Home » Childrens Day : १४ नोव्हेंबरला साजऱ्या होणाऱ्या बालदिनाचे महत्त्व आणि इतिहास

Childrens Day : १४ नोव्हेंबरला साजऱ्या होणाऱ्या बालदिनाचे महत्त्व आणि इतिहास

by Jyotsna Kulkarni
0 comment
Childrens Day
Share

नोव्हेंबर महिना लागला की सगळ्यांना वेध लागतात ते १४ नोव्हेंबर या दिवसाचे. याचे कारण देखील खास आहे. कारण दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिन बालदिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या सर्वांनाच लहान मुलं अतिशय आवडत असतात. ही लहान मुलंच आपल्या देशाचे उज्ज्वल भवितव्य आहेत. याच मुलांचे हक्क, त्यांचे महत्त्व आणि त्यांच्याप्रती समाजाच्या जबाबदाऱ्यांची आठवण करून देण्यासाठी बालदिन साजरा केला जातो. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी बालदिन साजरा केला जातो. भारतात बालदिन पूर्वी २० नोव्हेंबर रोजी साजरा केला जात होता, परंतु १९६४ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर, संसदेने त्यांचा वाढदिवस, १४ नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. (Children’s Day)

जगभरात १९२५ पासून ‘बाल दिन’साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाने २० नोव्हेंबर १९५४ ला बाल दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. आजही विविध देशांमध्ये ‘बाल दिन’च्या तारखांबाबत भिन्नता आढळते. भारतात मात्र १९६४ नंतर १४ नोव्हेंबरला ‘बाल दिन’ साजरा केला जाऊ लागला. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्मदिन म्हणजे १४ नोव्हेंबर बालदिन साजरा केला जातो. (Marathi)

नेहरुंचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ रोजी झाला होता. पंडित जवाहरलाल नेहरू मुलांवर खूप प्रेम करत असत. ते मुलांना देशाचे भवितव्य मानतात. पंडित जवाहरलाल नेहरूंनी मुलांच्या कल्याणासाठी नेहमीच काम केले. यासोबतच त्यांनी मुलांसाठी अनेक योजना सुरू केल्या. मुलांना स्वतंत्र आणि आनंदी आयुष्य जगण्याची संधी मिळाली पाहिजे, जेणेकरून ते देशाचे नाव उज्ज्वल करू शकतील आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करू शकतील, असे नेहरूंचे मत होते. (Todays Marathi HEadline)

Childrens Day

बालदिनाचा मुख्य उद्देश म्हणजे मुलांच्या अधिकारांचे रक्षण करणे, त्यांना सुरक्षित वातावरण देणे आणि त्यांच्या शिक्षणाकडे व आरोग्याकडे लक्ष देणे हे आहे. बालदिनाला बालकांवरील वाढते अत्याचार, बालमजुरी आणि शिक्षणातील संधी याविषयी जनजागृती केली जाते. हा दिवस मुलांच्या आनंदासोबतच त्यांच्या अधिकारांबद्दल समाजाच्या असणाऱ्या जबाबदारीची जाणीव करुन देतो. (Top Marathi News)

पं. नेहरुंचं असं म्हणणं होतं की मुलांना त्यांच्या बालवयातच योग्य मार्गदर्शन आणि प्रेम दिलं पाहिजे. त्यांच्या अनुसार, मुलांमध्ये कोणताही भेदभाव करू नये. मुलं स्वतंत्र विचारांची आणि इतर प्रत्येक मुलांपेक्षा वेगळी असतात त्यामुळे त्यांना स्वतंत्र पद्धतीने शिकण्याची आणि वाढण्याची मोकळीक द्यायला हवी. पं. नेहरु नेहमीच लहान मुलांमध्ये जाऊन त्यांच्यासोबत वेळ घालवायचे. त्यांचा असा विश्वास होता की मुलांमध्ये निरागसता, प्रामाणिकपणा आणि निष्ठा असते जी मोठ्यांनाही कधीकधी प्रेरणा देते. (Latest Marathi Headline)

पंडित जवाहरलाल नेहरू मुलांवर खूप प्रेम करत असत. ते मुलांना देशाचे भवितव्य मानतात. पंडित जवाहरलाल नेहरूंनी मुलांच्या कल्याणासाठी नेहमीच काम केले. यासोबतच त्यांनी मुलांसाठी अनेक योजना सुरू केल्या. मुलांना स्वतंत्र आणि आनंदी आयुष्य जगण्याची संधी मिळाली पाहिजे, जेणेकरून ते देशाचे नाव उज्ज्वल करू शकतील आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करू शकतील, असे नेहरूंचे मत होते. पंडित नेहरुंनी भारत स्वतंत्र झाल्यानंतर मुलांच्या आणि तरुणांच्या हक्कांसाठी, आरोग्यासाठी आणि शैक्षणिक प्रगतीसाठी महत्त्वाचे योगदान दिले. (Top Trending Headline)

========

Ekadshi : जाणून घ्या चातुर्मास संपल्यानंतर येणाऱ्या उत्पत्ति एकादशीचे महत्त्व, पूजाविधी आणि कथा

Sankranti : जाणून घ्या वृश्चिक संक्रांतीचे खास महत्त्व

========

नेहरुंनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या शैक्षणिक संस्थांची स्थापना केली. मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी जनजागृती केली. देशात मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पोषक वातावरण तयार व्हावे, यासाठी नेहरुंनी त्यांच्या कारकिर्दीत खूप प्रयत्न केले. त्यांनी 1955 साली चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी इंडियाची स्थापना केली. नेहरुंच्या मते, लहान मुलं भारताचं भविष्य आहेत. भारताचा विकास होण्यासाठी मुलांचा विकास होण्याची गरज आहे. त्यासाठीच नेहरू यांनी कायम प्रयत्न केले. दरम्यान बालदिनाच्या दिवशी महाराष्ट्रासह देशभरातील शाळांमध्ये बालदिनाच्या दिवशी चर्चासत्र, प्रश्नोत्तर, डान्स यांसह विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. शिवाय कपडे, चॉकलेट आणि इतर खाद्यपदार्थांचे वाटप केले जाते.  (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.