Home » क्वालीफायर १ च्या लढतीत चेन्नई आणि गुजरात आमनेसामने.

क्वालीफायर १ च्या लढतीत चेन्नई आणि गुजरात आमनेसामने.

by Team Gajawaja
0 comment
GT vs CSK
Share

इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटमधील प्लेऑफच्या टप्प्याला मंगळवारपासून सुरुवात होणार असून क्वालीफायर १ च्या लढतीत चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायट्न्स आमनेसामने असतील. चेन्नईच्या चेपॉक स्टेडीयमवर होणाऱ्या या सामन्यात दोन्ही संघ विजयाचे लक्ष डोळ्यासमोर ठेवून मैदानात उतरतील. महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नईसमोर मागच्या सलग दोन्ही सामन्यातील शतकवीर शुभमन गिलला रोखण्याचे आव्हान असेल. साखळी सामन्यातील शेवटच्या दोन्ही सामन्यात शुभमन गिलने शतकी कामगिरी करत उत्कृष्ट प्रदर्शन केले होते. बंगळूरूविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने शतक झळकावत आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. त्याच्या या कामगिरीमुळे बंगळूरूच्या संघाचे प्लेऑफचे स्वप्न भंगले होते. (GT vs CSK)

यंदाच्या हंगामात गिल जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. १४ सामन्यात त्याने ६८० धावा केल्या असून सर्वाधिक धावा ठोकणाऱ्या फलंदाजांमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याला रोखण्यासाठी महेंद्रसिंग धोनी काय रणनीती आखतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. चेन्नईच्या चेपॉक स्टेडीयमवरील खेळपट्टी नेहमीच फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल ठरते. परंतु दोन्ही संघातील फलंदाज लयीत असल्यामुळे मोठ्या धावसंख्येचा सामना इथे बघायला मिळू शकतो.(GT vs CSK)

घरच्या मैदानावर सामना खेळत असल्यामुळे चेन्नईला त्याचा नक्की फायदा होईल. यंदाच्या हंगामात त्यांनी सात सामने या खेळपट्टीवर खेळले आहेत त्यापैकी चार सामन्यात विजय मिळवला आहे. दुसरीकडे गुजरातच्या संघाने इथे एकही एकही सामना खेळलेला नाही त्यामुळे त्यांच्यापुढे लवकरात लवकर खेळपट्टी समजून घेण्याचे आव्हान असेल.(GT vs CSK)

गुजरातने यंदाच्या हंगामात मिळवलेल्या यशात त्यांच्या सर्वच खेळाडूंचे योगदान आहे. प्रत्येक खेळाडूने जबाबदारीने खेळत आपली भूमिका चोख बजावत संघाला विजय मिळवून दिले आहेत. व्रीद्धीमान साहा आणि शुभमन गिलने संघाला वेळोवेळी चांगली सुरुवात मिळवून दिली आहे. शुभमन गिलकडून तर संघाला विशेष अपेक्षा असतील. मधल्या फळीत हार्दिक पांड्या, डेव्हिड मिलर आणि विजय शंकर यांच्याकडून संघाला अपेक्षा असतील. राहुल तेवतीया चांगला शेवट करण्यास उत्सुक असेल.

संघाच्या गोलंदाजीची मदार राशीद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद आणि मोहित शर्मा यांच्यावर असेल. हार्दिक पांड्या यांच्या सोबतीला असेलच. पॉवर प्ले मध्ये लवकरात लवकर विकेट्स मिळवून देण्यासाठी मोहम्मद शमी आणि मोहित शर्मा उत्सुक असतील. नूर अहमद आणि राशीद खान हे दोघे फिरकीची धुरा सांभाळतील. चालू हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणारे दोन्ही गोलंदाज गुजरातच्या गोटात आहेत. त्यामुळे त्यांची गोलंदाजी अत्यंत धारदार भासते. यांच्याकडून संघाला चमकदार कामगिरीची आशा असेल.(GT vs CSK)

======

हे देखील वाचा : ग्रीनचे तडाखेदार शतक, मुंबई विजयी !

======

दुसरीकडे चेन्नईचे सलामीवीर फलंदाज डेवोन कानवे आणि ऋतुराज गायकवाड चांगल्याच लयीत आहेत. दोघांनीही या हंगामात धावा चोपून संघाच्या यशात मोलाची भूमिका बजावली आहे. मधल्या फळीत शिवम दुबे, मोईन अली आणि अंबाती रायुडू हे फलंदाज चांगली कामगिरी करण्यास उत्सुक असतील. धोनी आणि जडेजा फटकेबाजी करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यास उत्सुक असतील.

चेन्नईच्या गोलंदाजांनी देखील या हंगामात चांगली कामगिरी केली आहे. दीपक चहर, तुषार देशपांडे यांनी सुरुवातीच्या षटकात चांगला मारा करत बळी मिळवले आहेत. महिषा पाथीरानाने शेवटच्या षटकात बळी मिळवत धावगतीवर ब्रेक लावण्याचे काम केले आहे. महिषा थिकसाना, रविंद्र जडेजा आणि मोईन अली यांच्यावर फिरकीची मदार असेल.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.