Home » तुमचा पार्टनर तुम्हाला फसवत असेल तर कधीच देणार नाही ‘या’ प्रश्नांची सरळ उत्तरं

तुमचा पार्टनर तुम्हाला फसवत असेल तर कधीच देणार नाही ‘या’ प्रश्नांची सरळ उत्तरं

by Team Gajawaja
0 comment
Love Affair Problem
Share

कोणत्याही हेल्थी रिलेशनशिपमध्ये सर्वाधिक गरजेची गोष्ट म्हणजे एकमेकांमध्ये विश्वास आणि हेल्थी बातचीत.नात्यात विश्वास नसेल तर नाते फार काळ टिकत नाही. त्याचसोबत एकमेकांशी खोटं बोलून नाते टिकवण्याचा किती ही प्रयत्न केला तरीही ते टिकत नाही. उलट त्याचाच मानसिक त्रास तुम्हाला होऊ शकतो. अशातच रिलेशनशिप एक्सपर्ट कॅलिस्टो एडम्स यांचे असे म्हणणे आहे की, जर तुम्ही पार्टनरसोबत प्रत्येक प्रकारच्या गोष्टीबद्दल उघडपणे चर्चा करता तर तुमच्या दोघांमध्ये भावनिक संबंध आणि विश्वास वाढतो. मात्र दुसऱ्या बाजूला जर तुमचा पार्टनर तुम्हाला फसवत असेल तर एकमेकांसोबत उघडपणे बातचीत करण्याबद्दल अडथळा येऊ शकतो. अशाच आम्ही तुम्हाला अशा काही प्रश्नांची उत्तरे सांगणार आहोत जेणेकरुन तुम्हाला कळेल की तुमचा पार्टनर तर तुम्हाला फसवत तर नाही ना? (Cheating in Relationship)

अशा प्रश्नांपासून दूर राहतात फसवणारे पार्टनर
-मी तुझा फोन वापरु शकतो का?
सर्टिफाइड रिलेशनसिप थेरेपिस्ट राबी स्लोमो स्लाटकिन यांचे असे म्हणणे आहे की, तुमचा पार्टनर तुमच्यापासून काही लपवत असेल किंवा फसवत असेल तर तुमच्यापासून फोन दूर ठेवेल. अशातच तुम्ही त्याला मी तुझा फोन वापरु शकतो का असा प्रश्न विचारा आणि पहा तुम्हाला उत्तर काय मिळते. यावेळी तुमचा पार्टनर तुम्हाला विविध कारणे देईलच आणि तुमच्या बोलण्याकडे सुद्धा दुर्लक्ष करेल.

Cheating in Relationship
Cheating in Relationship

-ऐवढा वेळ बाहेर का होता?
जर तुम्ही पार्टनरला अशा प्रकारचा थेट प्रश्न विचारला तर तो तुम्हाला पटकन उत्तर देणार नाही. तेव्हा समजून जा काही तरी गडबड आहे. त्यावेळी तुमच्या पार्टनरचे हावभाव सुद्धा पहा.

हे देखील वाचा- Live-in-Relationship संदर्भात भारतात ‘हे’ आहेत नियम

-तु खरंच फसवतोय का?
जर तुम्ही असा प्रश्न पार्टनरला विचारल्यानंतर त्याने तुम्हाला हसत उत्तर दिले तर समजून जा सर्वकाही ठिक आहे. मात्र पार्टनर घाबरला असेल तर तो वेगवेगळे बहाणे करेल. (Cheating in Relationship)

-माझ्या गोष्टींमध्ये ऐवढा इंटरफेअर का करतोय?
मॅरेज अॅन्ड फॅमिली थेरेपिस्ट कॅरलिन मडान यांचे असे म्हणणे आहे की, जर तुमचा पार्टनर तुमच्या गोष्टींमध्ये इंटरफेअर करत असेल तर थोडा विचार करा आपला पार्टनर ऐवढा इंटरफेअर का करत आहे. अशातच तुम्ही पार्टनरला तुमच्यासोबत वेळ घालवण्यास सांगत असाल तर तो काही बहाणे देत असेल तर काहीतरी गडबड आहे असे समजा.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.