मार्गशीर्ष महिन्यातील अतिशय महत्त्वाचा सण म्हणजे ‘दत्त जयंती’. मार्गशीर्ष महिना श्रावण महिन्यासारखा महत्त्व आणि पवित्र मानला जातो. याच मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा तिथीला दत्त जयंती साजरी करण्यात येते. हिंदू धर्मात भगवान दत्तात्रेय यांना ब्रह्मा, विष्णू आणि शिव या तीन त्रिमूर्तींचे रूप मानले जाते. पौराणिक मान्यतानुसार भगवान दत्तात्रेय विष्णूचा सहावा अवतार मानला जातो. भगवान दत्तात्रेय हे तीन प्रकारांमुळे कलियुगातील देवता मानले जातात. यंदा मार्गशीर्ष पौर्णिमा गुरुवार ४ डिसेंबर २०२५ रोजी असल्याने याच दिवशी दत्त जयंतीचा उत्सव साजरा केला जाईल. (Audumber Tree)
सद्गुरू दत्तात्रयांचे नाव घेतले की डोळ्यासमोर येते ती औदुंबराच्या झाडाखाली विसावलेल्या दत्ताची शांत, प्रसन्न, तेजस्वी प्रतिकृती. औदुंबराचे झाड हे दत्त महाराजांशी संबंधित असलेल्या महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक मानले जाते. याच झाडामध्ये कायम सर्वदूर दत्त वास करतात अशी मान्यता आहे. दत्त संप्रदायामध्ये या औदुंबराच्या झाडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. २१ गुणांनी परिपूर्ण अशा या औदुंबर वृक्षाखाली सद्गुरु दत्तांनी साधना केली होती. औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष देखील म्हटले जाते. याचे मुख्य कारण म्हणजे, भगवान विष्णूंनी औदुंबराच्या झाडाला आशीर्वाद दिला आहे की, या झाडाला सदैव फळे येतील. (Datta Jayanti)
औदुंबराच्या झाडाचे पूजन मनोभावे केल्यास भक्ताच्या सर्वच इच्छा पूर्ण होतील. औदुंबराच्या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होते. शिवाय या झाडाची नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्यप्राप्ती देखील होते. औदुंबराच्या सेवेने जन्म जन्मांतरीची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती होते. याच दिव्य अशा औदुंबराच्या झाडाखाली स्वतः दत्तात्रेय श्री गुरुमूर्तींनी देखील नृसिंह मंत्राची उपासना केली होती. औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जेवू घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवू घातल्याचे फळ मिळते. शिवाय याच औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणांनी त्याची फळे मिळतात. औदुंबर वृक्षातळी निर्मळ मनाने एक चित्ताने एकादशनी रूद्र केला असता अतिरूद्र केल्याचे फळ मिळते. (Todays Marathi Headline)

औदुंबराच्या झाडाच्या पूजेचा एक ठराविक दिवस नसला तरी नवग्रहांमध्ये हा एक प्रमुख वृक्ष आहे. या झाडावर शुक्राचे राज्य मानले जाते आणि ते वृषभ आणि तूळ राशीचे प्रतिनिधी वृक्ष आहे. या झाडाचे अनेक फायदे आहेत, ज्याबद्दल सर्वसामान्यांना माहिती नाही. या झाडाची फळे, पाने, मुळे इत्यादींचा उपयोग अनेक रोग बरे करण्यासाठी तर होतोच, पण ग्रहांमुळे होणारे अनेक दोष दूर होतात. औदुंबराच्या मंद गतीने प्रदक्षिणा केल्यावर मोठे पुण्य जमा होते. या झाडाच्या एक लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोग सारखे भयंकर रोग देखील जातात. औदुंबराच्या सावलीत जपानुष्टान केल्याने अध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंत पटीने फळ मिळते. औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागिरथी नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळते. औदुंबराची सेवा केल्याने धन, धान्य, संपत्ती, आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होतं. (Top Trending News)
भक्त प्रल्हाद आणि सामान्य जनतेला वाचवण्यासाठी भगवान विष्णूंनी नरसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपू राक्षसाचा नाश केला. भगवान नरसिंह यांनी हिरण्यकश्यपूला घराच्या उंबरठ्यावर नेले आणि आपल्या मांड्यांवर घेऊन त्यांच्या तीव्र आणि धारदार नखांनी त्याचे पोट फाडले. परंतु त्या दैत्याच्या पोटातील कालकूट विष त्या नृसिंहरूपी विष्णूंच्या नखांत भरले. आणि त्यांच्या नखांचा दाह होऊ लागला. यावर देवी महालक्ष्मीने जवळच्याच औदुंबराची पिकलेली फळे आणून त्यात श्री नृसिंहंना आपली नखे खूपसावयाला सांगितले. (Top Stories)
========
Mokshada Ekadashi 2025: सकाळपासून संध्याकाळपर्यंत भद्रा व पंचकाचा साया पूजा कधी करावी?
========
या उपायाचा परिणाम झाला आणि नृसिंहांच्या नखांचा दाह शांत झाला. याने उग्ररूप नरसिंह शांत झालस. तेव्हा विष्णु देवी लक्ष्मीवर प्रसन्न झाले आणि त्यांनी औदुंबराला आशीर्वाद दिला- की हे औदुंबर वृक्ष, आपल्यावर सदैव फळे येतील. आपले नाव कल्पवृक्ष असे प्रसिध्द होतील आणि आपली पूजा, सेवा करणार्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. आपल्या दर्शनमात्रने उग्रता शांत होईल. आपल्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्यप्राप्ती होईल. याच कारणामुळे औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
