Home » सणासुदीला अशाप्रकारचे कुकिंग ऑइल वापरण्याआधी ‘हे’ वाचा

सणासुदीला अशाप्रकारचे कुकिंग ऑइल वापरण्याआधी ‘हे’ वाचा

सणासुदीचे दिवस सुरु झाले आहेत. त्यामुळे घरोघरी स्वादिष्ट पक्वान तयार केले जाते. याशिवाय सण अपूर्ण साजरा केल्यासारखे वाटते. सणासुदीच्या काळात घरात विविध प्रकारच्या डिशेज बनवल्या जातात.

by Team Gajawaja
0 comment
Share

सणासुदीचे दिवस सुरु झाले आहेत. त्यामुळे घरोघरी स्वादिष्ट पक्वान तयार केले जाते. याशिवाय सण अपूर्ण साजरा केल्यासारखे वाटते. सणासुदीच्या काळात घरात विविध प्रकारच्या डिशेज बनवल्या जातात. अशातच हे जाणून घेणे गरजेचे आहे की, तुम्ही त्यासाठी नक्की कोणते तेल वापरता. वापरत असलेले तेल हे आरोग्यासाठी खरंच फायदेशीर असते का? सणासुदीच्या काळात बहुतांश लोक घरच्या घरीच विविध पदार्थ बनवणे पसंद करतात, अशातच त्याच्या टेस्टसह आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात कोणत्या कुकिंग ऑइलचा वापर करू नये याबद्दल हेल्थ एक्सपर्ट्स काय म्हणतायत हे पाहूयात. (Cooking Oil)

खरंतर असे काही कुकिंग ऑइल्स असतात ज्यांचा आपल्या आरोग्यावर थेट परिणाम होऊ शकतो.त्यामुळे अशा कुकिंग ऑइलचा वापर करणे टाळावे असे हेल्थ एक्सपर्ट्स सांगतात.

पाम ऑइल
पाम ऑइलमध्ये सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण अधिक असते. सॅच्युरेटेड फॅट तुमच्या LDL म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉलचा स्तर वाढवतात. यामुळे हृदयरोगासंबंधित समस्यांचा धोका अधिक वाढतो. याचा अधिक प्रमाणात वापर केल्याने लठ्ठपणा वाढला जाऊ शकतो.

Warning: Popular Cooking Oil Can Wreck Your Gut, Leading to Inflammatory Bowel Disease

कनोला ऑइल
कनोला ऑइलमध्ये ओमेगा-3 आणि ओमेगा-6 फॅटी अॅसिड असते. कनोला ऑइलच्या अधिक वापरामुळे सूज येण्यासह लठ्ठपणा, हृदयरोग आणि अल्जाइमर होण्याची शक्यता वाढते.

कॉर्न ऑइल
अन्य व्हेजिटेबल ऑइल प्रमाणेच कॉर्न ऑइल मध्ये सुद्धा ओमेगा-6 फॅटी अॅसिड्स अधिक असतात. कॉर्न ऑइलचा अधिक वापर इंफ्लामेशनचे कारण ठरू शकते. यामुळे फेस्टिव्ह सीजनमध्ये तुम्ही कॉर्न ऑइलचा वापर करणे टाळावे.

सोयाबिन ऑइल
सोयाबिन ऑइल हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत गरजेचे मानले जाते. मात्र काही लोकांन या तेलाच्या सेवनाने एलर्जी होऊ शकते. जर तुम्ही एखाद्या आजारावरील औषधे घेत असाल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच या तेलाचा तुमच्या खाण्यापिण्यात समावेश करावा. (Cooking Oil)

तर सणासुदीच्या काळात तुम्ही आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. जर तुम्हाला घरी बनवलेल्या पदार्थांचा आनंद घ्यायचा असेल तर वरील काही कुकिंग ऑइल्सचा मर्यादित प्रमाणात वापर करणे अत्यंत गरजेचे आहे.


हेही वाचा- Clove Water Benefits: वजन कमी करण्यापासून रोगप्रतिकारशक्ती वाढेपर्यंत अनेक गोष्टींवर उपयुक्त आहे लवंगचे पाणी !

(टीप : या लेखात माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. ‘gajawaja.in’ याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टर, वैद्य किंवा तज्ञांशी संपर्क साधावा.)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.