अनेकदा आपण झोपेतून उठल्यावर आपल्याला आपला गाल, आपली उशी जरा ओली वाटते. तेव्हा नीट पाहिल्यावर आपल्या लक्षात येते की आपली झोपेत लाळ गळाली आहे. बऱ्याच लोकांची कायम झोपेत लाळ गळत असते. लहान मुलांची तर लाळ झोपते गाळतेच, मात्र मोठ्यांची देखील लाळ अनेकदा गळते. ही खूपच सामान्य बाब असली तरी त्याकडे दुर्लक्ष करूनही चालणारे नाही. कारण झोपते लाळ गळणे ही अनेकदा आरोग्याच्या दृष्टीने धोक्याची घंटा असू शकते. झोपेतून उठल्यावर जेव्हा आपल्याला उशीवर लाळीचे डाग दिसतात तेव्हा आपण त्याकडे सर्रास दुर्लक्ष करतो. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का की झोपेत लाळ का गळते? नाही चला तर मग जाणून घेऊया याबद्दल. (Health)
लाळ गळणे म्हणजे काय?
रात्री झोपेत आपण ज्याप्रमाणे घरतो त्याप्रमाणेच झोपेत असताना नकळतपणे आपल्याला लाळ गळण्याचाही त्रास होऊ शकतो. यावेळी आपल्या तोंडातून थोडी किंवा जास्त लाळही गळू शकते. आपल्या तोंडून लाळ गळतं असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका किंवा ही लाजिरवाणी हसण्याची बाब नाही. यावर योग्य तो इलाज करणे गरजेचे आहे. त्यातून यामागील कारणंही समजून घेणे आवश्यक आहे. लाळेचा स्त्राव सामान्य वाटू शकतो, परंतु जर ते वारंवार होत असेल तर ते हलक्यात घेऊ नका. यामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. खरंतर ही समस्या आपल्याला आपल्या चुकींच्या सवयीमुळे देखील होऊ शकते किंवा तुम्हाला काही आरोग्याच्या समस्या असतील तरीदेखील तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. (Marathi News)
लाळ का गळते?
झोपताना लाळ येण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे झोपण्याची स्थिती. जे लोक एका बाजूला किंवा पोटावर झोपतात त्यांच्या तोंडात साचलेली लाळ तोंडावाटे बाहेर येते. खासकरून जर ते तोंडातून श्वास घेत असतील किंवा त्यांच्या अनुनासिक परिच्छेद अरुंद असतील तर. जेव्हा ते श्वास घेण्यासाठी जेव्हा तोंड उघडतात तेव्हा त्यांच्या ओठांमधून जमा झालेली लाळ बाहेर येऊ शकते. ज्यांचे नाक कोणत्याही कारणामुळे चोंदलेले असते, तसेच ज्यांना सायनसची समस्या असते अशा लोकांची देखील झोपेत लाळ गळते. कारण ही लोकं तोंडाने श्वास घेतात. (Todays Marathi Headline)

तज्ज्ञांच्या मते, तोंडातून जास्त वेळ लाळ गळत राहिल्यास ते न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरची समस्या असू शकते. हे असे तेव्हा घडते जेव्हा आपले शरीर स्नायूंवर नियंत्रण ठेवू शकत नाही, तेव्हा रात्री तोंडातून लाळ गळते. त्यामुळे सतत लाळ गळणे हे स्ट्रोक, पार्किन्सन रोग, मल्टीपल स्क्लेरोसिसचे लक्षण असू शकते. तोंडातून लाळ येण्याचे आणखी एक कारण म्हणजे ऍलर्जी. तुमच्या शरीरात कोणत्याही प्रकारची ऍलर्जी असल्यास, लाळ ग्रंथी शरीरातील विषारी द्रव्ये काढून टाकण्यासाठी अधिक सक्रिय होते आणि लाळ अधिक गळते. स्लीप एपनिया ही झोपेशी संबंधित समस्या आहे, त्याच्या लक्षणांमध्ये तोंडातून लाळ येणे देखील समाविष्ट आहे. जर तुम्ही रात्री झोपताना जास्त प्रमाणात लाळ गळत असेल तर त्याला स्लीप एपनियाची समस्या कारणीभूत आहे. (Latest Marathi News)
तोंडातून लाळ गळणे हे ॲसिडिटीचे संकेत आहे. ज्या लोकांना जास्त प्रमाणात लाळ येते त्यांना जठराची समस्या असू शकते. रात्री घशात अन्न अडकल्यामुळे, झोपताना तोंडातून लाळ गळू लागते. आपल्याला काही शारीरिक मानसिक समस्या जाणवत असल्यास , विशिष्ट औषधोपचार सुरु असल्यास तोंडात जास्त प्रमाणात लाळ स्त्रवते. त्यामुळे असे जर होत असल्यास डॉक्टरांकडून औषध बदलून घ्या. जेव्हा तुम्ही गाढ झोपेत असता तेव्हा कधीकधी तुमचे तोंड उघडे असू शकते. त्यामुळे लाळ वाहू लागते. (Top Marathi News)
लाळ गळण्याच्या समस्येवर उपाय कोणते?
तुम्हाला जर का लाळ गळ्याची समस्या असेल तर गरम पाण्याच्या गुळण्या करा, पोट स्वच्छ ठेवा, पचनास जड असे पदार्थ खाऊ नका, तुळशीची पानं खा किंवा जेवल्यानंतर गरम पाण्यातून आवळा पावडर घालून ते पाणी प्या. संपूर्ण दिवसभरात योग्य प्रमाणात पाणी पिणे आवश्यक असते. शरीरात जर पुरेसा ओलसरपणा निर्माण झालेला नसल्यास तोंडात जास्त प्रमाणात लाळ तयार होते. त्यामुळे शरीराला पुरेसे पाणी द्या. दिवसभरात तोंड कोरडे पडण्याआधी किंवा तहान लागण्याआधी घोट घोट पाणी मधून मधून पिणे गरजेचे आहे. (Top Trending News)
=========
Vitamin C : चमकदार आणि ग्लोइंग स्किनसाठी जाणून घ्या सर्वात बेस्ट आणि सोपे उपाय
=========
लाळ गळू नये म्हणून पाठीवर झोपण्याची सवय लावा. यामुळे तुमचे तोंड बंद राहील आणि लाळ बाहेर पडणार नाही. झोपण्यापूर्वी तळलेले आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळा. खूप आंबट आणि गोड पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यास किंवा या चवीची पेयं जास्त प्रमाणात प्यायल्यास देखील हा त्रास होऊ शकतो कारण या चवींची तीव्रता कमी करण्यासाठी तोंडात जास्त प्रमाणात लाळ तयार होते. त्यामुळे लाळ जास्त गाळण्याच्या समस्येवर उपाय म्हणून आंबट गोड पदार्थ आणि पेयं कमी प्रमाणात घ्यावे. अती प्रमाणात लाळ स्त्रवणे यालाच हायपर सिक्रेशन असे म्हणतात. यावर उपाय म्हणून अनेक औषधं उपलब्ध आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लाळेवरची औषधे घेता येतात. (Social News)
(टीप: या लेखात देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. कोणतेही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
