Home » नवीन कपडे धुताच जुने वाटू लागतात, तर करतायत या चूका

नवीन कपडे धुताच जुने वाटू लागतात, तर करतायत या चूका

by Team Gajawaja
0 comment
Clothes Washing Tips
Share

Cloth Care Tips : नवीन कपड्यांची चमक दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी, ते धुताना काही खास गोष्टी लक्षात ठेवणे खूप महत्वाचे आहे. कारण काही चुकांमुळे कपडे खराब होऊ शकतात.बदलत्या वातावरणामुळे आणि सण सोहळ्यानिमित्त नवनवीन कपड्यांची खरेदी केली जाते. पण काही वेळेला कपड्यांचे फॅब्रिक बरोबर नसल्यामुळे कपडे लवकर खराब होण्याची शक्यता निर्माण होते. खरंतर, कपडे खराब होण्यामागे काही कारणे असू शकतात. याबद्दलच पुढे सविस्तर जाणून घेऊया…

वेगवेगळ्या रंगांचे कपडे एकत्र धुणे

मशिन किंवा बादली मध्ये कपडे धुताना बरेच कपडे एकत्र आणि एकाच वेळी धुण्यास टाकले जातात. असे करणे टाळावे. कारण निळे, लाल आणि अजून काही गडद रंगाचे कपडे रंग सोडू शकतात. विशेषता: पहिल्यांदा कपडे धुतल्यावर ज्यामुळे हलक्या रंगाच्या कपड्यांना गडद रंगांचे डाग लागू शकतात. यामुळे कपडे खराब होऊ शकतात.

जास्त प्रमाणात डीटर्जंटचा वापर

काही लोकांची विचारसरणी अशी आहे की, जास्त डीटर्जंटचा वापर केला तर कपडे जास्त स्वच्छ होतात. पण हा गैरसमज आहे. मात्र, अत्याधिक डिटर्जेंटच्या वापरामुळे कपड्यांच्या फायबरचे नुकसान होते. याशिवाय कपड्यांचा रंग फिकट होऊ लागतो. यामुळे कपड्यांसाठी हार्ड डिटर्जेंटएवजी सौम्य किंवा लिक्वीड डिटर्जेंटचा वापर करू शकता.

Clothes Washing Tips

चुकीची पद्धत

कापड्यानं वर लावलेले जे टॅग असतात त्यात कपडे कसे धुवावे याची पद्धत सांगितलेली असते. काही कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुवू नये असे लिहिले किंवा चिन्हांकित केलेले असते. यामुळे कपडे धुण्यापूर्वी त्यावर लिहिलेली माहिती व्यवस्थितीत वाचावी.

=====================================================================================================

हेही वाचा : 

स्विमिंग केल्यानंतर झोप का येते? वाचा कारणे

या 5 अँटी-एजिंग ड्रिंक्सचा करा डाइटमध्ये समावेश, चाळीशीतही दिसाल तरुणी

=======================================================================================================

वॉशिंग मशीनचा चुकीचा वापर

वाशिंग मशीनचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यामुळे सुद्धा कपडे खराब होऊ शकतात. जर एकत्र खूप कपडे वाशिंग मशीनमध्ये धुण्यासाठी टाकल्यास एकतर मशीन ओव्हरलोड होते आणि त्यामुळे कपड्यांचा गोळा होतो. त्याचबरोबर कपडे व्यवस्थितीत आणि स्वच्छही धुतले जात नाहीत.  (Cloth Care Tips)

कपड्यांना वळत घालण्याची चुकीची पद्धत

अनेक वेळा कपडे सुखवण्याची पद्धतसुद्धा कपडे खराब करू शकतात. अत्याधिक कडाक्याच्या उन्हामध्ये कपडे वाळवल्यास त्याचा रंग फिकट होऊ शकतो. यामुळे कडाक्याच्या उन्हामुळे कपडे वाळत घालण्यापासून टाळा.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.