Home » Dawood Ibrahim : आता दाऊदचे नाव चर्चेत आले… !

Dawood Ibrahim : आता दाऊदचे नाव चर्चेत आले… !

by Team Gajawaja
0 comment
Dawood Ibrahim
Share

लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक आणि मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड दहशतवादी हाफिज सईद आणि त्याचा भाचा अबू कटाल यांच्यावर पाकिस्तानात गोळीबार झाला. त्यात जमात-उद-दावाचा प्रमुख असलेला दहशतवादी अबू कटाल मारला गेला. झिया-उर-रहमान उर्फ ​​नदीम उर्फ ​​अबू कटाल उर्फ ​​कटाल सिंधी यानं भारतात अनेक दहशतवादी हल्ले केले आहेत. या मोस्ट वॉन्टेट दहशतवाद्यावर मोटारसायकलवरुन आलेल्या अज्ञान हल्लेखोरांनी वीसहून अधिक गोळ्या झाडल्या. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. हा हल्ला झाला तेव्हा अबू कटालसोबत लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक हाफिज सईदही असल्याचा दावा आता पाकिस्तानी मिडियामधून करण्यात येत आहे. हाफिज सईदही या हल्ल्यात जखमी झाला असून त्याला पाकिस्तानमधील लष्करी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. (Dawood Ibrahim)

काही माध्यामांमध्ये तर हाफिज सईदही या हल्ल्यात ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. एकीकडे बलुची सैन्यानं चालू केलेल्या हल्ल्यामुळे बेजार झालेल्या पाकिस्तानी सरकारला आणखी एक चिंता सतावू लागली आहे. कारण हाफिजवरील झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये लपून बसलेला भारताचा सर्वात मोठा दुष्मन दाऊद इब्राहिम याचे नाव पुढे आले आहे. हाफिज नंतर पाकिस्तानानं आश्रय दिलेल्या दाऊदला आता असेच मारण्यात येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. पाकिस्तानमध्ये असलेल्या हाय-प्रोफाइल दहशतवाद्यांमध्ये दाऊदचे नाव सर्वात पुढे आहे. हाफिज सईदनंतर आता दाऊदचा नंबर कधी लागणार असे प्रश्न विचारण्यात येऊ लागले आहेत. पाकिस्तानमध्ये होत असलेल्या हदशतवाद्यांवरील हल्ल्यामध्ये फरार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचे नावही चर्चेत आले आहे. फरार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटांचा मास्टरमाइंड आहे. (International News)

भारतात कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी दाऊद पाकिस्तानात पळून गेला. तो कराचीमध्ये असल्याचा पुरावा भारतानं पाकिस्तानला अनेकवेळा दिला तरी पाकिस्ताने दाऊद कराचीत असल्याचे कायम नाकारले आहे. कराचीमध्ये दाऊदला पाकिस्तानी लष्कराचे संरक्षणही असल्याची माहिती आहे. 1993 मध्ये मुंबईत झालेले 12 बॉम्बस्फोट, ही तमाम भारतीयांच्या ह्दयावरील वाहती जखम आहे. 12 मार्च 1993 मध्ये हिंदू बहुल भागात झालेल्या या बॉम्बस्फोट मालिकेत 257 नागरिकांचा मृत्यू झाला तर 1400 जण जखमी झाल्याची नोंद आहे. डि-कंपनीचा सर्वेसर्वा दाऊद इब्राहिम याने त्याचा साथीदार टायगर मेनन याला हाताशी धरुन हे स्फोट केले आणि दाऊद पाकिस्तानात पळून गेला. तेव्हापासून भारतीय सरकार पाकिस्तानकडे दाऊदची मागणी करत आहे. कराचीत अतिशय आलिशान बंगल्यात दाऊदचा मुक्काम आहे. हा सर्व भाग लष्कराच्या ताब्यात आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांकडे दाऊदचा अलिकडचा फोटोही उपलब्ध नाही. मात्र आता पाकिस्तानात भारतामध्ये दहशतवादी हल्ले करणा-या दहशतवाद्यांना अज्ञातांकडून मारण्यात येत आहे. (Dawood Ibrahim)

त्यामुळे दाऊदच्या गोटातही खळबळ उडाल्याची माहिती आहे. नुकतीच ज्या अबू कटालची हत्या झाली, त्यालाही लष्कराचे संरक्षण होते. मात्र तरीही त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. आता यापुढचा नंबर दाऊदचा असल्याच्या बातम्या पाकिस्तानी सोशल मिडियावर येऊ लागल्या आहेत. आत्तापर्यंत पाकिस्तानमध्ये अनेक दहशतवादी ठार करण्यात आले आहेत. हाफिज सईदलाही गोळ्या लागल्याची बातमी आहे. जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मौलाना मसूद अझहरचा जवळचा सहकारी मौलाना रहिमउल्लाह तारिक याचीही अज्ञात बंदूकधाऱ्यांनी हत्या केली आहे. 2023 मध्ये झालेल्या या हत्येनंतर पाकिस्तानमध्ये एकापाठोपाठ एक दहशतवादी हल्ला करुन ठार कऱण्यात आले. यापूर्वी खैबर पख्तूनख्वामध्ये लष्कर कमांडर अक्रम गाझी मारला गेला होता. त्यानंतर जम्मू-काश्मीरमधील संजवान हल्ल्याचा मास्टरमाइंड ख्वाजा शाहिद यालाही मारण्यात आले. (International News)

=============

हे देखील वाचा : Vanuatu : हा वानुआतु नावाचा देश नेमका आहे तरी कुठे..

Devendra Fadanvis : भोंग्यांचं राजकारण पुन्हा महाराष्ट्रात होणार ?

=============

या सर्वांवर भारतात दहशतवादी हल्ले घडवल्याचा आरोप होता. हे सर्व दहशतवादी पाकिस्तानात मोकळेपणे फिरत होते. तर काहींना पाकिस्तानी लष्करानेच संरक्षण दिले होते. शिवाय या सर्वांची वैयक्तिक सुरक्षाही असते. मात्र या सर्वांनंतर अज्ञात हल्लेखोरांना दहशतवादी कुठे, कधी आणि कसे येणार आहेत, याची माहिती होती. या सर्व दहशतवाद्यांना मारणारे गाडीवरुन येत आहेत, आणि सर्वांसमोर या दशतवाद्यांवर गोळ्या झाडून निघून जात आहेत. आत्तापर्यंत यापैकी एकाही हल्लेखोरांना पकडण्यात पाकिस्तानी सरकारला यश आलेले नाही. त्यामुळे या सर्वामागे पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयचाही हात असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. या संघटनेच्या मार्फतच दहशतवाद्यांचा गुप्त असलेला ठावठिकाणा अज्ञात हल्लेखोरांना समजत असल्याची चर्चा आहे. आता अशाच पद्धतीतून दाऊद इब्राहिमचाही ठावठिकाणा लागला असून त्याचा पुढचा नंबर असल्याच्या बातम्या खुद्द पाकिस्तानी सोशल मिडियामध्ये देण्यात येत आहे. (Dawood Ibrahim)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.