Home » Corona : कोरोनाच्या वाढणाऱ्या संसर्गापासून बचावासाठी उपाय

Corona : कोरोनाच्या वाढणाऱ्या संसर्गापासून बचावासाठी उपाय

by Jyotsna Kulkarni
0 comment
Corona
Share

संपूर्ण भारताची चिंता वाढवणारा कोरोना पुन्हा त्याचे हात पाय मारताना दिसत आहे. पाच वर्षांपूर्वी आपण ज्या आजारामुळे दोन वर्ष अक्षरशः घरात बसून काढली, तोच कोरोना पुन्हा डोके वर काढताना दिसत आहे. अनेक आशियायी देशांमध्ये कोरोनाने पुन्हा दहशत पसरवण्यास सुरुवात केली आहे. यावेळी प्रामुख्याने JN.1 सारखे ओमिक्रॉन उप-प्रकार डोकेदुखी ठरत आहेत. हे प्रकार अधिक वेगाने पसरतात आणि मागील संसर्ग किंवा लसीकरणामुळे निर्माण झालेली प्रतिकारशक्ती अंशतः टाळतात. त्यामुळे आपण सर्वांचीच अधिकाधिक आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घेणे आवश्यक झाले आहे. (Corona)

जाणकारांच्या मते, कोरोनाची नवीन लाट पूर्वीसारखी ताकदवर नाहीये . पण, असे असले तरी निर्धास्त राहून चालणार नाही. कारण अजूनही धोका पूर्णपणे टळलेला नाही. दिवसेंदिवस कोरोनाचे बॅक्टेरियाचे नवनवीन व्हेरियंट वेगाने समोर येत आहेत. त्यामुळे कमकुवत रोगप्रतिकारकशक्ती असलेल्या व्यक्ती याला बळी पडत आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असताना लहान मुलांची अधिक काळजी घेण्याची गरज आहे. सतत वातावरणात होणाऱ्या बदलामुळे सर्दी, खोकला आणि ताप येणे सामान्य बाब आहे. पण करोना व्हायरसच्या प्रभावामुळे हा त्रास साधा आहे की, कोरोनाचा हे समजणे जरा कठीण आहे. त्यामुळे स्वतःच्या आणि पर्यायाने इतरांच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी काही गोष्टी आपण पाळणे गरजेचे झाले आहे. (Marathi News)

कोरोनाची लक्षणे कोणती?
कोरोनाच्या सामान्य लक्षणांमध्ये प्रामुख्याने ताप, कोरडा किंवा कफयुक्त खोकला, घसा खवखवणे किंवा दुखणे, थकवा जाणवणे, अंगदुखी आणि डोकेदुखी यांचा समावेश होतो. यासोबतच काही वेळा सर्दी, नाक वाहणे, चव किंवा वास घेण्याची क्षमता कमी होणे अशी लक्षणे दिसतात. ही लक्षणे बऱ्याचदा सामान्य सर्दी-पडशासारखी असू शकतात आणि व्यक्तीनुसार बदलू शकतात. कधी कधी गंभीर परिस्थितीत श्वास घ्यायला त्रास होणे हे एक महत्त्वाचे धोक्याचे लक्षण आहे. (Top Stories)

Corona

कोरोनाचा प्रसार कसा रोखता येईल?

> करोना व्हायरसला दूर ठेवण्यासाठी हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे. स्वच्छता न पाळल्यास करोनाची लागण होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर आपले हात साबण आणि पाण्याच्या मदतीने स्वच्छ धुवावे. साबण – पाणी उपलब्ध नसल्यास हँड सॅनिटाइझरचा वापर करावा. ७० टक्के अ‍ॅल्कॉहोलचा समावेश असणाऱ्या सॅनिटाइझरचा वापर करावा. (Latest Marathi News)

> खोकताना किंवा शिंकताना टिश्यू पेपरचा वापर करा. टिश्यू पेपर नसेल तर कोपराच्या आतला भाग तोंडावर किंवा नाकावर ठेवा. वापरलेला टिश्यू तात्काळ कचरापेटीत टाका. खोकताना किंवा शिंकताना अशाप्रकारे तोंडावर किंवा नाकावर टिश्यू पेपर ठेवला तर विषाणू पसरणार नाहीत आणि इतरांना त्यांची लागण होणार नाही.

> शिंकेतून किंवा खोकल्यातून विषाणू पसरून त्याची इतर कुणाला लागण होऊ नये, यासाठीच दोन व्यक्तींमध्ये किमान २ मीटर अंतर ठेवण्यास सांगण्यात आलं आहे.

