भारतीय क्रिकेटच्या इतिहासात क्रिकेटमध्ये अशा दोन घटना घडल्या त्याची चर्चा आजही होते आणि त्याचा धसका किंवा भीती आजही कायम आहे. पहिली म्हणजे चार्ली ग्रिफीदचा चेंडू नरी कॉन्ट्रॅक्टर यांना लागला आणि त्यांची क्रिकेट कारकीर्द संपली. तर दुसरी घटना म्हणजे क्रिकेटपटू रमण लांबा (Raman Lamba) याचे डोक्याला चेंडू लागल्यामुळे झालेले दुःखद निधन. रमण लांबा याचा जन्म २ जानेवारी १९६० मध्ये झाला. रमण लांबा हा अत्यंत आक्रमक फलंदाज होता. त्याचे टोपणनाव होते ‘रेम्बो’ कारण तो दिसण्यास काहीसा हॉलिवूडचा अभिनेता सिल्व्हेस्टर स्टॅलोन सारखा दिसत असे आणि स्टेलोंन याने साकारलेला रेम्बो जगप्रसिद्ध होता.
मी जेव्हा रमण लांबाला पाहिले तेव्हा मला त्या रेम्बो चा भास झाला. रमण लांबा बद्दल अनेक गोष्टी सांगता येतील त्यातील काही येथे बघू. रमण लांबा भारतीय संघासाठी सलामीला खेळण्यास येत असते त्याने ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान विरुद्ध खेळताना दोनदा शतकी भागीदारी केली होती. दुलीप ट्रॉफी मध्ये त्याने ३२० धावा केल्या परंतु त्याला ४०० धावा करावयाच्या होत्या पण तो ३२० धावांवर बाद झाला, तेव्हा तो इतका भडकला ड्रेसिंग रूममध्ये आल्यावर ड्रेसिंग रूमच्या काचा फोडल्या. आतापर्यंत भडकले की अशा काचा फोडण्याचे काम व्हीव्ह रिचर्ड्स करत असे म्हणत असत असो.
दुसरी घटना अशी आहे १९८४ मध्ये रमण लांबा इंग्लंडविरुद्ध लीड्स वर खेळत होता. तो त्या कसोटी सामन्यात के .श्रीकांत ऐवजी फिल्डींग करत होता तर रवी शास्त्री गोलंदाजी करत होता. श्रीकांत फिल्डवर परत आला पण रमण लांबाला इन्फोर्म केले गेले नाही, झाले रवी शास्त्रीची ओव्हर टाकून झाली, संपूर्ण ओव्हर होईस्तोवर मैदानावर १२ खेळाडू होते, मग ही गोष्ट लक्षात आली आणि रमण लांबाला परत जावे लागले. रमण लांबाने पहिला एकदिवसीय सामना ७ ऑक्टोबर १९८० रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला तर शेवटचा एकदिवसीय सामना २२ डिसेंबर १९८९ रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळला खेळला, एकदिवसीय सामन्यात त्याची सर्वोच्च धावसंख्या होती ५३ धावा. तर त्याने ३२ एकदिवसीय सामन्यात एकूण ७८३ धावा केल्या. त्यात त्याची सर्वोच्च धावसंख्या होती १०२ धावा. त्याने ४ कसोटी सामन्यात १०२ धावा, त्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या होती ५३ धावा.
त्यावेळी आजच्या इतके कसोटी सामने होत नसत परंतु फर्स्ट क्लास क्रिकेट खूप खेळले जात असे. रमण लांबाने १२१ फर्स्ट क्लास क्रिकेट सामन्यात १७५ इंनिंग्ज मध्ये ५३.८४ च्या सरासरीने ८७९२ धावा केल्या त्यात ३१ शतके आणि २७ अर्धशतके होती. तर त्याची सर्वोच्च धावसंख्या होती ३२० धावा. ऑस्ट्रेलियात झालेल्या सामन्यात त्याने एकूण २७८ धावा केल्या त्यामुळे त्याला मॅन ऑफ द सिरीज घोषित केले. त्या मालिकेत त्याच्या धावा होत्या ६४, ०१, २० नाबाद, ७४, १७ आणि १०२ धावा.
२० फेब्रुवारी १९९८ रोजी वंगबंधू स्टेडियम मध्ये ढाका क्रिकेट क्लब सामन्यात खेळताना फलंदाज मेहराब हुसेन याने सणसणीत फटका मारला आणि चेंडू रमण लांबा यांच्या डोक्याला लागला तो फलंदाजजवळच फिल्डींग करत होता, त्यावेळी त्याने हेल्मेट घातले नव्हते, तो मैदानावर कोसळला, त्वरित त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले परंतु २३ फेब्रुवारी १९९८ रोजी त्याचे निधन झाले.
क्रिकेट हा खरे तर अत्यंत क्रूर खेळ आहे असे बापू नाडकर्णी नेहमी म्हणत असत त्याचे प्रत्यंतर क्रिकेट विश्वाला आले त्यावेळी संपूर्ण क्रिकेट विश्व हादरले होते त्यानंतर किम हयूजेसची घटना घडली. परंतू त्यावेळी त्याने हेल्मेट घातले हो
लेखक – सतीश चाफेकर.