोन आणि त्याच्या उपप्रकारांची प्रकरणे वाढत आहेत, त्यामुळे लोकांच्या समस्यांमध्ये भर पडली आहे.

ओमायक्रोन प्रकारात मुलांमध्ये संसर्गाचा धोका आणि तीव्रतेचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांच्या टीमने आता मोठा दावा केला आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ५ वर्षांखालील मुलांमध्ये, ओमायक्रोनमध्ये डेल्टाच्या तुलनेत संसर्गाच्या तीव्रतेचा धोका कमी असल्याचे आढळून आले आहे. (Delta vs omicron)

विशिष्ट परिस्थिती वगळता, या प्रकारातील मुलांमध्ये गंभीर संसर्ग होण्याचा धोका खूप कमी आहे. मात्र, हेही लक्षात असावे की, ओमायक्रोनचा संसर्ग दर डेल्टाच्या तुलनेत ६-८ पट जास्त असू शकतो. ज्यासाठी विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. या अभ्यासाविषयी अधिक तपशीलवार जाणून घेऊया. (Delta vs omicron)

मुलांमध्ये गंभीर प्रकरणांचा धोका कमी

मुलांमध्ये संसर्ग होण्याच्या जोखमीवरील या अभ्यासाचे निष्कर्ष जामा पेडियाट्रिक्स जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. मुलांमध्ये ओमायक्रोन आणि डेल्टाच्या संसर्गाशी संबंधित आरोग्य समस्या निर्धारित करण्यासाठी हा पहिला मोठ्या प्रमाणात केला गेलेला अभ्यास आहे. 

संशोधनात तज्ज्ञांना असे आढळून आले की, जरी मुले ओमायक्रोनची शिकार झाली असली, तरी त्यांच्यामध्ये गंभीर प्रकरणे वृद्धांपेक्षा कमी असली तरी  वेरिएंटचा संसर्ग दर उच्च असल्यामुळे मुलांना देखील संसर्गाचा धोका असतो. (Delta vs omicron)

संशोधनात काय आले समोर?

अमेरिकेतील केस वेस्टर्न रिझर्व्ह युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी पुढाकार घेऊन केलेल्या या संशोधनात टीमने यूएस मधील ६५१,६४०हून अधिक मुलांच्या इलेक्ट्रॉनिक आरोग्य नोंदींचे विश्लेषण केले. यामध्ये २२,७७२ पेक्षा जास्त मुलांना ओमायक्रोनचा संसर्ग झाल्याची नोंद आहे आणि सुमारे ६६,००० मुलांना डेल्टा प्रकाराची लागण झाली आहे. अनेक पॅरामीटर्स घेतलेल्या या अभ्यासात असे आढळून आले की, ओमायक्रोनची लागण झालेल्या बहुतेक मुलांचे सरासरी वय दीड वर्षे होते. (Delta vs omicron)

रुग्णालयात दाखल करण्याची गरज कमी

संशोधकांनी अभ्यासाच्या आधारे सांगितले की, डेल्टाच्या तुलनेत, ओमायक्रोन संक्रमित मुलांना आपत्कालीन कक्षात दाखल करण्याची गरज १६ टक्के कमी असल्याचे आढळून आले. तर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्याची गरज ८५ टक्के कमी असल्याचे दिसून आले. 

=======

हे देखील वाचा – सावधान! कोरोना परत आलाय… चीनमध्ये!

=======

डेल्टा-संक्रमित मुलांपैकी ३.३ टक्के मुलांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता असताना, ओमायक्रोन – संक्रमित मुलांमध्ये ही संख्या १.८ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. (Delta vs omicron

महत्त्वाचे म्हणजे, जागतिक स्तरावर कोरोनाच्या सर्व नवीन प्रकारांच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, शास्त्रज्ञ या अभ्यासाच्या निकालांना चांगले संकेत मानत आहेत.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.