Home » LTTE प्रमुख प्रभाकरन अद्याप जीवंत असल्याचा दावा 

LTTE प्रमुख प्रभाकरन अद्याप जीवंत असल्याचा दावा 

by Team Gajawaja
0 comment
Prabhakaran
Share

टायगर जिंदा है….सलमान खान आणि कटरिना कैफ यांचा 2017 मध्ये आलेला चित्रपट सुपरहिट ठरला. त्यानंतर टायगर जिंदा है…हा डायलॉग प्रसिद्ध झाला. आता हाच डायलॉग पुन्हा एकदा प्रसिद्ध ठरतोय. फक्त त्यात थोडाफार बदल झाला आहे.  हा डायलॉग आता म्हटला जातोय, श्रीलंकेमध्ये आणि तोही नव्या स्वरुपात श्रीलंकेत आता प्रभाकरन (Prabhakaran) जिवंत आहे. त्याला कारण ठरलं आहे,  लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम म्हणजेच एलटीटीईचा नेता प्रभाकरन जिवंत असल्याचा दावा तंजावूर तामिळनाडूच्या वर्ल्ड कॉन्फेडरेशन ऑफ तामिळचे अध्यक्ष पी नेदुमारन यांनीच केला आहे.  त्यावर आता श्रीलंकेत उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. प्रभाकरनचा (Prabhakaran) दबदबा पाहता, तो खरोखरच जिवंत आहे का, याचीही चर्चा सुरु झाली आहे.  

लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम म्हणजेच एलटीटीई  ही श्रीलंकेची दहशतवादी संघटना होती. तामिळीसाठी वेगळ्या राष्ट्राची मागणी एलटीटीईतर्फे करण्यात येत होती. वेलुपिल्लई प्रभाकरन (Prabhakaran) हे या संघटनेचे प्रमुख होते. 1976 मध्ये एलटीटीईने काही हिंसक कारवाया करत जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. त्यानंतर एलटीटीईने श्रीलंकेच्या अनेक राजकीय नेत्यांना लक्ष्य केले. 80 च्या दशकानंतर एलटीटीईला अनेक देशांकडून पाठिंबा मिळाला आणि एलटीटीईची ताकद वाढली. एलटीटीईच्या उपस्थितीमुळे श्रीलंकेत गृहयुद्ध सुरू झाले. शांतता प्रस्थापित करण्यासाठी 29 जुलै 1987 रोजी भारत आणि श्रीलंका यांच्यात शांतता करार झाला. 1987 मध्ये भारताने एलटीटीई विरुद्ध लढण्यासाठी श्रीलंकेत भारतीय सैन्य पाठवले. भारताच्या या भूमिकेमुळे एलटीटीईने  भारताच्या विरोधात जात या घटनेचा बदला घेण्यासाठी भारताचे तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांची एका निवडणूक रॅलीत हत्या  केली. राजीव गांधी यांची एका निवडणूक रॅलीत हत्या झाली. 21 मे 1991 रोजी तामिळनाडूमधील श्रीपेरुंबदूर येथे निवडणूक रॅलीदरम्यान धनू नावाच्या एलटीटीईच्या आत्मघाती बॉम्बरने राजीव गांधींची हत्या केली. हा स्फोट एवढा भयंकर होता की, राजीव गांधी आणि हल्लेखोर धनू यांच्यासह 16 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 45 जण गंभीर जखमी झाले.  जगभरातून या घटनेचा निषेध करण्यात आला. राजीव गांधी यांच्या हत्येमुळे एलटीटीईची ताकद वाढली, किंबहुना या दहशतवादी संघटनेचा दरारा अधिक वाढला.  

एलटीटीईच्या अतिरेकी कारवाया रोखण्यासाठी श्रीलंका सरकारनं मोठी कारवाई सुरु केली. श्रीलंका सरकारने एलटीटीई प्रमुख प्रभाकरचा 17 मे 2009 रोजी मारला गेल्याचे स्पष्ट केले. या कारवाईनंतर दुसऱ्या दिवशी प्रभाकरनचा मृतदेह मिडियाला दाखवण्यात आला. 18 मे 2009 रोजी एलटीटीई प्रमुख प्रभाकरन यांच्या मृत्यूनंतर, श्रीलंका सरकारने एलटीटीईच्या समाप्तीची घोषणा केली.  प्रभाकरनच्या (Prabhakaran) मृत्यूच्या एका आठवड्यानंतर, एलटीटीईचे प्रवक्ते सेल्वारासा पथमनाथन यांनीही प्रभाकरन (Prabhakaran) मारला गेल्याचे कबूल केले. अर्थात  दोन आठवड्यांनंतर प्रभाकरनच्या मृतदेहाची डीएनए चाचणी करण्यात आली आणि मृत प्रभाकरनच असल्याचे सांगण्यात आले.  या कारवाईत,  प्रभाकरनचा मुलगा अँथनी चार्ल्सही मारला गेल्याचे स्पष्ट करण्यात आले.  

