जगभरात वेगवेगळ्या देशांच्या वेगवेगळ्या श्रद्धा आणि वेगवेगळे विश्वास आहेत. खरं तर, प्रत्येक देशाची स्वतःची एक निराळी जीवनशैली असते. त्याचप्रमाणे, देशातील विविध राज्यांमध्ये अनेक प्रकारचे समुदाय राहतात आणि ते त्यांच्या संस्कृतीनुसार किंवा श्रद्धा आणि अंधश्रद्धेनुसार जीवन जगतात. तुम्ही जगात अशा अनेक गोष्टी वाचल्या असतील, ऐकल्या असतील किंवा पाहिल्या असतील ज्यांवर विश्वास ठेवणं कठीण आहे. असाच एक देश आहे, जिथे मूल जन्माला आल्यानंतर ते थेट एक वर्षाच असतं. हे ऐकून विचित्र तर वाटतं, पण विश्वास ठेवणंही अवघड वाटतं. पण काही प्रमाणात हे खरे आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया. (newborn is 1 year old)
जगभरातील देशांमध्ये वेगवेगळ्या समजुती आहेत. काही समजण्याजोगे आहेत, पण काही समजुती अतिशय विचित्र आहेत. ज्यावर विश्वास ठेवणे खूप कठीण आहे. (newborn is 1 year old)
देशात बनवला गेलाय कायदा
असाच एक समज दक्षिण कोरियात आहे. त्यामुळे हा देशही लोकांमध्ये चर्चेचा विषय राहिला आहे. खरं तर, दक्षिण कोरियामध्ये आईच्या उदरातून मूल बाहेर येताच त्याचे वय एक वर्षाचे गृहीत धरले जाते. यासंदर्भात देशात कायदाही करण्यात आला. (newborn is 1 year old)
प्रत्येकजण त्याच्या मूळ वयापेक्षा आहे एक वर्ष मोठा
देशाच्या या कायद्यामुळे जेव्हा जेव्हा एखादे मूल येथे जन्माला येते, तेव्हा ते थेट एक वर्षाचे मानले जाते. त्यामुळे येथे राहणारा प्रत्येक व्यक्ती त्याच्या मूळ वयापेक्षा एक वर्ष मोठा आहे. (newborn is 1 year old)
‘हे’ असू शकते कारण
कोरियन एज का तयार झाले, यामागे कोणतेही ठोस कारण नाही. पण लोक म्हणतात की, जेव्हा मूल आईच्या पोटात येते तेव्हाच त्याचे वय सुरू होते. (newborn is 1 year old)
दक्षिण कोरियातील विचित्र नियम
दक्षिण कोरियामध्ये मूल जन्माला येताच एक वर्षाचे मूल समजण्यासोबतच, काही विचित्र नियम देखील आहेत. या देशात कुठेही लाल शाई वापरली जात नाही. खरं तर, या देशात लाल रंग हा मृत्यूचा रंग मानला जातो. या रंगाची शाई मृत्यूचे लक्षण आहे, असा समज असल्याने ती कोणीही वापरत नाही. (newborn is 1 year old)
४ क्रमांकाचीही आहे भीती
तुम्हाला या देशातील कोणत्याही इमारतीत किंवा ठिकाणी चौथा क्रमांक सापडणार नाही. खरं तर, लोकांच्या मते, मृत्यूची संख्या चार आहे. या कारणास्तव चार क्रमांकाचा वापर या देशात प्रतिबंधित आहे. तसेच याठिकाणी लोक रक्तगटानुसार स्वभाव सांगतात. दक्षिण कोरियामध्ये रक्तगटावरून कळते की, कोणती व्यक्ती चांगली आहे आणि कोणती व्यक्ती फसवी आहे? (newborn is 1 year old)