Home » दादर रेल्वेस्टेशनवर बॅगेत आढळला मृतदेह !

दादर रेल्वेस्टेशनवर बॅगेत आढळला मृतदेह !

by Team Gajawaja
0 comment
Dadar Murder Case
Share

मुंबईच्या दादर स्टेशनवर एक धक्कादायक घटना घडली, जिथे दोघे संशयास्पद व्यक्ती एका बॅगसह पकडले गेले. रात्रीच्या वेळी प्लॅटफॉर्म क्रमांक ११ वर तुतारी एक्सप्रेसमध्ये चढताना रेल्वे सुरक्षा दल आणि पोलिसांनी त्यांच्या संशयस्पद हालचाली लक्षात घेऊन चौकशी केली. बॅग उघडल्यावर त्यात रक्ताने माखलेला मृतदेह आढळला, ज्याच्या डोक्यावर गंभीर घाव होते. चौकशीदरम्यान, आरोपी जय प्रवीण चावडा आणि त्याचा मित्र शिवजित सिंग मुकबधिर असल्याचे समोर आलं आणि त्यांनी या हत्येचा आरोप कबूल केला.

एका मुलीच्या वादातून मित्र अर्शद अली शेखला मारलं आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ट्रेनमध्ये बॅग ठेवण्याचा प्रयत्न ते करत होते. परंतु, पोलिसांच्या तत्परतेमुळे ते पकडले गेले. मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात, प्रत्येक सेकंदाला काहीतरी आगळं वेगळं घडत असतच. लोकांची वर्दळ, गर्दीचा आवाज आणि सततची धावपळ यामध्ये अडकलेला प्रत्येक माणूस स्वत: मध्ये आणि स्वत:च्या रूटीन मध्ये इतका व्यस्त असतो, की त्याच्या आजूबाजूला काहीतरी संशयास्पद घडत आहे. याची त्याला चाहूल सुद्धा लागत नाही. अशीच एक धक्कादायक घटना घडली दादरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ११ वर. दोन जण एक बॅग घेऊन दादर स्टेशन वरुन कोकणाच्या दिशेने रवाना होतं होते. इतक्या दक्ष पोलिसांनी त्यांच्या संशयास्पद हालचालींवरुन त्यांची चौकशी केली या चौकशीत जे उघडकीस आलं ते हादरवून टाकणार होत. ते दोघजण कोण आहेत? त्यांच्या सूटकेस मध्ये काय होत? (Dadar Murder Case)

वेळरात्रीची होती, तरीही दादरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ११ वर बऱ्यापैकी गर्दी होती. सगळे प्रवासी वाट बघत होते सावंतवाडीला जाणाऱ्या तुतारी एक्सप्रेस निघण्याची. याच प्लॅटफॉर्म वर दोघ जण एक बॅग घेऊन तुतारी एक्सप्रेसच्या दिशेने येत होते. त्यांच्याकडे कोणाचच लक्ष नव्हत. जर असतं तर बघणाऱ्याला समजल असत की त्या दोघांना एक बॅग पेलवत नाहीये. आणि ही बॅग ट्रॉली बॅग होती जिला चाकं असतात. तरी ती त्यांना खेचता येत नव्हती. ही साधी बॅग घेचण्यासाठी त्या दोघांची दमछाक उडाली होती.

पावसामुळे वातावरण थंड असून सुद्धा ते दोघ घामघुम झाले होते. ते दोघ खेचत ओढत ती बॅग कशीतरी ट्रेन जवळ घेऊन येतात आणि ती बॅग घेऊन ट्रेन मध्ये चढण्याचा प्रयत्न करतात. त्यांना बॅग चढवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते तरीही त्यांच्याकडून ती बॅग चढत नसते. ट्रेन मध्ये चढण्यासाठी झालेली गर्दी त्यांच्यावर ओरडायला लागते. ते दोघ घाबरतात आणि आणखी जोरात बॅग ट्रेन मध्ये घुसवण्याचा प्रयत्न करु लागतात. साधी एक बॅग दोघांनाही घाम फोडत होती हे पाहून, प्लॅटफॉर्म वर असलेल्या रेल्वे सुरक्षा दलाचे जवान संतोष कुमार यादव आणि पोलिस अधिकारी माधव केंद्रे यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. (Dadar Murder Case)

