Home » Dussehra : ऋषी पुत्र असूनही कसा झाला रावण राक्षस? त्याच्या जन्माची आख्ययिका

Dussehra : ऋषी पुत्र असूनही कसा झाला रावण राक्षस? त्याच्या जन्माची आख्ययिका

by Jyotsna Kulkarni
0 comment
Dussehra
Share

उद्या विजयादशमी अर्थात. नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणून दसरा ओळखला जातो. हिंदू धर्मातील अतिशय पवित्र समजल्या जाणाऱ्या साडे तीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त म्हणजे ‘विजयादशमी’. या दिवशीच आदिशक्तीच्या महिषासुराचा वध केला. यासोबतच विजयादशमीचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी रावण दहन करण्याची प्रथा आहे. या दिवशी भगवान रामाने रावणाचा वध करून अधर्मावर धर्माचा विजय मिळवला. या कारणासाठी देखील दसऱ्याच्या खास ओळख आहे. आजही अनेक ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी रावण दहन करण्याची प्रथा आहे. (Ravan)

आज रावणाची ओळख एक विकृत रक्षण म्हणून आहे. रावणाने माता सीतेचे अपहरण केले आणि तिला त्याच्या लंकेत असलेल्या अशोक वाटिकेत कैद करून ठेवले होते. शेवटी रामाने रावणाचा अंत केला आणि रामराज्य स्थापित केले. मात्र असेअसले तरी रावणाची दुसरी बाजू देखील होती. रावण प्रचंड विद्वान होता तसेच राजधर्म जाणकार होता. शिव शंकराचा निस्सम भक्त असलेल्या रावणाने आपल्या मातृप्रेमापोटी आईला थेट आत्मलिंग भेट देण्यासाठी शंकरांना प्रसन्न केले होते. रावण हा महान विद्वान, प्रकांड पंडित, महाज्ञानी, राजकारणी, महाप्रतापी, महापराक्रमी योद्धा आणि बलशाली या नावांनी ओळखला जायचा. श्रीरामानंदेखील एकदा रावणाचा उल्लेख महाविद्वान असा केला होता. (Marathi News)

रावणाने त्याच्या कैदेत असलेल्या सीतेशी कधीही गैरवर्तन केले नाही. द्रावणामध्ये अनेक गुण होते, ज्याची रामाला देखील माहिती होती. म्हणूनच रामाने लक्ष्मणाला मृत्यू-शैय्येवर पडलेल्या रावणाजवळ राजधर्माचे रहस्य जाणून घेण्यासाठी पाठविले होते. अशा या रावणाच्या जन्माबद्दल तुम्हाला माहिती आहे का? कोण होते रावणाचे आईवडील? कसा झाला रावणाचा जन्म? चला जाणून घेऊया याबद्दल. (Todays Marathi News)

Dussehra

रावणाच्या जन्माची आख्ययिका
वाल्मिकी रामायणानुसार, रावण पुलत्स्य मुनीचे पुत्र महर्षि विश्रवा आणि राक्षसी कैकसीचा मुलगा होता. वाल्मिकी रामायणच्या उत्तरकांडातील वर्णनानुसार, पौराणिक काळात माली, सुमाली आणि मलेवण नावाचे अत्यंत क्रूर राक्षस भावंड होती. या तिन्ही भावांनी ब्रह्माची कठोर तपस्या केली, ज्यामुळे प्रसन्न होऊन ब्रह्मदेवाने त्यांना बलशाली होण्याचे वरदान दिले. (Ramayna News)

ब्रम्हाजींकडून वरदान मिळाल्यानंतर तिन्ही भावांनी स्वर्गलोक, पृथ्वीलोक आणि पाताळलोक येथील देवतांसहित ऋषी-मुनी आणि मानवांवर अत्याचार करण्यास सुरुवात केली. पण जेव्हा या तिन्ही भावांचा अत्याचार मोठ्या प्रमामात वाढला तेव्हा ऋषी-मुनी आणि देवता भगवान विष्णूकडे गेले आणि त्यांच्याकडे माली, सुमाली आणि मलेवण यांनी तिन्ही भावांच्या अत्याचाराचे वर्णन केले. (Latest Marathi Headline)

त्यानंतर भगवान विष्णूंनी त्यांना सांगितले की तुम्ही सर्व तुमच्या तुमच्या लोकात जावा आणि निर्भयपणे राहा. मी या दुष्ट राक्षसांचा नक्कीच विनाश करेन. दुसरीकडे, या तिन्ही भावांना याची माहिती मिळाली तेव्हा माली, सुमाली आणि मालवण यांनी त्याच्या सैन्यासह इंद्रलोकवर हल्ला केला. यानंतर भगवान विष्णू इंद्रलोकात आले आणि त्यांनी राक्षसांचा संहार करण्यास सुरवात केली. भगवान विष्णू रणक्षेत्रात आल्यानंतर काही क्षणानंतर सेनापती माली यांच्यासह अनेक भुते मारले गेले आणि बाकीचे लंकेकडे पळून गेले. (Dussehra News)

