युद्धग्रस्त गाझामधील रफाहमध्ये एका भारतीय लष्करी अधिका-याचा मृत्यू झाल्याची बातमी आली आणि सर्वांनाच धक्का बसला. हे होते कर्नल कर्नल वैभव अनिल काळे. वयाच्या अवघ्या ४६ व्या वर्षी या दिलदार अधिका-याचा असा मृत्यू झाल्यानं भारतात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कर्नल वैभव अनिल काळे यांनी लष्करातून निवृत्ती स्विकारली होती. पुण्यामध्ये ते त्यांची पत्नी आणि दोन मुलांसह रहात होते. लष्करातून निवृत्ती स्विकारली तरी देशाच्या सेवेसाठी मात्र ते सदैव तत्पर असत. (Col Vaibhav Anil Kale)
त्यातून अनेक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता. अत्यंत हुशार आणि समाजभान जपणारे काळे हे युनायटेड नेशन्स डिपार्टमेंट ऑफ सेफ्टी अँड सिक्युरिटीमध्ये अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच दाखल झाले होते. गाझामधील रफाह भागात इस्रायलच्या हवाई हल्ल्यात ते शहीद झाले. यावेळी कर्नल काळे संयुक्त राष्ट्राचा झेंडा घेऊन जाणाऱ्या वाहनातून प्रवास करत होते. इस्रायल-हमास युद्ध सुरू झाल्यापासून संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय कर्मचाऱ्याचा हा पहिला मृत्यू आहे. त्यांच्या परिवारासाठी हा मोठा धक्का आहे. कर्नल काळे यांचे दोन भाऊही लष्करात मोठ्या पदावर आहेत. या सर्वांबरोबर त्यांचा कायम संवाद होता. गाझामध्ये जाण्याआधी कर्नल काळे यांनी मी येतांना शांती घेऊन येईन, असे आश्वासन आपल्या मित्रपरिवाराला दिले होते. मात्र त्याऐवजी त्यांचा मृतदेह आता येणार आहे.
४६ वर्षाचे कर्नल वैभव अनिल काळे यांचा रफाह येथे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांनी २०२२ मध्ये सैन्यातून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यानंतरही लष्कराच्या विविध सेवामार्गांमध्ये ते कार्यरत होते. सध्या कर्नल काळे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा आणि सुरक्षा विभागामध्ये सुरक्षा समन्वय अधिकारी म्हणून कार्यरत होते. याच अंतर्गत ते गाझामध्ये शांतता निर्माण करण्याच्या संयुक्त राष्ट्रांच्या मोहीमेवर होते. गाडीवर आलेल्या एका रॉकेटनं त्यांचा जागीच मृत्यू झाला. (Col Vaibhav Anil Kale)
गाझामध्ये भारतीय लष्कराच्या माजी अधिकाऱ्याच्या हत्येबद्दल संयुक्त राष्ट्रांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी या घटनेचे खापर इस्रायलवर फोडले आहे. तसेच या घटनेच्या चौकशीसाठी स्वतंत्र समितीची स्थापना केली आहे. इस्रायल-हमास युद्ध सुरू झाल्यापासून संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय कर्मचाऱ्याचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या घटनेमुळे संयुक्त राष्ट्रांच्या मोहीमेलाही धक्का बसला आहे. संयुक्त राष्ट्रांनी यासाठी भारताची माफी मागितली आहे.
या घटनेत भारताच्या एका दिलदार अधिका-याचा मृत्यू झाला होता. कर्नल काळे यांचा स्वभाव मनमिळावू होता. त्यांचा मोठा मित्रपरिवार आहे. लष्करातही त्यांचा मोठा परिवार असून सामाजिक उपक्रमात भाग घेणा-या काळेंचा हा मृत्यू अनेक प्रश्नचिन्ह निर्माण करुन गेला आहे. काळे यांनी भारतीय सैन्यात ११ जम्मू-काश्मीर रायफल्सचे नेतृत्व केले आहे. निवृत्तीनंतर दोन महिन्यांपूर्वीच त्यांची संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा आणि सुरक्षा विभागामध्ये सुरक्षा समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. (Col Vaibhav Anil Kale)
याला कारण म्हणजे, कर्नल काळे हे धडाडीचे सैनिक होते. पठाणकोट एअरबेसवर २०१६ मध्ये झालेला दहशतवादी हल्ला रोखण्यात वैभव काळेचीही महत्त्वाची भूमिका होती. त्यांचे जवळचे मित्र लेफ्टनंट कर्नल हांगे यांनी त्यासंदर्भात माहिती दिली आहे. पठाणकोट हल्ल्याच्या वेळी काळे हे भारतीय लष्कराच्या ११ जम्मू-काश्मीर रायफल्स बटालियनचे कमांडिंग होते. त्या ऑपरेशनमध्ये त्यांनी आणि त्यांच्या युनिटने महत्त्वाची भूमिका बजावली. कर्नल काळे यांच्या मृत्युने या बटालियनलाही धक्का बसला आहे.
=============
हे देखील वाचा : नॉस्ट्राडेमसनं यांची एक रहस्यमय भविष्यवाणी
=============
कर्नल काळे हे १९९८ मध्ये भारतीय लष्करात दाखल झाले होते. काही वर्ष त्यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये आकस्मिक मुख्य सुरक्षा अधिकारी म्हणूनही काम केले आहे. त्यामुळेच त्यांना निवृत्ती नंतर संयुक्त राष्ट्रसंघामध्ये पाठवण्यात आले होते. या दिलदार अधिका-यानं २००४ मध्ये लष्करात प्रवेश केला. नागपूरचे रहिवासी असलेल्या काळे यांचे शालेय शिक्षण सोमलवार उच्च माध्यमिक विद्यालयातून झाले. (Col Vaibhav Anil Kale)
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून वर्तणूक विज्ञान आणि आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्यात पदवी घेतली. आयएमएम लखनौ मधून त्यांनी पदवी घेतली आहे. १९९९ मध्ये ते एनडीएमधून बाहेर पडले. कर्नल काळे यांचा भाऊ विशाल काळे हे भारतीय हवाई दलात ग्रुप कॅप्टन म्हणून कार्यरत आहेत, तर त्यांचा चुलत भाऊ अमेय काळे हे देखील लष्करात कर्नल आहेत. त्यांच्या मागे पत्नी अमृता आणि दोन मुले आहेत. काळे यांचे पार्थिव इजिप्तमार्गे भारतात आणले जाणार असून पुण्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सई बने