बहुतांश लोक सायबर क्राइमचे शिकार होतात पण त्यासंदर्भात तक्रार करण्याकडे दुर्लक्ष करतात. खरंतर त्यांना या बद्दल पूर्णपणे माहिती नसते की, अखेर सायबर क्राइमसाठी नक्की कोणते पोलीस असतात किंवा त्याची तक्रार खरंच करायची असते का? ऑनलाईन शॉपिंग करताना किंवा ऑनलाईन ट्रांजेक्शन करताना सायबर क्राइम होण्याचा धोका असतो. अशातच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, तुम्ही नक्की कोणत्या पोलीस स्थानकात याची तक्रार करू शकता त्याबद्दल अधिक. (Cyber crime)
सायबर क्राइमच्या तपासाठी एक वेगळी टीम असते. जी सायबर क्राइम संदर्भातील प्रत्येक शक्य असेल तो तपास करतो. जर आपण बोलत असू कोणत्या स्थानकात तक्रार करायची तर चिंता करू नका. तुम्ही तुमच्या परिसरातील किंवा कोणत्याही ठिकाणच्या सायबर क्राइमचा एफआयआर कोणत्याही पोलीस स्थानकात दाखल करू शकता. लक्षात ठेवा की, तक्रार दाखल करताना पोलिसांकडून क्राइम क्रमांक घेण्यास विसरु नका. हा क्राइम क्रमांक तुम्हाला त्या प्रकरणाच्या शेवटापर्यंत नेण्यास मदत करु शकतो. या व्यतिरिक्त तपास करणारे अधिकारी वेळोवेळी माहिती मिळवण्यासाठी ही लक्ष ठेवून असतात.
जर तुमची ऑनलाईन फसवणूक झाली असेल तर सर्वात प्रथम सायबर क्राइम हेल्पलाइन क्रमांक १९३० वर फोन करावा. त्यानंतर फोन केल्यानंतर तुमची सर्व माहिती आणि घटनेबद्दल संपूर्ण माहिती द्यावी. केंद्रीय गृहमंत्रालयाने ऑनलाईन फसवणूक आणि सायबर क्राइम रोखण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. येथे तुम्ही तुमची संपूर्ण माहिती आणि घटना सांगू शकता. त्यावर कारवाई ही केली जाऊ शकते. या क्रमांकावर फोन केल्यानंतर तुम्ही तक्रार दाखल करू शकता. फसवणूकीच्या प्रकरणी तुम्ही तक्रार नॅशनल हेल्पलाइन क्रमांक १५५२६० वर दाखल करू शकता. (Cyber crime)
हेही वाचा- Bluetooth च्या माध्यमातून तुमच्या ठेवली जाऊ शकते नजर
सायबर क्राइम झाल्यानंतर पुढील काही गोष्टी लक्षात ठेवा
-तक्रार दाखल केल्यानंतर क्राइम क्रमांक जरुर घ्या. या क्राइम क्रमांकावरुन तुमच्या प्रकरणावर पुढील कारवाई केली जाईल. याव्यतिरिर्क तपास करणारे अधिकारी सुद्धा वेळोवेळी माहिती घेत राहतात.
-प्रयत्न करा की, सायबर ब्रांचच्या अधिकाऱ्यांना शॉर्टमध्ये सर्व प्रकरण सांगा.
-जर तुमची ई-कॉमर्स वेबसाइटवरुन फसवणूक झाली असेल तर युजरचा बँक, ई-कॉर्मसला डॅशबोर्डवर पाठवले जाते.
-ऑनलाईन फसवणूकीवेळी आणखी एक गोष्ट ठेवावी ती म्हणजे लवकरात लवकर तक्रार दाखल करावी. घटनेच्या सुरुवातीच्या ३-४ तासात असे करणे फार महत्त्वाचे आहे.