Dussehra

त्यानंतर, उर्वरित राक्षसांनी सुमालीच्या नेतृत्वात लंका सोडली आणि पाताळात स्थायिक झाले. युद्धामधील पराभवानंतर सुमाली आणि मलेवण आपल्या कुटुंबियांसमवेत बराच काळ पाताळात लपून राहिले. एके दिवशी सुमाली पृथ्वी लोकवर फिरायला आला आणि त्याने कुबेराला पाहिलं पण देवांच्या भीतीमुळे तो परत पाताळ लोककडे परत गेला. जेव्हा तो पाताल लोकल गेला तेव्हा त्याने विचार केला की देवांच्या भीतीमुळे आपल्याला किती काळ इथे राहावे लागेल? (Marathi Headline)

असा कोणता उपाय करावा की ज्यामुळे देवांवर विजय प्राप्त करता येईल. काही क्षणानंतर त्यांना कुबेर लक्षात आले. तेव्हा त्यांच्या मनात विचार आला की आपल्या मुलीचे लग्न ऋषी विश्रवाबरोबर केला तर, जेणेकरुन त्याला कुबेरासारखा तेजस्वी मुलगा सहज होईल. काही काळानंतर तीच कल्पना मनात ठेवून सुमाली आपली मुलगी कैकसीकडे गेले आणि तिला म्हणाले, “मुली, तू लग्नाच्या योग्य झाली आहेस, परंतु माझ्या भीतीमुळे कुणीही तुझा हात मागायला माझ्याकडे आला नाही. त्यामुळे राक्षस वंशच्या कल्याणासाठी माझी अशी इच्छा आहे की तू परमपराक्रमी महर्षि विश्रवाकडे जावून त्यांच्याशी विवाह करावा आणि पुत्र प्राप्त करावा. तोच पुत्र देवतांपासून आम्हा राक्षसांचं रक्षण करु शकतो”. (Top Marathi Headline)

राक्षसी असूनही कैकसी एक धार्मिक स्त्री होती. म्हणून कैकसीने आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करणे आपला धर्म मानले आणि लग्नासाठी संमती दिली. त्यानंतर कैकसीने तिच्या वडिलांना नमन केले आणि त्यांच्या आज्ञेनुसार महर्षि विश्रवांना भेटायला पृथ्वीवर गेली. पाताळलोकातून पृथ्वीलोकवर येण्यासाठी कैकसीला बराच वेळ लागला आणि जेव्हा ती महर्षि विश्रवांच्या आश्रमात पोहोचली तेव्हा संध्याकाळ झाली होती. त्यावेळी भनायक वादळी वारा वाहत होता. मुसळधार पाऊस पडत होता. आश्रमात पोहोचताल कैकसीने सर्वात आधी महर्षिंचे तरण स्पर्श केले आणि त्यांना आपल्या मनाची इच्छा सांगितली. (Latest Marathi News)

कैकसीची इच्छा जाणून घेतल्यानंतर, महर्षि विश्रवा म्हणाले, “हे भद्रे, मी तुमची इच्छा पूर्ण करेन, परंतु तुम्ही कुबेलामध्ये माझ्याकडे आल्या आहात म्हणून माझे मुलं क्रूर कृत्ये करणारे असतील, त्या राक्षसांचे स्वरुप देखील भयानक असेल.” महर्षि विश्रवाचे शब्द ऐकून कैकसीने त्यांना प्राणाम केला आणि म्हणाली “हे ब्राह्मण तुमच्यासारखे ब्राह्मणवादी युगात मी अशा दुष्ट मुलांचा जन्म नको आहे, म्हणून कृपया माझ्यावर दया करा. तेव्हा महर्षि विश्रवांनी कैकसीला सांगितले की तुमचा तिसरा मुलगा माझ्यासारखा धर्मात्मा असेल.” (Marathi Trending News)

=========

Navratra : घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

Navratra : शारदीय नवरात्र का साजरे केले जाते?

=========

काही दिवसांनी कैकसीने एका अत्यंत भयंकर आणि विभत्स राक्षस रुपी मुलाला जन्म दिला, ज्याचे दहा डोके होते. त्याचा शरीराचा रंग काळा होता आणि आकार डोंगरासारखा होता. म्हणूनच महर्षि विश्रवा यांनी कैकसीच्या जेष्ठ मुलाचं नाव दशग्रिव असे ठेवले. जो नंतर तिन्ही जगात रावण म्हणून प्रसिद्ध झाला. त्यानंतर कैकसीच्या गर्भाशयातून कुंभकरण जन्माला आला. त्याच्यासारखा दुसरा कोणी प्राणी नव्हता. त्यानंतर विद्रूप चेहऱ्याच्या सुर्पणखाचा जन्म झाला. त्यानंतर कैकसीचा सर्वात लहान मुलगा धर्मात्मा विभीषणचा जन्म झाला. (Social Media News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.