चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनंतर आता संरक्षण मंत्री सुद्धा बेपत्ता झाले आहेत. शी जिनगिंप यांच्या सरकारच्या काळात अखेर कुठे बेपत्ता होतायात मंत्री आणि आता संरक्षण मंत्री बेपत्ता होण्याचे कारण काय असे विविध प्रश्न उपस्थितीत केले जात आहेत. कारण गेल्या १४ दिवसांपासून चीनचे संरक्षणमंत्रीली शांग फू यांचा काहीच शोध लागलेला नाही. (China defence minister)
ली शांगफू यांनी दोन आठवड्यांपूर्वी चीन-अफ्रिका शांति आणि सुरक्षा फोरमला संबोधित केले होते. या कार्यक्रमात चीनचे संरक्षण मंत्री २९ ऑगस्टला शेवटचे दिसले होते. त्यानंतर ली शांगफू बेपत्ता आहेत. याच दरम्यान संरक्षण मंत्रालयाच्या कार्यक्रमांमध्ये ही ते दिसले नाहीत. रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, बीजिंग मध्ये संशयास्पद राजकीय हालचाल सुरु आहे.
चीनच्या संरक्षण मंत्र्यांवर अमेरिकेने घातलीयं बंदी
यापूर्वी चीनच्या सैन्यातील रॉकेट फोर्सचे जनरल सुद्धा बेपत्ता झाले होते. याच दरम्यान राष्ट्रपती जिनपिंग यांनी सैन्यातील काही अधिकाऱ्यांना हटवले होते. चीनचे संरक्षण मंत्री बेपत्ता झाल्याची चर्चा जगभर होत आहे. सोशल मीडियात त्यांच्याबद्दल विविध गोष्टी बोलल्या जात आहेत. काही अफवा सुद्धा पसरवल्या जात आहेत. अमेरिकेने ली शांगफू यांच्यावर काही कठोर प्रतिबंध सुद्धा लावले आहेत.
शी यांनी जुलै महिन्यात निवडलेल्या परराष्ट्र मंत्री किन यांना कोणतेही स्पष्टीकरण न देता पदावरून हटवले होते. पीपुल्स लिबरेशन आर्मीच्या रॉकेट फोर्समध्ये दोन सर्वाधिक वरिष्ठ नेत्यांनी ज्यांनी स्वत:हूनच स्वत:ची निवड केली होती त्यांना बदलले गेले. चीनच्या सैन्यात सुद्धा जुलै महिन्यात पाच वर्षांपेक्षा अधिक काळ असलेल्या जुन्या हार्डवेअर खरेदी संबंधित भ्रष्टाचाराप्रकरणी तपास सुरु केला होता. पीएलएच्या उपकरण विकास विभागाने आठ मुद्दे उपस्थितीत केले. ज्यावर ते लक्ष देत आहेत.यामध्ये प्रोजेक्ट आणि आर्मी युनिट्सबद्दल माहिती लीक करणे आणि काही कंपन्यांना बिड सुरक्षित करण्यात मदत करणे समाविष्ट आहे. (China defence minister)
हेही वाचा- इस्लाम धर्मात बहुविवाह प्रथा नाही, शरियत आणि संविधान काय म्हणते पहा
लष्कर असे म्हणत आहे की, ते ऑक्टोंबर २०१७ पर्यंत काही समस्यांचा तपास करत आहेत. चीनचे संरक्षण मंत्री ली यांनी सप्टेंबर २०१७ ते २०२२ पर्यंत उपकरण विभागाचे नेतृत्व केले. मात्र, त्यांच्यावर गैरकृत्य झाल्याचा संशय असल्याचे कोणतेही संकेत नाहीत. शिन्हुआच्या रिपोर्टनुसार शी यांनी नुकत्याच केलेल्या एका भाषणात युद्धाच्या तयारीच्या स्तरात सुधार आणि नव्या युद्ध क्षमतांच्या निर्माणासाठी प्रयत्न करावेत असे अपील केले होते. त्यांच्यासोबत त्यावेळी चीनचे टॉप मिलिट्री बॉडीचे उपाध्यक्ष झांग युक्सिया सुद्धा होते.