>करोना व्हायरस हा संसर्गजन्य रोग आहे. एक व्यक्तीमार्फत दुसऱ्या व्यक्तीमध्ये हा आजार सहजरित्या पसरतो. यामुळे एखादी व्यक्ती भेटल्यानंतर हात मिळवणे टाळा. हात मिळवण्याऐवजी नमस्कार करा. यामुळे करोना व्हायरसचा फैलाव होणार नाही. (Top Marathi Headlines)

> अत्यावश्यक कामं नसेल तर घराबाहेर पडू नका. यामुळे कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात येण्याची शक्यता कमी असते.

> बस किंवा ट्रेनमधून प्रवास करताना चेहऱ्यावर मास्क लावणे गरजेचं आहे. सार्वजनिक ठिकाणी असताना चेहऱ्यावर मास्क लावला नाही तर करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. शिंकणाऱ्या तसंच खोकणाऱ्या व्यक्तींपासून दूरच राहा. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करा. उघड्यावरचे पदार्थ देखील खाऊ नका. (Todays Marathi News)

> डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणं टाळा. आपले हात बऱ्याच पृष्ठभागांना स्पर्श करत असतात. त्यातून हाताला विषाणू चिकटू शकतात. अशा हातांनी डोळे, नाक किंवा तोंडाला स्पर्श केल्यास हाताला चिकटलेले विषाणू तुमच्या शरीरात जाऊ शकतात.

> गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. लग्नसमारंभाला जाणे टाळणे शक्य असल्यास टाळा. गर्दीच्या ठिकाणी जाणार असाल तर मास्कचा वापर करा.

> जास्तीत जास्त पोषक आहार घ्या, जेणेकरून रोगप्रतिकारकशक्ती वाढेल. पूर्ण झोप घ्या. अपुऱ्या झोपेमुळे रोगप्रतिकारकशक्तीवर परिणाम होतो आणि संसर्गाचा धोका वाढतो. जंक फूड खाणे टाळा. यामुळे रोगप्रतिकारकशक्ती मजबूत राहील. (Latest Marathi Headline)

> रोज योगा आणि व्यायाम करा, विशेष करून श्वसनाचे व्यायाम करावेत. यामुळे फुफ्फुसे निरोगी राहतील. हळदीचे दूध प्यावे. तुळशीची पाने आरोग्यवर्धक असतात, सकाळच्या वेळी तुळशीची पाने खायला हवीत.

Corona

> जर संसर्ग झाला तर कमीत कमी ५ दिवस वेगळे राहा आणि लक्षणांनुसार औषधे घ्या. चुकूनही आणि थोड्या काळासाठी या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास तुम्ही गंभीर आजारी पडू शकता.

लहान मुलांचं कोरोनापासून रक्षण करण्यासाठी त्यांच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. मुलांना नियमितपणे साबण आणि पाण्याने हात धुण्याची सवय लावा. विशेषतः जेवणाच्या आधी आणि बाहेरून आल्यावर त्यांना आवर्जून हात धुवायला लावा. चेहऱ्याला वारंवार हात न लावण्याची सूचना मुलांना द्या. तसेच लोकांपासून लांब उभे राहण्याबद्दल शिकवा. शिवाय मुलांना देखील गर्दीच्या ठिकाणी मुलांना मास्क वापरण्याचा सल्ला द्या. शाळा, गार्डन अशा ठिकाणीही मुलांना मास्क घालूनच पाठवावे. मुलांना खोकला किंवा सर्दीचा त्रास असेल तर शिंकताना रुमाल किंवा टिश्यू वापरण्याची सवय लावा. (Social News / Updates)

============
============

कोरोनापासून बचावासाठी लसीकरण हा सगळ्यात प्रभावी मार्ग आहे. ठराविक वयोगटातील मुलांना लस दिल्यास कोरोना संक्रमणाचा धोका कमी होतो. पालकांनी डॉक्टरांचा सल्ल्याने मुलांचे लसीकरण करून घ्यावे. जर मुलांना खोकला, ताप आणि घशात खवखव जाणवत असेल आणि थकवा वाटत असेल तर त्यांना डॉक्टरकडे घेऊन जा. त्यांना आरोग्याशी संबंधित कोणताही त्रास जाणवत असेल तर त्यांना शाळेत किंवा डे केअरमध्ये पाठवू नका. दररोज मुलांची झोप पूर्ण होईल, याची काळजी घ्या. त्यांना पोषक आहार द्या. तसेच रोज व्यायाम करण्याची सवय त्यांना लावा. त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढेल. फक्त कोरोनाच नाही तर अन्य आजारांपासून संरक्षणासाठी त्यांची लाईफस्टाईल योग्य असण्याची गरज आहे. त्यामुळे त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये आवश्यक बदल करा. (Latest International News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.