ते दोघ त्या दोघांकडे धावले आणि त्यांना ट्रेन मधून खाली उतरवलं आणि बघताच क्षणी त्यांना त्या बॅगेत काहितरी संशयास्पद असल्याच जाणवलं. पोलिस अधिकाऱ्यांनी ती बॅग त्यांना उघडायला सांगितली. पोलिसांनी त्यांना बॅग उघडायला सांगितल्यानंतर त्या दोघांच्या चेहऱ्यावर भीतीदायक भाव होते आणि चेहरा आणखी घामघुम झाला. तेवढ्यात त्या दोघांपैकी एक जण पळून गेला त्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण तो हाती आला नाही. पण त्याचा सहकारी तिथेच शांत उभा होता. पोलिसांनी त्याला बॅग उघडायला सांगितली आणि त्यांने ती उघडली. बॅग उघडल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला कारण बॅगेत प्लॅस्टिकमध्ये गुंडाळलेला रक्ताने माखलेला मृतदेह होता. त्याच्या डोक्यावर गंभीर घाव होते. पोलिसांनी त्या व्यक्तिला अटक केली आणि बॅगही ताब्यात घेतली तरीही तो व्यक्ती शांतच होता. (Dadar Murder Case)

================

हे देखील वाचा : उरणमधील यशश्री हत्याकांड !

================

पुढे चौकशी करताना त्याला प्रश्न विचारून सुद्धा त्याच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. पण तो घाबरलेला होता. पोलिसांच्या लक्षात आलं की हा मुकबाधिर आहे. पोलिसांनी तातडीने साइन लॅंगवेज स्पेशालिस्टला बोलावून आणि त्याची चौकशी केली. तेव्हा समोर आल की त्याच नाव जय प्रवीण चावडा आहे. आणि पळून गेलेल्या व्यक्तीच नाव शिवजीत सिंग आहे आणि बॅगेत सापडलेल्या मृत व्यक्तीच नाव अर्शद अली शेख असं आहे.

आरोपी जय चावडाने सांगितलं की अर्शद आणि शिवजित सिंग आम्ही तीघ मित्र असून आम्ही तिघेही मूकबधिर आहोत. जय हा पायधुनी परिसरात राहतो. ते तीघ तिथे एकत्र होते गटारी अमावस्या होती म्हणून ते तीघ तिथे पार्टी करत होते. त्यांच्यात त्यांच्याच एक मैत्रिणीवरून वाद झाला. रागाच्या भरात मग शिवजित सिंग आणि जय चावडाने अर्शद च्या डोक्यात हातोडा घातला आणि नंतर धारदार शस्त्राने त्याच्या शरीरावर वार केले. मग मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी त्याला बॅगेत भरलं आणि पायधुनीवरून रिक्शाकरून दादर स्टेशनवर आले. पोलिसांनी पळून गेलेल्या शिवजित सिंगला सुद्धा उल्हासनगर मधून अटक केली आहे. तुतारी एक्स्प्रेसमध्ये मृतदेह असलेली बॅग चढवून ती प्रवासादरम्यान संधी मिळताच खाली फेकून देण्याचा किंवा बॅग गाडीत सोडून मध्येच उतरण्याचा त्या दोघांचा प्लॅन होता. पण तो दक्ष पोलिस अधिकाऱ्यांंमुळे फसला आणि हे गुन्हेगार पकडले गेले. गुन्हेगार कितीही चाणाक्ष असला तरी, पोलीसांच त्यांच्याकडे नेहमीच लक्ष असत. (Dadar Murder Case)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.