Home » कमिटमेंट फोबिया म्हणजे काय? कसे रहाल दूर

कमिटमेंट फोबिया म्हणजे काय? कसे रहाल दूर

कमिटमेंट फोबिया केवळ नात्यांपर्यंत मर्यादित राहत नाहीय. एखाद्या व्यक्तीला नोकरी बदलायची असल्यास अथवा एखाद्या आव्हानाचा सामना करायचा असल्यास भीती वाटत असल्यास त्याला कमिटमेंट फोबियाचा शिकार असल्याचे मानले जाते.

by Team Gajawaja
0 comment
Commitment Phobia
Share

Commitment Phobia : कमिटमेंट फोबिया दोन इंग्रजी शब्दांपासून तयार झाला आहे. पहिला कमिटमेंट म्हणजेच वचन असेही म्हणू शकता. दुसरा शब्द फोबिया याचा अर्थ भीती असा होतो. याचा अर्थ असा होतो की, एखाद्या गोष्टीबद्दल वचन देण्याच्या भीतीला कमिटमेंट फोबिया असे म्हटले जाते. सध्याची तरुणाईच याच कमिटमेंट फोबियाच्या समस्येचा सामना करत आहे. यामुळे यामागील कारणे काय आणि यापासून दूर कसे राहायचे याबद्दल जाणून घेऊया…

कसे होता फोबियाचे शिकार
कमिटमेंट फोबिया केवळ नात्यांपर्यंत मर्यादित राहत नाहीय. एखाद्या व्यक्तीला नोकरी बदलायची असल्यास अथवा एखाद्या आव्हानाचा सामना करायचा असल्यास भीती वाटत असल्यास त्याला कमिटमेंट फोबियाचा शिकार असल्याचे मानले जाते. याची सुरुवात तुमच्यामधील आत्मविश्वासाच्या कमतरतेच्या कारणास्तव होऊ शकते. हळूहळू जेव्हा व्यक्तीमधील आत्मविश्वास कमी होऊओ लागतो तेव्हा त्याला आपण काहीही करु शकत नाही असे वाटत राहते. यापासूनच व्यक्ती कमिटमेंट फोबियाचा शिकार होऊ लागतो. याची कारणे जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे.

कसे ओळखाल फोबिया?
कमिटमेंट फोबियाने पीडित असलेल्या व्यक्ती स्वत:वर विश्वास करण्यास घाबरतात. याच कारणास्तव सामान्य कामही व्यक्तीला फार मोठे असल्यासारखे वाटते आणि यापासून दूर राहाण्याचा विचार केला जातो. कधीकधी नात्यातही मनातील भावना सांगण्यास भीती वाटते. दरम्यान काही प्रकरणात व्यक्तीला झोपेसंबंधित समस्या येऊ शकते. पण याची लक्षणे दिसून येण्याासाठी व्यक्ती काही प्रश्न वारंवार टाळतोय का हे पाहणे फार महत्त्वाचे आहे. यामध्ये व्यक्ती आपल्या मनातील गोष्ट पूर्णपणे सांगू शकत नाही. व्यक्ती कोणत्याही कारणास्तव भांडण्यास सुरुवत करू शकतो. याशिवाय एखादा व्यक्ती स्वत: चूक केल्यास तरीही दुसऱ्याला जबाबदार ठरवण्याचा प्रयत्न करू लागतात. अशातच वेळीच कमिटमेंट फोबियाच्या स्थितीतून बाहेर येणे आवश्यक आहे.

कसे दूर रहाल?
कमिटमेंट फोबियापासून दूर राहण्यासाठी वैद्यकीय उपचारही आहे. पण व्यक्तीनेही यापासून दूर राहण्यासाठी काही गोष्टी कराव्यात. एक्सपर्ट्स असे मानतात की, व्यक्तीने आपल्या विचारात बदल केल्याने काही गोष्टी बदलल्या जाऊ शकतात. यादरम्यान, व्यक्तीने स्वत:ला समजून घेण्यासह आत्मविश्वास कसा वाढवला जाईल याकडे लक्ष द्यावे. एखाद्यासोबत बोलणे चांगले वाटत असल्यास आपल्या समस्या त्या व्यक्तीसोबत शेअर करू शकता. (Commitment Phobia)


आणखी वाचा :
मानसिक तणाव ‘ या ‘ आजारांचे ठरते कारण, असे राहा दूर
भारतातील प्रत्येक तिसरे मुलं लठ्ठपणाचे शिकार, जाणून घ्या कारणे

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.