आपण दिवसभरात जे काही काम करतो तेव्हा वेळोवेळी घड्याळ पाहतो. वेळ त्याच्या वेगाने चालत राहते. जगातील असे काही देश आहेत जे वर्षभरात दोन वेळेस घड्याळ्याची वेळ सेट करतात. या देशांमध्ये घड्याळाचा वेग जवळजवळ १ तास पुढे किंवा मागे असतो. ऐवढेच नव्हे तर, हा कोणताही चमत्कार नाही तर असे मुद्दाम केले जाते. खरंतर असे कणे डेलाइट सेविंग टाइमच्या आधारावर समजले जाते. खरंतर ही सिस्टिम समजून घेणे काही मुश्किल काम नाही. अमेरिकेसह जगातील अन्य काही देशांमध्ये सुद्धा एकदा तरी घड्याळाची वेळ ही १ तास पुढे केली जाते. त्यानंतर पुन्हा एक तास मागे केली जाते. तर जाणून घेऊयात असे का केले जाते? (Daylight Saving Time)
सुर्यप्रकाशाचा फायदा घेण्याचा होता उद्देश
जुन्या काळात असे मानले जात होते की, ही प्रक्रिया वापरुन सकाळच्या प्रकाशाचा अधिकाधिक वापर केला जाऊ शकतो. यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त कामांसाठी वेळ मिळत होता. परंतु वेळेसह धारणा बदलली आणि आता या सिस्टिमला वीजेचा वापर करमी करण्याच्या उद्देशाने वापरले जाते. उन्हाळ्याच्या दिवशी घड्याळ एक तास मागे केल्याने सकाळच्या प्रकाशाचा अधिकाधिक वापर केला जाऊ शकतो. मानसिक रुपात एक तास अधिक मिळतो अशी संकल्पना आहे.
या देशात असे होते
सकाळच्या प्रकाशाचा अधिकाधिक वापर करण्यासाठी जगातील जवळजवळ ७० देशांमध्ये ही सिस्टिम वापरली जाते. दरम्यान, भारत आणि बहुतांश मुस्लिम देशांमध्ये त्याचा वापर करण्यात येत नाही. अमेरिकेसह जगभरातील ७० देशांमध्ये ८ महिन्यांसाठी घड्याळ १ तास पुढे चालते आणि उर्वरित ४ महिने पुन्हा एक तास मागे केले जाते. अमेरिकेत मार्च महिन्याच्या दुसऱ्या रविरावीर घड्याळाची वेळ एक तास पुढे केली जाते आणि नंतर नोव्हेंबरच्या पहिल्या रविवारी पुन्हा एक तास मागे केली जाते. खरंतर अमेरिकेच्या राज्यात ही सिस्टिम मानण्यासाठी कायदेशीर नाही. परंतु युरोपीयन युनियनमध्ये सहभागी असलेले देश ही सिस्टिम वापरतात. (Daylight Saving Time)
हे देखील वाचा- पाकिस्तानमध्ये सध्या सर्वत्र ब्लॅकआऊट
डेलाइट सेविंग टाइमचा फायदा
ही सिस्टिम वापरण्यामागे असे कारण होते की, एनर्जीचा वापर कमी करणे. परंतु विविध अभ्यासात विविध आकडे समोर आले. त्यामुळे या सिस्टिमवर नेहमीच वाद सुरु राहिला. वर्ष २००८ मध्ये अमेरिकेतील एनर्जी विभागाने असे सांगितले होते की, या सिस्टिमच्या माध्यमातून जवळजवळ ०.५ टक्के विजेची बचत झाली होती. परंतु आर्थिक रिसर्चच्या नॅशनल ब्युरोने त्याच वर्षात एका अभ्यासात असे म्हटले होते की, याच कारणास्तव वीजेची मागणी वाढली आहे.