Home » क्रिप्टिक प्रेग्नेंसी म्हणजे काय?

क्रिप्टिक प्रेग्नेंसी म्हणजे काय?

by Team Gajawaja
0 comment
Abortions Cases
Share

अमेरिकेत क्रिप्टिक प्रेग्नेंसीची चर्चा आहे. टिकटॉकवर ट्रेंन्ड झाल्यानंतर हा वादाचा विषय बनला आहे. अमेरिकेतील लोक हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत की, अखेर अशा प्रकारच्या प्रग्नेंसीचे कारण काय? खरंतर ही एक खास प्रकारची मेडिकल कंडीशन आहे ज्यामध्ये गर्भवती महिलेला दीर्घकाळ किंवा डिलिवरी पूर्वी कळतच नाही की ती गर्भवती आहे. त्यामुळे याला स्टील्थ म्हणजेच सीक्रेट प्रेग्नेंसी असे ही म्हटले जाते. भारतासह जगभरातील काही देशांमध्ये अशी प्रकरणे समोर आली आहेत. तर जाणून घेऊयात क्रिप्टिक प्रग्नेंसी (Cryptic Pregnancy) म्हणजे काय, अशी स्थिती का तयार होते आणि सामान्य प्रेग्रेंसी यापेक्षा किती वेगळी आहे याच बद्दल जाणून घेऊयात.

क्रिप्टिक प्रेग्नेंसी म्हणजे काय?
क्वीललँन्ड क्लिनिकच्या रिपोर्टनुसार, बहुतांश महिलांना ४ ते १२ आठवड्यामध्ये त्या प्रेग्नेंट असल्याचे जाणवू लागते. शरिरात काही प्रकारचे बदल होतात. जे तपासानंतर त्याची पुष्टी केली जाते. प्रग्नेंसीच्या काही प्रकरणांमध्ये महिलांना त्याबद्दल कळतच नाही. विशेतज्ञांचे असे म्हणणे आहे की, काही वेळेस प्रेग्नेंसीच्या अशा काही चाचण्या समोर आल्या आहेत जेथे महिलेचा रिपोर्ट हा निगेटिव असतो. पण ती प्रग्नेंट होते. या व्यतिरिक्त वेळेआधीच प्रग्नेंट होण्याच्या प्रकरणी ही रिपोर्ट निगेटिव येऊ शकतो. याचे कारण असे की, hCG म्हणजेच ह्युमन कोरियोनिक गोनेडोट्रॉपिन हॉर्मोनचा स्तर बिघडणे.

तज्ञांचे असे म्हणणे आहे की, महिलांमध्ये क्रिप्टिक प्रेग्नेंसीमागे काही कारणं असू शकतात. त्यामुळे लेबर पेन होण्याआधी महिलांना त्यांच्या प्रेग्नेंसी बद्दल माहितच नसते.

सीक्रेट प्रेग्नेंसीची ५ मोठी कारणं
-क्रिप्टिक प्रेग्नेंसी प्रकरणी काही खास स्थिती समोर येतात. जसे की, महिलेने नुकतेच बाळाला जन्म दिला आहे. बहुतांश महिलांना असे वाटते की, ब्रेस्टफिडिंग सुरु केल्यानंतर प्रेग्नेंट होऊ शकत नाही. पण असे नाही. अशा प्रकरणी ती प्रेग्नेंट राहू शकते. तसेच रिपोर्ट ही निगेटिव येऊ शकतो.

-महिलांमध्ये पॉलिसिस्टिक ओवेरिन सिंड्रोमच्या कारणास्तव महिलांना मासिक पाळी संदर्भात समस्या येऊ शकतात. काही वेळा हार्मोनल इम्बॅलेंन्स झाल्याने प्रेग्नेंसी बद्दल योग्य माहिती मिळत नाही. याचा रिपोर्ट ही निगेटिव येऊ शकतो.

-बहुतांश पुरुष आणि महिला असे मानतात की, बर्थ कंट्रोलच्या पद्धती शंभर टक्के योग्य रिजल्ट देतात. पण हे पूर्णपणे खरं नाही. यामुळे प्रेग्नेंसीची स्थिती उद्भवू शकते.

-वयाच्या चाळीशीनंतर महिला मानतात की, त्यांचे गर्भवती होण्याचे वय निघून गेले आहे. अथवा मेनोपॉजची लक्षणांबद्दल त्या गोंधळलेल्या असतात. त्यामुळे त्या प्रेग्नेंट राहू शकतात. मात्र त्याची त्यांना माहिती नसते. (Cryptic Pregnancy)

-क्विवलँन्ड क्लिनिकच्या तज्ञांनी असे म्हटले की, जर एखादी महिलेला गर्भवती असल्याचा अनुभव नसेल तर तिला त्याची लक्षण कळत नाही. ती त्या संदर्भातील लक्षण ही सामान्य असल्याचे मानत दुर्लक्ष करते.

हे देखील वाचा- तुम्हाला ‘हा’ त्रास असेल तर नक्की कढीपत्त्याचा करा वापर…

काय सांगते आकडेवारी
रिपोर्टनुसार, प्रत्येक ४७५ महिलेपैकी एका महिलेला २० व्या आठवड्यापर्यंत आपल्या प्रेग्नेंसी बद्दल कळत नाही. ऐवढेच नव्हे तर २५०० मध्ये एका महिलेला डिलिवरी पर्यंत कळलेच नव्हते की, ती प्रेग्नंट आहे. क्रिप्टिक प्रेग्नेंसीच्या प्रकरणी जेव्हा रिपोर्ट्स निगेटिव येतात तेव्हा महिला पार्टनर गर्भवती असल्याचे कळण्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे रक्ताची चाचणी. दरम्यान, या प्रेग्नेंसी मध्ये सुद्धा सामान्य प्रेग्रेंसी सारखेच होते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.