Home » क्लियर लिक्विड डाएट म्हणजे काय?

क्लियर लिक्विड डाएट म्हणजे काय?

वजन कमी करणे, बीपी आणि कोलेस्ट्रॉलचा स्तर नियंत्रित करण्यासाठी तुम्ही काही वेळेस लिक्विड डाएटची मदत घेतली असेल. सर्वसामान्यपणे हे डाएट फॉलो करणारी लोक फळ आणि भाज्यांचा ज्यूस पितात.

by Team Gajawaja
0 comment
Clear Liquid Diet
Share

वजन कमी करणे, बीपी आणि कोलेस्ट्रॉलचा स्तर नियंत्रित करण्यासाठी तुम्ही काही वेळेस लिक्विड डाएटची मदत घेतली असेल. सर्वसामान्यपणे हे डाएट फॉलो करणारी लोक फळ आणि भाज्यांचा ज्यूस पितात. तसेच काही गोष्टींपासून पूर्णपणे दूर राहतात. तरीही काही लोक याबद्दल कंफ्युज असतात की, या डाएटमध्ये नक्की कोणत्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे. क्लियर लिक्विड डाएट सर्वसामान्यपणे एखाद्या सर्जरीपूर्वी किंवा नंतर घेण्यास सांगितले जाते. या डाएटचे व्यवस्थितीत पालन केले नाही तर शरीरात व्हिटॅमिन आणि मिनरल्सची कमतरता निर्माण होऊ शकते. (Clear Liquid Diet)

क्लियर लिक्विड डाएट म्हणजे काय?
याला एक शॉर्ट टर्म डाएट असे म्हटले जाते. त्यात सहज पचन होणाऱ्या पदार्थांचा समावेश केला जातो. हे डाएट त्या लिक्विड पदार्थांपर्यंत मर्यादित आहे जे रुम टेंम्पचेरमध्ये ठेवले जातात. क्लियर लिक्विड डाएटमध्ये सूप किंवा ज्यूस ट्रांसपरेंट असणे अत्यंत गरजेचे असते. यामध्ये मुख्यत: 3-5 दिवसांचा डाएट प्लान असतो.जो गॅस्ट्रोइंटेस्टाइनल, कोलन सर्जरी आणि वजन कमी करण्यादरम्यान फॉलो केले जाते.

Understanding What Is the Clear Liquid Diet: A Complete Guide

कसे काम करते?
क्लियर लिक्विड डाएट हे पहिल्यांदा फॉलो करणाऱ्यांसाठी थोड मुश्किल होऊ शकते. परंतु यामधून तुम्हाला पोषक तत्त्वे आणि इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात मिळतात. क्लियर लिक्वड डाएटच्या माध्यमातून तुम्हाला शरीराला आवश्यक असलेली हाइड्रेशन आणि कॅलरीज मिळतात. परंतु हे डाएट दीर्घकाळ तुम्ही फॉलो करू शकत नाही. अन्यथा तुम्हाला थकवा जाणवण्यासह पोषक तत्त्वे ही मिळणार नाहीत. लिक्विड डाएट फॉलो केल्याने शरीरातील मेटाबॉलिज्म सुधारला जाऊन हळूहळू वजन कमी होऊ लागते. (Clear Liquid Diet)

क्लियर लिक्विड डाएट मेन्यू
यामध्ये सकाळी नाश्तासाठी तुम्ही एक कप चहा किंवा कॉफीचे सेवन करू शकता. स्नॅक्ससाठी एक कप फ्रुट ज्यूस पण फ्रूट पल्प नसावा. लंचसाठी एक कप क्लियर ब्रोथ आणि डिनरसाठी तुम्ही एक कप क्लियर व्हेजिटेबल आणि बोन सूप अथवा ब्रोथचे सेवन करू शकता.

कोणते पदार्थ खाणे टाळावे?
क्लियर लिक्विड डाएटमध्ये तुम्ही सॉलिड फूड, हाय फायबर फूड, मासे, अंडी, सोया आणि डाळ, दूध, दही, तिखट पदार्थ, तळलेले पदार्थ, प्रोसेस्ड फूड, सॉफ्ट ड्रिंक्स पिणे टाळले पाहिजे.

या डाएटचे जसे फायदे आहेत तसे नुकसानही आहे. त्यामुळे हे डाएट फॉलो करताना तुम्हाला चक्कर येणे, मूड स्विंग्स होणे, चिडचिड होणे, उलटी, थकवा आणि न्युट्रिशंन्सची कमतरता निर्माण होऊ शकते.


हेही वाचा- कोणतं मीठ आरोग्यासाठी फायदेशीर असते?


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.