इस्रोने आपले मिशन चंद्रयान-3 लॉन्च केले.१४ जुलैला इस्रोने दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आले. चंद्रयानापूर्वी आणि दुसऱ्या मिशननंतर इस्रोचे हे तिसरे मून मिशन आहे. हे चंद्रयान चंद्राच्या दक्षिण धुव्रावर सॉफ्ट लँन्डिग करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र जगात चंद्रावर पोहचण्याचा प्रयत्न ६० वर्षांपूर्वी सुद्धा करण्यात आला होता. जेव्हा रशियाने आपल्या मून मिशन लूना-१ ला लॉन्च केले होते.(Chandrayaan-3)
अमेरिकेच्या नासा, रशियाच्या लूना आणि चीनच्या चांग-ई शी तुलना केली तर भारत यावेळी एक नवा इतिहास रचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जसे की, चंद्रावर सॉफ्ट लँन्डिंग करणारा भारत हा चौथा देश ठरु शकतो. तर जाणून घ्या भारताचे चंद्रयान-३ हे रशिया, चीन आणि अमेरिकेच्या मून मिशनपेक्षा किती वेगळे आहे त्याबद्दल अधिक.
रशियाचे लूना मिशन
रशियाने पहिले मून मिशची सुरुवात लूना पासून केली होती. २ जानेवारी १९५९ मध्ये सोवियत संघ (रशिया)ने लूना-१ अंतराळयानापासून सुरुवात केली होती. ते चंद्राजवळ पोहचणारे पहिले अंतराळयान होते. मात्र मोठे यश हे दुसऱ्या लूना-२ मिशनमध्ये मिळाले. पहिल्यांदा चंद्राच्या कक्षेत रशियाचा पहिला कृत्रिम उपग्रह पोहचला गेला होता. त्याने चंद्राच्या पृष्ठभागासंबंधिक महत्त्वपूर्ण माहिती दिली.त्याचसोबत तेथे कोणत्याही प्रकारचे चुंबकीय क्षेत्र नव्हते याची सुद्धा माहिती मिळाली होती. त्यानंतर लगेच रशियाने लूना-३ लॉन्च केले. त्याच्या माध्यमातून असे कळले गेले की, चंद्रावर मोठे खड्डे सुद्धा आहेत.
रशियाने आपले अखेरचे मून मिशन लूना १९७६ रोजी लॉन्च केले होते. या मिशनच्या माध्यमातून वैज्ञानिकांनी चंद्रावरुन १७० ग्रॅम माती मिळवली होती. आता रशिया आपले पुढील मून मिशन लूना २५ लवकरच लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
अमेरिकेचे मून मिशन
नासाने मून मिशनची सुरुवात सर्वेयर प्रोग्रामपासून केली होती. १९६६ ते १९६८ दरम्यान हा प्रोग्राम चालला. या प्रोग्रामअंतर्गत नासाने ७ मानवरहित यान पाठवले, चंद्रावर सॉफ्ट लँन्डिंगनंतर मातीचे नमूने मिळवे. त्यानंतर अमेरिकेने आपल्या अपोलो मिशनच्या माध्यमातून पहिल्यांदा अंतराळवीर हे चंद्रावर उतरवले. (Chandrayaan-3)
१९६९ मध्ये लॉन्च झालेल्या अपोलो ११ च्या माध्यमातून पहिल्यांदा अंतराळवीर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले होते. हे अंतराळवीर होते नील आर्मस्ट्राँन्ग आणिबज एल्ड्रिन, मात्र १९७० मध्ये अपोलो ११ मिशनमध्ये यानाच्या ऑक्सिजन टँकमध्ये स्फोट झाला आणि ते रद्द करण्यात आले. त्यानंतर अपोलो १३, १४ आणि १५ आणि १७ ला लॉन्च केले. त्याच्या माध्यमातून चंद्रासंदर्भात अधिक माहिती मिळवली.
मिशन चंद्रयान-३ मुळे अमेरिकेला होणार फायदा
आता नासाला २०२५ मध्ये मून मिशन आर्टेमिस लॉन्च करणार आहे. खरंतर भारताच्या चंद्रयान- ३ मिशनचा फायदा नासाच्या आर्टेमिस मिशनला होणार आहे. व्हाइट हाउसने दावा केला आहे की, चंद्रयान-३ चा डेटा भविष्यात आर्टेमिस मिशनमध्ये होणाऱ्या ह्युमन लँन्डिंगसाठी कामी येऊ शकतो. भारताने आर्टेमिस करारावर स्वाक्षरी केली आहे. त्याच्या माध्यमातून भारतीय मून मिशन संबंधित माहिती ही अमेरिकेच्या मिशनसाठी कामी येणार आहे.
चीनचे मून मिशन
चीनने आपल्या मून मिशन चांग’ई ४ ला २०१९ लॉन्च केले होते. हे मिशन यशस्वी झाले होते. मिशनच्या माध्यमातून चंग्राच्या संरचनेबद्दल काही माहिती मिळवली होती. त्यानंतर २३ नोव्हेंबर २०२० रोजी १६ डिसेंबर २०२० पर्यंत चांग ई ५ मिशन चालले. गेल्या ४० वर्षात पहिल्यांदा असे झाले आहे की, जेव्हा एखाद्या देशाने चंद्राच्या पृष्ठभागावर खोदकाम करत तेथून नमूने घेऊन परतले होते. या मिशनला खास असल्याचे सांगितले जाते. कारण जे नमूने घेण्यात आले होते ते केवळ चंद्राच्या अभ्यासासाठी नव्हे तर सुर्यमालाच्या अभ्यासाच्या दृष्टीकोनातून सुद्धा महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले होते.(Chandrayaan-3)
हेही वाचा- जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचं वर्चस्व
दरम्यान, चंद्रयान-३ मिशन अंतर्गत लँन्डिंगची प्रोसेस संपण्यासाठी ४२ दिवसांचा कालावधी लागणार आहे. तसेच ते २३ ऑगस्टला चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. चंद्रावर सॉफ्ट लँन्डिंग नंतर चंद्रयान-३ त्याच्या पृष्ठभागावरील माहिती मिळवण्यासह येथे येणारे भुकंप, पृष्ठभागावरील थर्मल प्रॉपर्टी, प्लाज्मासह पृथ्वीपासून चंद्राचे अंतर किती आहे हे या बद्दल ही माहिती मिळवणार आहे. त्याचसोबत मातीत असलेले केमिकल्स आणि मिनिरल्सचा स्तर ही किती आहे याचा सुद्धा शोध घेतला जाणार आहे.