Home » रात्रीच्या वेळेस कॉफी पिण्याची सवय आहे? होईल ‘ही’ गंभीर समस्या

रात्रीच्या वेळेस कॉफी पिण्याची सवय आहे? होईल ‘ही’ गंभीर समस्या

रात्रीच्या वेळेस कॉफी प्यायल्याने आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. खरंतर ही सवय हृदयासंबंधित समस्या वाढवू शकते. यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदय विकाराचा झटका देखील येऊ शकतो.

by Team Gajawaja
0 comment
Share

Coffee Side Effects : बहुतांशजणांना कॉफी पिणे अत्यंत आवडते. त्यापैकी काहीजण रात्रीच्या वेळेस कॉफी पितात. तुम्हाला देखील रात्रीच्या वेळेस कॉफी पिण्याची सवय आहे का? असे करत असाल तर थांबा. कारण यामुळे झोप येण्यास अडथळा येऊ शकतो. कॉफीमध्ये असलेले कॅफेन स्टीमुलेट होतात, जे मेंदूच्या अलर्टनेस आणि अव्हेरनेसला वाढवते. यामुळेच झोप लागत नाही. इंटरनॅशनल इंस्टिट्युट ऑफ हेल्थनुसार, कॉफीमध्ये असलेले कॅफेन तुम्हाला फ्रेश ठेवण्यास मतद करते. पण रात्रीच्या वेळेस यामुळे झोपेत अडथळा निर्माण होतो. याचा एकूणच परिणाम संपूर्ण आरोग्यावर होतो. दीर्घकाळ रात्रीच्या वेळेस कॉफी पिण्याच्या सवयीमुळे आरोग्याचे नुकसान होऊ शकते. यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराच्या झटक्याचा धोका वाढला जातो.

या वेळेस कॉफी पिणे टाळा
रात्रीच्या वेळेस उत्तम झोप लागण्यासाठी कॉफी पिणे बंद करा. जरी रात्री कॉफी प्यायची असल्यास झोपण्याच्या दोन तास आधीतरी प्या. याशिवाय रात्रीच्या वेळेस ब्लॅक कॉफी पिणे टाळले पाहिजे. कारण ती अत्याधिक स्ट्रॉन्ग असते.

लाइट कॉफीचे सेवन करू शकता
रात्रीच्या वेळेस कॉफी प्यायची असल्यास स्ट्रॉन्ग कॉफी पिऊ नका. त्याएवजी लाइट कॉफीचे सेवन करा. यामुळे क्रेविंग पूर्ण होते आणि झोपेमध्ये अडथळाही निर्माण होत नाही. जर तुम्ही रात्रीच्या वेळेस कॉफीचे सेवन करत असाल तर साखरेमुळे झोपमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. अशातच साखरेएवजी दालचीनीचा वापर करू शकता. दालचीनीमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडेंट्स रात्रीच्या वेळेस कॉफीच्या परिणामांपासून बचाव करते. (Coffee Side Effects) दरम्यान, रात्रीच्या वेळेस बदमाचे दूध पिणे बेस्ट पर्याय आहे. यामुळे वजन वाढण्याचा धोका कमी होतो. झोपही व्यवस्थित पूर्ण होते.


आणखी वाचा :
लहान मुलांना पावडरचे दूध प्यायला देता… हे आहेत दुष्परिणाम
दिवसभर बसून काम केल्याने हृदयाचे आरोग्य बिघडते, वाचा काय म्हणतात आरोग्यतज्ज्ञ

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.