आगामी “जिप्सी” (Gypsy Marathi Movie) या चित्रपटातून बालकलाकार स्वराली कामथे चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. दोनशे मुलींमधून स्वरालीची या भूमिकेसाठी निवड करण्यात आली असून, जिप्सी या चित्रपटाचा पुण्यात नुकताच मुहूर्त करण्यात आला. यश मनोहर सणस त्यांच्या यश सणस फिल्म्स या निर्मिती संस्थेद्वारे बोलपट क्रिएशन्सच्या सहयोगाने “जिप्सी” या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.
आतापर्यंत २५ हून अधिक चित्रपटांसाठी क्लॅप बॉय, सहाय्यक दिग्दर्शक अशा विविध जबाबदाऱ्या निभावल्यानंतर शशि चंद्रकांत खंदारे दिग्दर्शक म्हणून आपला पहिला चित्रपट करत आहेत. श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी मठ धनकवडी पुणे येथे जिप्सी या आगामी सिनेमाचा मुहूर्त नगरसेवक राजेंद्र आबा शिळीमकर यांच्या हस्ते संपन्न झाला.
====
हे देखील वाचा: ‘वीर दौडले सात’चं मोशन पोस्टर रिलीज
====
ज्येष्ठ पत्रकार,शंकर महाराजांचे सेवकरी नानासाहेब नायडू, समाज सेवक श्रीनिवास (भैय्यासाहेब) निगडे, चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक शशि चंद्रकांत खंदारे, निर्माते यश मनोहर सणस, कार्यकारी निर्माते मंगेश भीमराज जोंधळे, व्यवस्थापक विजय मस्के, साउंड डिझायनर विकास खंदारे, बालकलाकार स्वराली कामथे उपस्थित होते.
जिप्सीतील प्रमुख भूमिकेसाठी सात-आठ वर्षांची बालकलाकार हवी होती. मात्र तिच्याकडे अभिनयाव्यतिरिक्त अन्य कौशल्यं असणंही आवश्यक होतं. त्यानुसार सुरुवातीला दोनशे मुलींची प्रोफाईल तपासण्यात आली. पुण्यात ऑडिशन ठेवण्यात आली. सत्तर ऐंशी बाल कलाकार ऑडिशनला आले. त्यातील भूमिकेला चपखल बसणारी स्वराली कामथेही होती.
====
हे देखील वाचा: “फाईल नंबर 498 A” चित्रपटाचे टीजर पोस्टर लाँच
====
जेजुरीला राहणारी स्वराली तिसरीत शिकत आहे. स्वराली नृत्यात निपुण आहे. त्याशिवाय ती तायक्वांदो, पार्कओव्हर, जिम्नॅस्टिक्सही शिकते. त्यासाठी ती आईबरोबर रोज जेजुरी ते पुणे प्रवास करते. त्यामुळे अत्यंत कष्टाळू असलेल्या स्वरालीमुळे जिप्सीतील भूमिकेला चार चाँद लागतील यात शंका नाही. जिप्सी या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं होतं. तर चित्रपटाचं चित्रीकरणही लवकरच सुरू होणार आहे.