Home » Lunar Eclipse : पितृपक्षाच्या पहिल्याच दिवशी लाल रंगात रंगणार चंदामामा !

Lunar Eclipse : पितृपक्षाच्या पहिल्याच दिवशी लाल रंगात रंगणार चंदामामा !

by Team Gajawaja
0 comment
Lunar Eclipse
Share

सप्टेंबर महिन्यात होणा-या एका असाधारण खगोलीय घटनेसाठी जगभरातील खगोलशास्त्रज्ञ आणि अभ्यासक उत्सुक झाले आहेत. या दिवशी पूर्ण चंद्रग्रहण होणार असून चंद्राचा नेहमीचा पांढरा शुभ्र रंग हरवणार असून त्याजागी आपल्याला लाल रंगाचा चंद्र दिसणार आहे. 7 सप्टेंबर रोजी ही अदभूत खगोलीय घटना होणार असून हा लाल चंद्र बघण्यासाठी देशांमध्ये विशेष व्यवस्था करण्यात येत आहे.  (Lunar Eclipse)

चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण या दोन खगोलीय घटना आहेत. या दोन्हीही ग्रहणांचा जगभरातील अनेक खगोलशास्त्रज्ञ अभ्यास करत असतात. त्यातही या ग्रहण काळात जर आणखी एखादी विलोभवनीय घटना घडणार असेल, तर त्याला मोठे महत्त्व प्राप्त होते. तशीच अद्भूत घटना 7 सप्टेंबर रोजी होत आहे. 7 सप्टेंबर रोजी जगाच्या एका भागात पूर्ण चंद्रग्रहण दिसणार आहे. या दुर्मिळ घटनेदरम्यान, चंद्राचा पांढरा रंग रक्तासारख्या लाल रंगात बदलणार आहे. या वर्षातील हे दुसरे चंद्रग्रहण असून ग्रहण आशिया, युरोप, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि अरबस्तानातील मोठ्या भागात दिसणार आहे. भारतात हे ग्रहण पितृपक्षाच्या पहिल्याच दिवशी येत असल्यामुळे त्याला अधिक धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. (International News)

7 सप्टेंबर रोजी होणारे चंद्रग्रहण रात्री उशिरा सुरू होणार असून एक तासापेक्षा जास्त काळ चालणार आहे. भारताव्यतिरिक्त, हे चंद्रग्रहण युरोप, संपूर्ण आशियाई देश, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, आफ्रिका, पश्चिम उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिकेच्या पूर्वेकडील प्रदेशात दिसणार आहे. इंग्लंड, इटली, जर्मनी, फ्रान्स यासारख्या युरोपातील जवळजवळ सर्व देशांमध्ये देखील चंद्रग्रहण दिसेल. ब्रिटन आणि पश्चिम युरोपमध्ये ग्रहण चंद्रोदयाच्या वेळी ग्रहण पाहता येणार आहे. मात्र पश्चिम अलास्काच्या काही भागांव्यतिरिक्त उत्तर अमेरिकेतील बहुतेक ठिकाणी हे ग्रहण दिसणार नाही. या ग्रहणाच्यावेळी होणा-या लाल रंगाच्या चंद्राला बघण्यासाठी आणि त्याची छबी टिपण्यासाठी जिथे ग्रहण दिसणार आहे, त्या भागात मोठ्या प्रमाणात खगोलशास्त्रज्ञ गर्दी करणार आहेत. या भागातील हॉटेल आधीच बुक करण्यात येत आहेत. चंद्रग्रहणामध्ये पृथ्वीचा सावली चंद्राला पूर्णपणे झाकून टाकते. थेट सूर्यप्रकाश रोखला जात असूनही, काही किरणे चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचण्यापूर्वी पृथ्वीच्या वातावरणातून जातात. (Lunar Eclipse)

यामुळे निळा प्रकाश पसरतो, तर लाल प्रकाश चंद्राकडे पसरतो. यामुळे चंद्राला अग्निमय चमक मिळते. यामध्ये चंद्र लाल रंगाचा दिसतो आणि म्हणूनच त्याला ब्लड मून म्हणतात. पण 7 सप्टेंबर 2025 रोजी येणा-या पौर्णिमेला देखील पूर्ण चंद्रग्रहण आहे. या चंद्रग्रहणाला ‘कॉर्न चंद्रग्रहण’ असेही म्हटले जाते. यापूर्वी 14 मार्च रोजी पूर्ण चंद्रग्रहण दिसले होते. 7 सप्टेंबर रोजी होणारे चंद्रग्रहण हे या वर्षातले शेवटचे चंद्रग्रहण आहे. या चंद्रग्रहणाच्या काळात भारतात पितृपक्षाचा काल आहे, त्यामुळे या ग्रहण काळात संगमतीरावर मोठी गर्दी होणार आहे. सनातन धर्मात सूर्य आणि चंद्रग्रहणांचे विशेष महत्त्व आहे. हे चंद्रग्रहण पितृपक्षाच्या पहिल्या दिवशी होणार असल्यामुळे धार्मिक मान्यतेनुसार, चंद्रग्रहणाचा मानवी जीवनावर परिणाम होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. वैदिक हिंदू कॅलेंडरनुसार 7 सप्टेंबर 2025 हा दिवस भाद्रपद महिन्यातील आहे. (International News)

==============

हे देखील वाचा : Ramdas Boat : …आणि त्या ७५० लोकांना घेऊन ‘रामदास’ बुडाली!

============

भारतात या चंद्रग्रहणाचा सूतक काळ दुपारी 12.57 वा. सुरु होईल, अशी माहिती आहे. या काळात सर्व मंदिरांचे दरवाजे बंद करण्यात येतील. चंद्रग्रहणाच्या काळात केलेला जप आणि ध्यान अधिक चांगले असल्याचे मानले जाते. या चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी 5 तास 27 मिनिटांचे असणार आहे. रात्री 8.58 ते मध्यरात्री 1.25 पर्यंत ग्रहण असणार आहे. तर पूर्ण ग्रहण म्हणजे ज्यामध्ये चंद्र पूर्णपणे झाकला जाईल, ती वेळ रात्री 11.1 ते 12.33 पर्यंत असणार आहे. भारतात चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण काळाला आगळे धार्मिक महत्त्व आहे. या काळात भारतातील बुहुतांशी मंदिरे बंद राहतात. या काळात धार्मिक जप करण्यात येतात. ग्रहण सुटण्याच्या काळात संगमतीरावर गर्दी होते. गंगा स्नान करुन दान करणे यावेळी पुण्याचे मानले जाते. त्यातही यावेळेचे चंद्रग्रहण हे पितृपक्षाच्या सुरुवातीस आल्यानं त्यावेळी सर्वच धर्मिक स्थळी मोठी गर्दी रहाणार आहे. (Lunar Eclipse)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.