तुम्ही एखादा व्यवसाय किंवा नोकरी जरी करत असाल तर कर्जाची कधी ना कधी तरी गरज भासते. मात्र कर्ज तेव्हाच मिळते जेव्हा त्या व्यक्तीचा सिबिल स्कोर उत्तम असतो. कोणतीही बँक कर्ज देण्यापूर्वी सर्वात प्रथम सिबिल स्कोर तपासून पाहतो. तर तो उत्तम नसेल तर बँक त्या व्यक्तीला कर्ज देण्यास नकार देते आणि कर्जाचा अर्ज सुद्धा नाकारला जातो. अशातच ज्या व्यक्तीला कर्जाची गरज असते त्याला पैशांअभावी काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तर जाणून घेऊयात तुम्ही तुमचा सिबिल स्कोर कशा पद्धतीने ठीक करु शकता.(CIBIL Score Tips)
CIBIL Score ठीक करण्याची पद्धत
-जर तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर उत्तम करायचा असेल तर नेहमीच लक्षात ठेवा की, जे काही कर्ज तुम्ही घेतले आहे त्याचे पेमेंट वेळेवर करा. ईएमआय भरण्यासाठी उशिर करु नका.
-तुम्हाला तुमच्या क्रेडिट रिपोर्टचा तपास करायला हवा. काही वेळेस असे होते की, तुम्ही तुमच्याकडून कर्ज फडले आणि ते बंद ही झाले. मात्र काही प्रशासनिक कारणांस्तव कर्ज अॅक्टिव्ह असल्याचे दिसते. याचा प्रभाव तुमच्या क्रेडिट स्कोरवर पडतो. त्यामुळे क्रेडिट स्कोरचा रिपोर्ट जरुर तपासून पहा.

-सिबिल स्कोर सुधारावा असे वाटत असेल तर प्रथम तुम्ही तुमच्या क्रेडिटचे बिल वेळोवेळी भरावे. कोणत्याही कर्जाची रक्कम शिल्लक ठेवू नका. जेणेकरुन तुमचा सिबिल स्कोर सुधारेल.
-सिबिल स्कोर ठीक करण्यासाठी लोन गारंटर राहू नका. या व्यतिरिक्त जॉइंट अकाउंट सुद्धा उघडू नका. अशातच दुसरी पार्टीने डिफॉल्ट केल्यास त्याचा प्रभाव तुमच्या सिबिल स्कोरवर पडू शकतो.
-तसेच एकाच वेळी एकापेक्षा अधिक कर्ज घेण्यापासून दूर रहा. जरी घतले असतील तरीही ते वेळोवेळी भरा. मात्र ते भरले नाहीत तर तुमचा सिबिल स्कोर खराब होऊ शकतो. (CIBIL Score Tips)
-तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर सुधारायचा असेल तर कर्ज दीर्घ काळासाठी घ्या. असे केल्याने ईएमआयची रक्कम कमी होते. त्यामुळे तुम्हाला सुद्धा ते भरण्यास अगदी सोप्पे जाते. जेव्हा तुम्ही वेळोवेळी आपले पेमेंट करता तेव्हा तुमचा सिबिल स्कोर वाढेल.
सिबिल स्कोर म्हणजे काय आणि तो कसा काम करतो?
तुमचा सिबिल स्कोर तीन अंकांचा एक क्रमांक असतो. जो ३००-९०० दरम्यान असतो. याच्या आधारावर तुमच्या क्रेडिटची पात्रतेचे आकलन केले जाते. तुमची क्रेडिट हिस्ट्री आणि तुमचा सिबिल रिपोर्ट पाहून क्रेडिट स्कोर मिळवला जातो. ज्याला ट्रांसयुनियन सिबिल द्वारे रेकॉर्डच्या रुपात ठेवले जाते. तुम्हाला एखादे कर्ज मिळण्यापूर्वी जसे आपण पाहिले सिबिल स्कोर तपासून पाहिला जातो. पण तुमचा क्रेडिट स्कोर ९०० च्या आसपास असेल तर तुम्हाला कर्ज मिळणे अधिक सोप्पे होते. तर ३०० च्या आसपास सिबिल स्कोर असणे उत्तम मानले जात नाही.
हे देखील वाचा- घरात किती रोख रक्कम ठेवू शकता? जाणून घ्या अन्यथा…
तर पर्सनल लोनसाठी तुमचा सिबिल स्कोर कमीत कमी ७५० च्या आसपास असावा. त्याचसोबत गृहकर्जासाठी प्रत्येक कर्ज देणाऱ्या बँकेची अट ही सिबिल स्कोरसाठी वेगवेगळी असते. एखाद्याची मर्यादा ७०० तर दुसऱ्याची ६५० असू शकतो. मात्र ७५० किंवा त्याहून अधिक असेल तर उत्तम मानले जाते.