काही लोक आपल्या आरोग्याच्या तुलनेत दातांची योग्य प्रकारे काळजी घेत नाहीत. हेच कारण आहे की, दातात घाण जमा झाल्यानंतर ते किडतात आणि कमजोर होऊ लागतात. अशातच दात कधीकधी दुखण्यासह काही समस्या ही निर्माण होतात. अशा सर्व कारणास्तव रात्रीचे जेवण झाल्यानंतर झोपावे असा सल्ला दिला जातो. दात दुखण्याची किंवा कॅविटीची समस्या लहानांमध्ये नव्हे तर मोठ्यांमध्ये अधिक दिसून येते, ज्यामुळे दातात जमा झालेले बॅक्टेरिया यामध्ये छिद्र करतात. जर तुम्हाला सुद्धा कॅविटी आणि दाताच्या दुखण्याची समस्या असेल तर पुढील काही घरगुती उपायांनी ती दूर करु शकता.(Cavities Home Remedies)
-लवंग
ओरल हेल्थसोबत दातात कॅविटी सारख्या होणाऱ्या समस्येपासून दूर राहण्यासाठी लवंग हे फार फायदेशीर आहे. लवंगामध्ये असणारे पोषक तत्व यांच्यासह अँन्टी इंफ्रेलेमेटरी आणि अँन्टी बॅक्टेरियल गण दातांच्या कॅविटीला फैलाव करण्यापासून रोखतात. तसेच दुखणे ही कमी करतत. या व्यतिरिक्त तोंडात होणाऱ्या काही आजारांना ही दूर ठेवतात.
-अंड्याचे आवरण
दातांमधील कॅविटी दूर करण्यासाठी अंड्याच्या वरील आवरण फार लाभकारी मानले जाते. या आवरणाची बरीक पूड करुन त्यात बेकिंग सोडा मिक्स करा. आता ही पेस्ट वापरुन तुमचे दात स्वच्छ करा. अशातच काही प्रमाणात कॅविटीची समस्या दूर होण्यास मदत होऊ शकते. या व्यतिरिक्त दाताला आलेले पिवळेपण ही दूर होते.
-हळद
तुम्हाला जर कॅविटीची समस्या निर्माण झाली असेल तर तुम्ही दात आणि हिरड्यांना हळद लावा. १०-१५ ती हळद लावून ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने चुळ भरून दात स्वच्छ करता. असे दररोज ही तुम्ही करु शकता.
-लसूण
खाण्याची टेस्ट वाढवण्यासाठी लसूण हे फार फायदेशीर मानले जाते. यामध्ये असलेले पोषक तत्वांमध्ये काही औषधीय गुण असतात. लसूण शिवजून ते कच्चे खाल्ल्याने आरोग्यासह तोंड आणि दातांसाठी फायदेशीर असते. यामध्ये अँन्टी बॅक्टेरियल आणि अँन्टी फंगल गुण यामधअये असतात. त्यामुळे दुखण्याची समस्या कमी होते.(Cavities Home Remedies)
हे देखील वाचा- ‘या’ कारणांमुळे गरोदरपणात हाता-पायाला येते सूज; जाणून घ्या सूज कमी करण्याचे घरगुती उपाय
-लिंबू
विटामीन सी युक्त लिंबूमुळे लठ्ठपणा कमी होण्यासह दातांमध्ये झालेले इंन्फेक्शन आणि कॅविटीची समस्या दूर करते. याच्यारसात असलेले अॅसिड किटाणू सुद्धा मरतात. कॅविटीमुळे होणाऱ्या वेदाना यामुळे कमी होतात. त्याचसोबत तोंडाची स्वच्छता ठेवण्यास ही मदत होते.