भारतात चहा हे सर्वांचे आवडते पेय असले तरी कॉफीलाही (Coffee) सध्या तेवढीच पसंती मिळत चालली आहे. विशेषतः तरुण वर्गामध्ये कॉफी विशेष पसंत केली जाते. भारतात केरळ आणि कर्नाटकमध्ये सर्वाधिक कॉफी तयार होते. मात्र सध्या कॉफीची (Coffee) मागणी वाढली आहे. त्यामुळे पारंपारिक कॉफीचे उत्पादन जिथे घेतले जात होते, तिथेच आता कॉफीची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. कॉफीची नवीन झाडे निर्माण करण्यात येत आहे. तसेच केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू येथेही कॉफीची (Coffee) लागवड मोठ्या प्रमाणात केली जात आहे. त्यासाठी या भागातील नर्सरीमध्ये कॉफीची रोपटी तयार केली जात असून त्यांची लागवड करण्याची पद्धतीबाबत मार्गदर्शनही करण्यात येत आहे. गेल्या काही वर्षापासून कॉफीची मागणीही वाढली आहे. त्यामुळे कॉफीचे उत्पादन करणारे आधुनिक पद्धतीनं कॉफीचे उत्पादन करण्यावर भर देत आहेत. तसेच कॉफीच्या (Coffee) बिया काढण्यापासून ते त्यापासून कॉफीची पावडर ते त्यांची पॅकींग येथपर्यंत संबंधित राज्यात खास प्रोत्साहन देण्यात येत आहे.

भारतात केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये कॉफीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. भारतातील कर्नाटक हे सर्वाधिक कॉफी उत्पादक राज्य आहे. या राज्यात आता कॉफी लागवडीवर भर देण्यात येत आहे. या राज्यातील डोंगराळ भागात कॉफीची लागवड केली जाते. भारतातील दक्षिण राज्यात कॉफीची अशीच शेती केली जाते. पारंपारिक पद्धतीनं लावलेल्या झाडांमधून कॉफीच्या बिया गोळा केल्या जातात. पण आता ही पद्धत बदलत चालली आहे. कारण भारतातील कॉफीला आपल्या देशातून आणि परदेशातूनही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कॉफीला चांगले दर मिळत आहेत. मुळात कॉफीच्या झाडाची एकदा लागवड झाल्यावर त्याची निगा ठेवण्यासाठी फार खर्च होत नाही. त्यामुळे कॉफी उत्पादक जिथे कॉफीचे उत्पादन होत आहे, तिथेच त्याचे पॅकींग ते वितरण करण्यावर भर देत आहेत. याला राज्यसरकारतर्फे पाठिंबा देण्यात येत आहे.
कॉफीची (Coffee) लागवड करतांना मातीला महत्त्व आहे. शक्यतो डोंगराळ भाग आणि थंड हवामान जिथे आहे, तिथे कॉफी लागवडीला महत्त्व दिले जाते. कॉफीची रोपटी लावतांना प्रथम जमिन समतोल करुन घेण्यात येते आणि काही ठराविक अंतरावर ही कॉफीची रोपटी लावण्यात येतात. कॉफीच्या झाडांसाठी सेंद्रीय खताचा वापर करण्यात येतो. कॉफीच्या झाडांना फार गरम नाही आणि फार थंड नाही, असे वातावरण लागते. बहुधा या झाडांना एकदा लावलं तर त्यांची वाढ उत्तमप्रमाणे होते. त्यामुळे शेतक-यांचा कल अलिकडे कॉफीच्या लागवडीकडे वाढला आहे.
======
हे देखील वाचा : फोनचा अधिक वापर जीवघेणा ठरेल
=====
भारतात कॉफीच्या अनेक जाती आहेत. त्यात केंट कॉफी (Coffee) ही भारतातील सर्वात जुनी कॉफी मानली जाते. केरळ राज्यात ही केंट कॉफी अधिक प्रमाणात होते. तर अरेबिका कॉफी ही भारतात उत्पादित होणारी सर्वोच्च दर्जाची कॉफी मानली जाते. ही मुख्यतः दक्षिण भारतात होते. या कॉफीला परदेशातही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सध्या बदलत्या हवामानात अन्य कुठल्याही पिकाला निसर्गाचा फटका बसत असला तरी कॉफी (Coffee) उत्पादक मात्र खूष आहेत. कारण या बदलत्या हवामानामुळे कॉफीच्या झाडांना अधिक फायदा होत आहे. केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू येथील शेतक-यांनी सध्या कॉफीच्या वाढत्या मागणीनुसार आपला कल बदलला आहे. कॉफी लागवड मोठ्या प्रमाणात केली जात आहे. सध्या भारतातून रशिया आणि तुर्कस्थानला सर्वाधिक कॉफीची निर्यात केली आहे. इटलीसारख्या सर्वाधिक कॉफी जिथे घेतली जाते, अशा देशालाही भारतातील कॉफीची चव आवडू लागली आहे. जगभरात कॉफीचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. भारतानं कॉफीची निर्यात वाढवण्यावर भर दिला आहे. अगदी कोरोना काळातही कॉफीची निर्यात वाढली होती.
जगात इन्स्टंट कॉफीची (Coffee) मागणी वाढती आहे आणि या भारतीय कॉफीचा दर्जा सर्वात्तम ठरतोय, त्यामुळे भारताने कॉफी विकून अब्जावधी रुपये कमावले आहेत. कॉफीतून मिळणारे हे उत्पादन पाहता शेतकरी आता कॉफीच्या लागवडीकडे वळत आहेत. एकदा कॉफीचे झाड लावले की वर्षानुवर्षे त्या झाडापासून उत्पादन मिळते. हाच फायदा शेतक-यांनी टिपला असून येत्या वर्षात कॉफी उत्पादनामध्येही आणि निर्यातीमध्येही भारत जगात नंबर वन बनण्याच्या दिशेनं वाटचाल करीत आहे.
सई बने