आता या घटनेनंतर पुन्हा एकदा एलटीटीई प्रमुख प्रभाकरनचे (Prabhakaran) नाव चर्चेत आले आहे.  त्याला कारण ठरले आहे, प्रभाकरन जिवंत असल्याचा दावा. तामिळनाडू काँग्रेसचे नेते आणि तमिळ पाझा नेदुमारनच्या जागतिक महासंघाचे अध्यक्ष,  यांनी लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम चा प्रमुख वेलुपिल्लई प्रभाकरन (Prabhakaran) जिवंत असल्याचा दावा केला.  एलटीटीईचा नेता प्रभाकरन जिवंत असल्याचा दावा तंजावूर तामिळनाडूच्या वर्ल्ड कॉन्फेडरेशन ऑफ तामिळचे अध्यक्ष पी नेदुमारन यांनी एका निवेदनाद्वारे केला आहे. नेदुमारन यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तामिळ राष्ट्रीय नेता प्रभाकरन जिवंत आहे. प्रभाकरनच्या (Prabhakaran) कुटुंबीयांच्या संमतीनेच हा खुलासा आपण करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तसेच लिट्टे प्रमुख जिवंत आणि बरा असल्याचा दावा नेदुमारन यांनी केला. प्रभाकरन लवकरच बाहेर येईल आणि तामिळ लोकांसाठी पुन्हा नव्या योजनांसह काम करेल असेही नेदुमारन यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.  

नेदुमारन यांनी आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि श्रीलंकेतील राजपक्षे राजवटीविरुद्ध सिंहली लोकांचे शक्तिशाली बंड पाहता प्रभाकरनला बाहेर पडण्याची हीच योग्य वेळ असल्याचेही सांगितले आहे. यासोबतच नेदुमारन यांनी इलम तमिळ म्हणजेच श्रीलंकन ​​तमिळ आणि जगभरातील तमिळांना प्रभाकरनला (Prabhakaran) पूर्ण पाठिंबा देण्यासाठी एकजूट होण्याचे आवाहन केले आहे. प्रभाकरन त्याच्या कुटुंबीयांच्या संपर्कात असल्याचा दावीही नेदुमारन यांनी पुढे केला आहे. तसेच प्रभाकरन संबंधातील माहिती जाहीर करण्यासाठी लिट्टे नेत्याची संमती मिळाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळेच त्यांच्या या दाव्यांनी सध्या खळबळ उडाली आहे. नेदुमारन यांच्या वक्तव्यानंतर तामिळनाडू काँग्रेसचे प्रमुख केएस अलागिरी यांनीही आनंद व्यक्त केला आहे. प्रभाकरन (Prabhakaran) पुढे आला तर त्याची भेट घ्यायला आनंद वाटेल असेही त्यांनी सांगितले आहे.  

=========

हे देखील वाचा : सोन्याची जीभ आणि हृदय असलेल्या Mummy च्या रहस्यमय गोष्टी

=========

भारतात व्यक्त होणा-या या प्रभाकरनबाबतच्या (Prabhakaran) दाव्यांवर श्रीलंकेच्या संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. श्रीलंकेच्या संरक्षण मंत्रालयाने प्रभाकरन जिवंत असल्याचा दावा विनोद म्हणून फेटाळून लावला आहे. प्रभाकरनला (Prabhakaran) 14 वर्षांपूर्वी श्रीलंका सरकारने मृत घोषित केले होते. त्यानंतर श्रीलंकेतील जाफना येथेही लिट्टे आणि लष्कर यांच्यातील संघर्ष संपल्याची घोषणा करण्यात आली. आता पुन्हा चौदा वर्षानंतर प्रभाकरनचे (Prabhakaran) नाव पुढे आले आहे.  यानंतर त्याचा दबदबा असलेल्या भागात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. यावरुनच प्रभाकरचा त्याकाळी किती वचक होता याचा अंदाज येतो.

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.