Home » पहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घेतलयं तर ‘या’ चुका टाळा

पहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घेतलयं तर ‘या’ चुका टाळा

आजकाल क्रेडिट कार्डच्या माध्यमातून सध्या शॉपिंग करण्याचा ट्रेंन्ड वाढला गेला आहे. आता क्रेडिट कार्ड घेणे आधीच्या तुलनेत अधिक सोप्पे झाले आहे.

by Team Gajawaja
0 comment
Credit card use
Share

आजकाल क्रेडिट कार्डच्या माध्यमातून सध्या शॉपिंग करण्याचा ट्रेंन्ड वाढला गेला आहे. आता क्रेडिट कार्ड घेणे आधीच्या तुलनेत अधिक सोप्पे झाले आहे. अशातच प्रत्येकाला आपले आर्थिक खर्च मॅनेज करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या कंपनीचे क्रेडिट कार्ड वापरतात. मात्र जेव्हा नव्याने क्रेडिट कार्डचा वापर करण्यास सुरुवात केल्यानंतर काही चुका हमखास केल्या जातातच. त्यामुळे त्यांना नंतर मोठे नुकसान सहन करावे लागते. (Credit card use)

जर तुम्ही सुद्धा पहिल्यांदा क्रेडिट कार्डचा वापर करणार असाल तर ते कसे वापरावे याबद्दल अधिक जाणून घेतले पाहिजे. अशा कोणत्या चुका आहेत ज्या तुम्ही करणे टाळले पाहिजेत.

आपल्या क्रेडिट कार्डच्या मर्यादेचा पूर्ण वापर करणे
बहुतांश लोकांना सुरुवातीला आपल्या क्रेडिट कार्डची एक मर्यादा दिली जाते. मात्र त्या बद्दल अधिक माहिती नसल्याने बहुतांशजण त्याचा पूर्ण मर्यादेत वापर करतात. अशातच तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डची मर्यादा पूर्णपणे वापरत असाल तर त्याचा परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोरवर पडू शकतो. यामुळे तुमचा क्रेडिट स्कोर खराब होऊ शकतो. त्यामुळे नेहमीच क्रेडिट कार्डच्या मर्यादेत म्हणजेच ३०-४० टक्क्यापर्यंत तो वापर करावा.

पूर्ण बिल चुकते न करणे
जेव्हा क्रेडिट कार्डचे बिल जनरेट केले जाते तेव्हा त्याच्या पेमेंटसाठी दोन ऑप्शन दिले जातात. पहिला ऑप्शन म्हणजे वापरलेल्या मर्यादेचे पूर्ण पेमेंट करणे. तर दुसरा ऑप्शन असा की, कमीत कमी पेमेंटची सुविधा. अशातच बहुतांशजण कमीत कमी पेमेंटचा पर्याय निवडतात. त्याच्या शिल्लक रक्कमेवर मात्र व्याज लावले जाते. त्याच्यावर कर्जाचा बोझा वाढू लागतो. त्यामुळे नेहमीच आपल्या क्रेडिट कार्डचा पूर्ण पेमेंट करावे.

इंटरनॅशनल ट्रांजेक्शन करणे
काही वेळेस क्रेडिट कार्डचा वापर काहीजण ऑफर्स पाहून इंटरनॅशनल ट्रांजेक्शन करतात. मात्र त्यांना हे माहिती नसते तर इंटरनॅशनल ट्रांजेक्शन केल्याने त्यांना फॉरेन करेंसी ट्रांजेक्शन फी च्या रुपात मोठी रक्कम भरावी लागते. त्यामुळे इंटरनॅशनल ट्रांजेक्शनसाठी सर्वसामान्यपणे क्रेडिट कार्डच्या ठिकाणी प्रीपेड कार्डचा वापर करणे उत्तम मानले जाते. यासाठी तुम्ही फॉरेक्स कार्डचा वापर करू शकता. (Credit card use)

हेही वाचा- इंटरनेटशिवाय तुम्ही करू शकता अधिक पैशांचे ट्रांजेक्शन

-रिवॉर्ड पॉइंट्ससाठी खर्च करणे
क्रेडिट कार्ड कंपन्या तुम्ही अधिक खर्च करावा म्हणून विविध ऑफर्स देते. खासकरुन रिवॉर्ड पॉइंटच्या नावाखाली ती ऑफर असते.मात्र हे पॉईंट्स मिळवण्यासाठी अधिक खर्च क्रेडिट कार्डच्या माध्यमातून करु नका. तुमच्या बजेट नुसार खर्च जरुर करा. प्रत्येक वर्षी, दोन वर्षांनी रिवॉर्ड पॉइंट्सचा वापर करावा जर तुमची क्रेडिट कार्ड कंपनी तुम्हाला याचा वापर बिल पेमेंटसाठी देत असेल तर तुम्ही ते करु शकता.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.