Home » सासू-सुनेमधील नाते अधिक घट्ट होण्यासाठी ‘या’ टीप्स जरुर पहा

सासू-सुनेमधील नाते अधिक घट्ट होण्यासाठी ‘या’ टीप्स जरुर पहा

by Team Gajawaja
0 comment
Daughter-Mother in law bonding
Share

सासू-सुनेमधील नाते कसे असते हे आपल्या सर्वांनाच माहिती असते. या नात्याची घडी पटकन बसत नाही. तुम्ही सुद्धा तुमच्या घरी पाहिले असेल की, सासू आणि सुना एकमेकांसोबत कश्या पद्धतीने वागतात. बहुतांश वेळेस सासू-सुनेमधील भांडणाची थट्टा उडवली जाते. मात्र असे सर्वांसोबत होईलच असे नाही. काळासोबत लोक बदलतात. आता सासू आणि सुनेच्या नात्यातील कटवटपणा दूर करण्याचा पूरेपूर प्रयत्न केला जातो. सासू आपल्या सुनेच्या भावना काही वेळेस समजून ही घेते. तसेच सून ही आपल्या आई प्रमाणे सासूची काळजी घेते. दरम्यान हे नाते तेव्हाच उत्तम होते जेव्हा दोन्ही बाजूंनी समान प्रयत्न केला जातो. जर तुम्ही सुद्धा लहान-लहान गोष्टींची काळजी घ्याल तर तुमच्यामधील आणि सासू मधील नाते ही अधिक मजबूत होण्यास मदत होईल. (Daughter-Mother in law bonding)

सन्मान करा
कोणत्याही नात्यात एकमेकांचा आदर, सन्मान करणे फार गरजेचे असते. अशातच सासू-सुनेच्या नात्यात हे तर फारच महत्वाचे असते.जर तुम्ही तुमच्या सासूला सन्मान द्याल तरच तुम्हाला तिच्याकडून मुलीसारखेप प्रेम मिळेल. तुम्ही कधी ही सासूच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करु नका.

धैर्यवान व्हा
सासू-सुनेच्या नात्यात शांति प्रिय आणि धैर्यवान असणे फार गरजेचे असते. जर तुम्हाला तुमच्या सासू सोबत नाते अधिक घट्ट करायचे असेल तर तुम्हाला धैर्यवान व्हावेच लागेल. जर तिने एखादी गोष्ट रागात बोलली तरीही तुम्ही काहीवेळेस ती शांतपणाने घ्या. त्यांच्या नजरेत तुमचा सन्मान वाढेल असे वागा.

-दोघांनी एकमेकांची तारीफ करा
सासू-सुनेने एकमेकांची तारीफ जरुर केली पाहिजे. बहुतांश सासू अशा करत नाहीत. जेव्हा तुम्ही कोणत्याही नात्यात चांगल्या ऐवजी वाईट गोष्टी शोधू लागता तेव्हा नात्यात दूरावा येतो आणि कालांतराने फूट पडते. सासू-सुनेच्या नाते अधिक उत्तम बनवण्यासाठी तुम्ही एकमेकांची प्रशंसा जरुर केली पाहिजे. (Daughter-Mother in law bonding)

-मुलीप्रमाणे प्रेम करा
जेव्हा सासू घरात आलेल्या सुनेला परके मानून व्यवहार करत असेल तर नाते कधीच व्यवस्थितीत टिकणार नाही. त्यामुळे जर तुम्हाला सुनेसोबत नाते उत्तम करायचे असेल तर तिला तुमच्या मुलीप्रमाणेच वागवा. त्याचसोबत सुनेने ही आपल्या सासूला आईप्रमाणे वागवावे. तरच दोघांमधील नाते अधिक घट्ट होऊ शकते.

हे देखील वाचा- धावपळीच्या आयुष्यात महिलांनी अशा पद्धतीने दूर करा मानसिक थकवा

-सासुची काळजी घ्या
आजकाल प्रत्येकजण आपल्या कामात व्यस्त असतो. अशातच तुम्ही सासूसाठी दिवसभरातील थोडा वेळ काढा. यामुळे तुमच्या दोघांमधील प्रेम कालांतराने वाढेलच. पण तिची विचारपूस ही करा. तिची काळजी घ्या. वेळोवेळी तिच्या गरजा लक्षात घ्या.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.