Home » दाऊद माझा नातेवाईक…

दाऊद माझा नातेवाईक…

by Team Gajawaja
0 comment
Dawood Ibrahim
Share

होय मी दाऊद इब्राहिमचा नातेवाईक आहे.  दाऊदचा नातेवाईक असल्याचा मला अभिमान आहे.  दाऊदची मुलगी माझी सून आहे.  दाऊदच्या कुटुंबाबरोबर माझा नातेसंबंध झाला आहे, ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे… हे बोल आहेत.  अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा मेहुणा असलेल्या जावेद मियांदादचे.  जावेद हा पाकिस्तानचा माजी क्रिकेट खेळाडू आहे. एका युटूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये जावेद मियांदादनं दाऊद इब्राहिम सोबतच्या नातेसंबंधाची जाहीर कबुली दिलीच आहे.  शिवाय दाऊदने आपल्या समाजासाठी अनेक चांगली कामे केली आहेत.  त्याच्या नात्याचा मला अभिमान असल्याचे सांगून एकप्रकारे भारताला डिचवले असल्याची चर्चा सुरु झाली आहे.  (Dawood Ibrahim)

पाकिस्तानचा माजी क्रिकेट खेळाडू जावेद मियांदादनं एका युटूब चॅनलला दिलेली मुलाखत सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.  या मुलाखतीमध्ये जावेदनं अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे प्रचंड कौतुक केले आहे.  जावेदच्या मुलानं दाऊदच्या मुलीसोबत लग्न केले आहे.  यामुळे एकमेकांचे नातेवाईक झालेल्या जावेद आणि दाऊद यांचे मैत्रिपूर्ण संबंध आहेत.  मात्र या नात्याआगोदर आपण एकमेकांना ओळखत होतो, असा दावाच या क्रिकेटपट्टूने केला आहे.  त्यामुळे आता पाकिस्तानच्या क्रिकेट संघावर कोणाचे वर्चस्व आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.  पाकिस्तानच्या क्रिकेट संघावर दाऊद आणि त्याच्यासारख्याच दहशतवाद्यांचे नियंत्रण असल्याची चर्चा या मुलाखतीच्या निमित्तानं सुरु झाली आहे.  

दाऊद हा मुंबईत मार्च 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड आहे. 2003 मध्ये, भारत आणि युनायटेड स्टेट्स सरकारने दाऊदला “जागतिक दहशतवादी” घोषित केले. दाऊद भारताच्या मोस्ट वॉन्टेड लिस्टमध्ये आहे.  मुंबई बॉम्बस्फोटाला अनेक वर्ष झाली तरी त्याच्या खुणा अद्यापही मुंबापुरीच्या मनावर आहेत. याशिवाय दाऊदने बॉलिवूड आणि मुंबईतील बांधकाम व्यवसायातूनही करोडोंची माया जमवल्याचा आरोप आहे.  भारताचा एक नंबरचा शत्रू असलेल्या या दाऊदच्या मुलीसोबत पाकिस्तानचा क्रिकेट खेळाडू जावेद मियांदाद यांचा मुलगा जुनैद याचा विवाह झाला आहे.  दाऊदची मुलगी माहरुख आणि जुनैद यांचे 19 वर्षांपूर्वी लग्न झाले.  2005 मध्ये दुबईत झालेला हा विवाह सोहळा अनेक दिवस गाजत होता.  आतून जावेद दाऊदचा नातेवाईक झाला.  याच दावेदनं आता एका मुलाखतीमध्ये दाऊदचा एवढा उदो उदो केला आहे की, त्याच्या मते दाऊदचे नाव भविष्यात सोन्याच्या अक्षरांनी लिहिले जाईल.  एवढे चांगले काम दाऊदने केले आहे. मुलाखतीमध्ये जावेद मियांदाद सांगतो की,  दाऊदबद्दल लोकांच्या मनात गैरसमज आहेत.  भारतातील लोक त्याच्याबद्दल विचार करतात तसा तो नाही. दाऊदला समजणे सोपे नाही.  दाऊदने त्याच्या समाजासाठी मोठे काम केल्याची पुष्ठीही मियांदाद पुढे जोडतो.  (Dawood Ibrahim)

दाऊदच्या मुलीचे कौतुक करताना जावेद मियांदाद सांगतो की,  माझी सून माहरुख खूप शिकलेली आहे. तिने कॉन्व्हेंट शाळेतून शिक्षण घेतले आणि नंतर प्रसिद्ध विद्यापीठातून पुढील शिक्षण घेतले आहे. दाऊद इब्राहिमचा नातेवाईक असण्याचा सन्मान मोठा असल्याचेही जावेद मियांदाद सांगतो.  आमचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. या मैत्रीमुळे आम्ही आनंदी असल्याचेही जावेदनं सांगितले आहे.  पाकिस्तानी पत्रकार हसन नसीर यांना दिलेल्या मुलाखतीत जावेद मियांदादने हे वक्तव्य केले आहे.

जावेद मियादांद हे पाकिस्तानच्या क्रिकेटमधील मोठे नाव आहे.  दाऊद गेल्यावर्षा अखेर मृत झाल्याची बातमी आली होती.  त्याला विषबाधा झाल्याची बातमी होती.  तसेच त्याच्यावर कराचा येथील रुग्णालयात उपचार सुरु असल्याचीही बातमी होती.  तेव्हाही दाऊद नंतर सर्वात चर्चा होती ती जावेद मियांदादच्या नावाची.  कारण दाऊदच्या कराचीमधील महल वजा बंगल्यामध्ये कधीही जाऊ शकणारी निवडक मंडळी आहेत.  त्यात जावेद मियांदाद हे प्रमुख नाव आहे.  त्यामुळेच दाऊदबद्दल जावेदला प्रत्येक बित्तमबातमी असते.  दाऊद मृत झाल्याची बातमी आल्यावर सर्वात आधी पत्रकारांनी जावेद मियांदादला घेराव घातला होता.  (Dawood Ibrahim)

===========

हे देखील वाचा : पुतीन यांनी दिला ‘बचके रेहना रे बाबा..’ असा इशारा

==========

मात्र त्यावेळी कुठलेही वक्तव्य न करणा-या जावेदनं आता दुबईमध्ये बसून एक मुलाखत दिली आहे.  या मुलाखतीमध्ये त्यानं दाऊदचे कौतुक केले आहे.  ही मुलाखत आल्यावर त्याच्यावर अनेकांनी टिका केली आहे.  भारतीयांना चिडवण्यासाठीच जावेदनं दाऊदची स्तुती केल्याचे बोलले जाते आहे.  तर मध्यंतरी दाऊद मृत झाल्याची बातमी आली, ती खोटी असल्याचा मेसेज देण्यासाठीच ही मुलाखत झाल्याची चर्चाही सुरु आहे.  यातील खरेखोटे बाजुला ठेवले तर मुंबई बॉम्बस्फोटाच्या जखमेवर मात्र मिठ चोळले आहे.  

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.