भारतात काही राज्यांमध्ये परिक्षेदरम्यान अशा काही गोष्टी घडतात ज्यामध्ये सर्रास कॉपी केल्याचे दिसते. सोशल मीडियात परिक्षेत कॉपी कशी करावी किंवा त्यासंदर्भातील व्हिडिओ सुद्धा विद्यार्थ्यांकडून परिक्षेपूर्वी पाहिले जातात. ही गोष्ट करणे अत्यंत चुकीचे आहेच. त्याचसोबत विद्यार्थ्याचे त्या वर्षाचे नुकसान ही होते. या व्यतिरिक्त काही वेळेस परिक्षेला डमी विद्यार्थ्याला सुद्धा बसवले जात असल्याचे प्रकार घडले आहेत. पेपरसाठी जो डमी बसवला आहे त्याला जर पकडले असता विद्यार्थ्याला आणि त्या डमी विद्यार्थ्याला सुद्धा शिक्षा होऊ शकते. मजेशीर गोष्ट अशी की, फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरातील विद्यार्थी सुद्धा परिक्षेत कॉपी करतातच. अशातच फिलिपिंन्स मधील एका शाळेच्या प्रशासनाने परिक्षेत विद्यार्थ्यांनी कॉपी करु नये म्हणून एक वेगळीच अक्कल लढवली आहे. (Cheating In Exam)
खरंतर फिलिपिंन्समधील एका शाळेने परिक्षेत मुलांनी कॉपी करु नये म्हणून त्यांना विविध प्रकारे मास्क आणि टोप्या घातल्या आहेत. याचे फोटो सुद्धा सोशल मीडियात तुफान व्हायरल झाले आहेत. यावर युजर्सकडून विविध प्रतिक्रिया सुद्धा आता दिल्या जात आहेत. त्यात असे दिसते आहे की, विद्यार्थ्यांनी आपल्या चेहऱ्याला मास्क घातले आहेत जेणेकरुन बाजूच्या विद्यार्थ्याकडे त्याचे लक्ष जाणार नाही. फक्त स्वत:च्याच पेपरमध्ये पहावे.
शाळेच्या प्रशासनाने विद्यार्थ्यांना मास्क आणि टोपी घालूनच पेपर देण्यास परवानगी दिली आहे. रिपोर्ट्सनुसार, बिकोल युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांना असा आदेश दिला कारण ते दुसऱ्यांच्या पेपरमध्ये पाहणार नाहीत आणि कॉपी सुद्धा करता येणार नाही. परिक्षेला बसलेल्या काही विद्यार्थ्यांनी हेल्मेट तर काहींनी किबोर्ड सारख्या वस्तू आपल्या डोक्यावर किंवा चेहऱ्यावर लावल्या आहेत. (Cheating In Exam)
हे देखील वाचा- उपासमारीच्या लिस्टमध्ये पाकिस्तान, श्रीलंका सर्वाधिक पुढे तर भारत पहा कोणत्या स्थानावर
शाळेच्या एका शिक्षकांनी असे सांगितले की, मुलांनी इमानदारीने परिक्षा द्यावी म्हणून हा मार्ग शोधण्यात आला. परंतु ही पद्धत अगदी मजेशीर आहेच. पण कॉपी करण्याची संधी सुद्धा त्यांना मिळणार नाही. या सर्व गोष्टीवर संमीश्र प्रतिक्रिया आता सोशल मीडियात दिल्या जात आहेत.
विद्यार्थ्याने अभ्यासाठी शॉर्टकटचा वापर कधीच करु नये असे सांगितले जाते. आपली बौद्धिक क्षमता आणि मेहनतीने अभ्यास करावा जेणेकरुन तुम्हाला परिक्षेच्या पेपरमध्ये कोणत्याही समस्या येणार नाहीत. कॉपी करुन लिहिणे आणि यशस्वी होणे याला काही अर्थ नाही. उलट यामध्ये तुमचेच नुकसान होणार आहे.