मुंबई डबेवाला असोशिएशनने केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. मुंबईमध्ये लोकलसेवा बंद असल्याचा फटका बसत असून याकडे लक्ष देण्याची मागणी केंद्र सरकारला निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.
मुंबईतील लोकल सेवा बहाल करण्यात यावी किंवा मुंबईच्या डबेवाल्यांची डबे पोहचवण्याची सेवा आत्यावश्यक सेवा मानुन त्यांना लोकलने प्रवास करू देण्यात यावा अशी मागणी केंद्र सरकारकडे असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.
गेले साडेपाच महीने डबेवाल्यांना रोजगार नाही त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर संकटाला सामोरे जावे लागत आहे . रोजगार नसल्या मुळे डबेवाल्यांची आर्थीक स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे.सध्या अनलॉकअंतर्गत काही शासकीय, निमशासकीय, तसेच कार्पोरेट कार्यालये चालू होत आहेत. या कार्यालयात चाकरमानी अंशता का होईना कामावर रूजू होऊ लागला आहे. हे चाकरमानी आपल्या डबेवाल्याला फोन करून डबे पोचवायला करायला सांगत आहे.
पण लोकलसेवा जो पर्यंत पुर्ण पणे बहाल होत नाही तो पर्यंत डबेवाला कामावर रूजू होऊ शकत नाही. म्हणुन मुंबईची लाईफलाईन लोकल आहे तशीच डबेवाल्यांची लाईफलाईन लोकलच आहे. त्यामुळे मुंबईची लोकल सुरु करावी किंवा डबेवाल्यांना महीना किमान ३ हजार रूपये अनुदान द्या अशी मागणी मुंबई डबेवाला असोशिएशनच्या वतीने अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केली आहे.
डबेवाल्यांना महिना किमान ३ हजार रूपये अनुदान द्या – मुंबई डबेवाला असोशिएशनची मागणी
46
previous post