दिल्लीतीली दारु घोटाळ्यासंबंधित आर्थिक तपास यंत्रणा ईडीने आपल्या चार्जशीटमध्ये उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया, संजय सिंह यांच्यासह तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या मुलीवर ही आरोप लावले आहेत. हैदराबाद मध्ये केसीआर यांची मुलगी कलवकुंतला कविताच्या बंजारा हिल्स येथील निवासस्थानी जेव्ही सीबीआय पोहचली तेव्हा शहरात त्यांच्या समर्थनार्थ पोस्टर लावण्यात आले. ”एका योद्ध्याची मुलगी कधीच घाबरणार नाही” अशा आशयाचे ते पोस्टर्स होते. आता पुन्हा एकदा दक्षिण भारतातील राजकरण तापले आहे.(Delhi Liquor Policy Case)
मनीष सिसोदिया यांचे कथीत मित्र आणि गुरुग्राम मधील व्यावसायिक अमित अरोडा यांच्या रिमांड कॉपीच्या माध्यमातून ईडीचा तपास कविता यांच्या पर्यंत पोहचला. तपास पुढे गेला तेव्हा समीर महेंद्रु यांची कंपनी इंडो स्पिरिट्स फर्ममध्ये कविता यांची हिस्सेदारी असल्याचे समोर आले. त्यानंतर आणखी असे कळले की, १०० कोटींच्या लाचचे प्रकरण.
१०० कोटींची लाच?
ईडीने आपल्या चार्ज शीटमध्ये आम आदमी पार्टीसह तेलंगणाचे मुखमंत्री केसीआर म्हणजेच चंद्रशेखर राव यांच्या मुलगी आणि के कविता हिच्यावर आरोप लावले आहेत. के कविता तेलंगणात आपल्या वडिलांचा पक्ष टीआरएसमध्ये एमएलसी आहे. इंडियन एक्सेप्रेसच्या एका रिपोर्ट्सनुसार, कवितावर असा आरोप लावण्यात आला आहे की, तिने काही लोकांसह मिळून आपच्या विजय नायर यांना १०० कोटींची लाच दिली होती. त्या काही लोकांमध्ये राघव मगुन्टा, एमएस रेड्डी आणि सरथ रेड्डी यांच्या नावाचा समावेश आहे.
ईडीच्या आरोपांनुसार, दिल्ली सरकारकडून नव्या दारु संबंधित निती आणल्यानंतर कविता सुद्धा दिल्लीतील दारुच्या व्यवसायात सहभागी होती. ईडीचा असा ही आरोप आहे की, इंडो स्पिरिट्स फर्मचे मालक व्यावसायिक समीर महेंद्रु, साउथ ग्रुपची कविता आणि आप नेता विजय नायर यांच्यामध्ये संपूर्ण कट होता. आरोप असा आहे की, इंडो स्पिरिट्स फर्म बद्दल समीर महेंद्रु यांच्या कडून अरुण पिल्लई, के कविता, राघव मगुन्टा, एमएसआर, अभिषेक बोइनपल्ली, बुच्ची बाबू यांच्यासोबत पार्टनरशिप केली होती.(Delhi Liquor Policy Case)
फर्ममध्ये ६५ टक्के हिस्सेदारी?
ईडीने आपल्या चार्जशीटमध्ये असे म्हटले आहे की, आप नेत्यांना त्यांचे प्रतिनिधी विजय नायर यांच्या माध्यमातून आधीच काही पैसे दिले गेले होते. अरुण, अभिषेक आणि बुच्ची बाबू दिल्लीत सरत रेड्डी, एमएस आणि के कविता यांच्यासाठी फिल्डिंग करत होते. दिल्ली सरकारकडून न्यू लीकर पॉलिसी सुरु केल्यानंतर इंडो स्पिरिट्स फर्मची दिल्ली प्रमुख भुमिका होती.
ईडीचा असा आरोप आहे की, खासदार एमएस रेड्डी यांच्यासह समीर महेंद्रु यांची फर्म इंडो स्पिरिट्स मध्ये कविता हिची सुद्धा ६५ टक्के हिस्सेदारी होती. फर्ममध्ये कविताचा हिस्सा अरुण पिल्लई याच्या माध्यमातून झाला होता.
अरुण पिल्लईने खुलासा केला आहे की, समीर महेंद्रुने इंडो स्पिरिट्समध्ये ६५ टक्के हिस्सेदारी दिली कारण विजय नायरने त्याला पर्नोड रेकॉर्डचा थोक व्यापार देईल असे आश्वासन दिले होते. समीर महेंद्रुसह त्याची आणि सहकर्मचाऱ्यांच्या बातचीत दरम्यान हे सुद्धा स्पष्ट केले की, त्यांच्या व्यवसायात ६५ टक्के हिस्सेदारीचे नियंत्रण एमएस रेड्डी आणि सुश्री के कविताजवळ होती.
हे देखील वाचा- तमिळनाडू मधील मुख्यमंत्र्यांनी महिला बॉडीगार्ड ‘या’ कारणास्तव ठेवले
बातचीच-भेटीगाठी
ईडीचा आरोप आहे की, दारुच्या व्यवसायासंबंधित के कविता हिची बहुतांश वेळा बातचीत ही झाली. तसेच हैदराबाद येथील निवासस्थानी काही आरोपींसोबत भेटीगाठी सुद्धा झाल्या. ईडीनुसार अरुण पिल्लईने पुष्टी केली आहे की, त्याने कविता आणि समीर महेंद्रुसोबत फेसटाइम कॉल सुद्धा केला होता.
तसेच सप्टेंबर २०२१ मध्ये कविताने फेसटाइम वेळी समीर महेंद्रु याला शुभेच्छा दिल्या होत्या की, त्याच्यासोबत पार्टनरशिप करुन आनंदित आहे. याच वर्षात महेंद्रु, हैदराबाद येथील निवासस्थानी कविताला भेटण्यासाठी सुद्धा आला होता. कविताने समीरला त्यावेळी म्हटले होते की, तिच्या परिवाराप्रमाणेच तो आहे. तसेच अरुण पिल्लईसोबत व्यवसाय म्हणजेच माझ्यासोबत व्यवसाय असा त्याचा अर्थ होतो. कविताने म्हटले होते की, या पार्टनरशिप आणि नात्याचा विस्तार काही राज्यांमध्ये करुयात. तर अमित अरोडा याच्या रिमांड कॉपीच्या आधारावर ईडीला जे काही क्लू मिळाले होते त्यानुसार पुढे तपास जात काही गोष्टी हळूहळू उलगडू लागल्या, अशातच ईडीला केसीआर यांच्या मुलीच्या विरोधात चार्जशीट करण्यासाठी आधार मिळाला.