चीन (China) या देशाची महत्त्वकांक्षा ही जीवघेणी ठरत आहे. काही दिवसांपूर्वी चीन अंतराळातही आपला वर्चस्मा ठेवण्यासाठी प्रयत्न करतांना दिसून आले आहे. अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्याच्या तयारीत चीन आहे. एकीकडे अंतराळ ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करणार चीन (China) आता पृथ्वीच्या गर्भातही खोदकाम करुन खनिजांचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहे. चीननं भूगर्भात असाच एक प्रकल्प सुरु केला आहे. त्याचे स्वरुप स्पष्ट झाल्यावर पुन्हा चीन (China) एवढा अट्टाहास का करीत आहे, याची चर्चा सुरु झाली. एका गुप्त मोहिमेअंतर्गत चीन, जमिनीखाली 10 हजार मीटर खोल खड्डा खोदत आहे. चीनने आपल्या या मोहिमेचे कारण अर्थाच सांगितले नाही. तरी भूगर्भातील खनिजे आणि उर्जासाधनांचा शोध घेण्यासाठीच चीननं (China) ही मोहीम सुरु केल्याची माहिती आहे.

गेल्या काही महिन्यापासून चीनची अंतराळ काबिज करण्याची मोहीम चर्चेत होती. मात्र आता त्या मोहिमेसोबत चीननं पृथ्वीच्या गर्भात चक्क 10 हजार मीटर खोल खड्डा खोदण्यास सुरुवात केली आहे. हा खड्डा पृथ्वीच्या आत 32808 फूट खोल असून याद्वारे आता चीन पृथ्वीतील खनिजेही आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणार आहे. चीनचे हे उत्खनन पृथ्वीच्या क्रेटेशियस प्रणालीच्या थरापर्यंत जाईल, अशी माहिती आहे. या थरापर्यंत सुमारे 145 दशलक्ष वर्षे जुने खडक आहेत. यातील खनिजे ही अमुल्य असून चीन त्यासाठी प्रयत्न करत आहे. हा प्रकल्प अत्यंत अवघड असून चीननं याबाबत बरीच गुप्तता बाळगली आहे. अनेक चिनी शास्त्रज्ञ यासाठी कार्यरत आहेत.चीनमधील तेल साठ्याबाबत सर्वात समृद्ध प्रदेश असलेल्या शिनजियांगमध्ये हा 10,000 मीटर खोल खड्डा खोदण्यात येत आहे. शिनजियांगमधील आतापर्यंतच्या सर्वात खोल असलेल्या या खड्यासाठी तेवढीच अवाढव्य ड्रिलिंग मशीन तयार करण्यात आली असून त्याचे ड्रिलिंग सुरु झाले आहे. काही दिवसांपूर्वीच चीनने गोबी वाळवंटातून आपली पहिली नागरी अंतराळ मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा चीनने बराच गाजावजा केला होता. त्याचवेळी चीन एकीकडे या शिनजियांगमधील मोहीमेची तयारी करीत होता. ही मोहीम गुप्त राहिल याची काळजी चीननं घेतली होती. पण ही अंतराळ मोहीमेनंतर ही शिनजियांगमधील बातमीही बाहेर आली आणि चीनच्या या कृतीमागील कारणांवर चर्चा होऊ लागली आहे.
चीनमधील (China) आलेल्या माहितीनुसार जमिनीच्या आत खोल खणण्यात येत असलेला हा खड्डा 10 पेक्षा जास्त महाद्वीपीय स्तर किंवा खडकाच्या थरांमध्ये प्रवेश करेल. पृथ्वीच्या 145 दशलक्ष वर्ष जुन्या क्रेटासियस प्रणालीपर्यंत पोहोचण्याची क्षमता यात असल्याचीही माहिती आहे. यासंदर्भात चीनी अभियांत्रिकी अकादमीचे शास्त्रज्ञ सन जिनशेंग यांनी शिन्हुआला सांगितले की, हा भव्य ड्रिलींग प्रकल्प अतिशय व्यापक होणार आहे. त्याची तुलना कोणाबरोबरही होऊ शकत नाही. या मोहिमेसाठी चीनचे (China) राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न करीत होते. त्यांनी 2021 मध्ये यासंदर्भात शास्त्रज्ञांचा एक गट तयार करुन यासंदर्भात संशोधन करण्याच्या सूचना त्यांना केल्या होत्या. या शोधातून मिळालेल्या माहितीचा उपयोग प्रमुख खनिज आणि ऊर्जा संसाधने ओळखण्यासाठी करण्यात येणार आहे. यासोबतच भूकंप आणि ज्वालामुखीचा उद्रेक यासारख्या नैसर्गिक आपत्तींची आधीच माहिती घेण्यासाठी करण्यात येणार आहे.
=======
हे देखील वाचा : कॉलेजला जाणाऱ्या तुमच्या मुलीला शिकवा ‘या’ गोष्टी
=======
चीनची (China) ही मोहीम यशस्वी झाली तर पृथ्वीच्या आत असणारे हे दुसरे सर्वात खोल मानवनिर्मित छिद्र ठरणार आहे. पृथ्वीच्या आता पहिले खोल छिद्र रशियात आहे. रशियन कोला सुपरदीप बोरहोल म्हणून प्रसिद्ध असलेले हे छिद्र 20 वर्षांच्या ड्रिलिंगनंतर 1989 मध्ये 12,262 मीटर म्हणजे 40,230 फूट एवढे खोदण्यात आले आहे. या क्षेत्रातील तज्ञांच्या मतानुसार चिनी उत्खनन पृथ्वीच्या क्रेटेशियस प्रणालीच्या थरापर्यंत जाईल. तिथे असलेल्या 145 दशलक्ष वर्षे जुन्या खडकांचा त्याद्वारे अभ्यास करण्यात येणार आहे.
याशिवाय चीन आता अंतराळातही मानवांना पाठवणार आहे. 2030 पर्यंत चंद्रावर पोहोचण्याची चीनची योजना आहे. यासाठी चिनी सैन्याच्या अंतराळ कार्यक्रमावर अनेक अब्जावधी रुपये खर्च करण्यात येत आहेत. चीनला अंतराळ शर्यतीत अमेरिका आणि रशियाची बरोबरी करायची आहे. तसेच चीनने तिसरे कायमस्वरूपी अंतराळ स्थानक बांधण्याचे काम पूर्ण केले आहे. 2011 मध्ये अमेरिकेने आपली अंतराळ संस्था नासाला चीनच्या (China) अंतराळ संस्थेसोबत काम करण्यास रोखले होते. तेव्हापासून चीन अमेरिकेवर मात करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आता चीन अंतराळासोबत पृथ्वीच्या आतील खनिजे शोधण्याच्या कामातही अन्य देशांना मात करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
सई बने