CM Ladki Bahin Yojna : महाराष्ट्र सरकारकडून आर्थिक मंत्री अजित पवार यांनी बजेट साजर करत ”मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने”ची घोषणा केली. या योजनेचा शुभारंभ 1 जुलैपासून झाला असून यामध्ये वय वर्षे 21 ते 65 वर्षापर्यंतच्या महिलांना लाभ घेता येणार आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी महिलांनी आपापल्या जिल्हाधिकारी कार्यालयात मोठ्या संख्येने गर्दी केल्याचेही दिसून आले. रजिस्ट्रेशन केल्यानंतर लाभार्थ्यांची एक यादी तयार केली जामार आहे. योजनेतील लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये रक्कम दिली जाणार आहे.
लाडकी बहिण योजना महाराष्ट्रात सुरु करण्याआधी मध्य प्रदेशात सुरु केली होती. याचा फायदा मध्य प्रदेशात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेवेळी भाजपाला जाला होता. येथे भाजपाने लोकसभेच्या जागांवर मोठा विजय मिळवला होता. अशातच आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला लाडकी बहिण योजनेमुळे फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही योजना राज्यातील एनडीए सरकारसाठी गेमचेंजर ठरू शकते. जाणून घेऊया योजनेसाठी अर्ज कसा करायचा, पात्रता काय आणि अन्य महत्वाची माहिती सविस्तर…
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसंदर्भात माहिती
वय- 21 ते 65 वर्षे
लाभार्थ्यांची रक्कम- 1500 रुपये प्रति महिना
सरकारकडून वार्षिक फंड- 46 हजार कोटी रुपये
अर्ज करण्याची सुरुवात- जुलै 2024
कोण पात्र असेल?
-महाराष्ट्रातील स्थानिक निवासी
-विवाहित, विधवा, घटस्फोटित महिला अथवा निराधार महिला
-परिवाराचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे
या व्यक्तींना घेता येणार नाही लाभ
-कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा अधिक
-घरातील एखादा व्यक्ती टॅक्स भरत असल्यास
-कुटुंबात एखादा व्यक्ती शासकीय नोकरी अथवा पेन्शनचा लाभ घेत असल्यास
-कुटुंबाकडे 5 एकरपेक्षा अधिक जमीन नसावी
-कुटुंबाकडे चारचाही वाहन (ट्रॅक्टर सोडून)
कागदपत्रे कोणती लागणार?
-आधार कार्ड
-रेशन कार्ड
-उत्पन्नाचा दाखला
-स्थानिक रहिवाशी दाखला
-बँक पासबुक
-फोटो (CM Ladki Bahin Yojna)
असा करा अर्ज
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अर्जाचे पोर्टल, मोबाइल अॅप अथवा सेतू सुविधा केंद्राच्या माध्यमातून ऑनलाइन भरता येऊ शकते. ज्यांना अर्ज करता येत नाहीये त्यांना अंगणवाडी केंद्रातून अर्ज भरता येईल.